या मराठी मालिकांनी इतिहासाच्या सुवर्ण आठवणींना दिला उजाळा

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मालिका हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्राईम टाईममध्ये प्रत्येक मराठी घरात मालिका आवर्जून पाहिल्या जातात. या मालिकांनी प्रेक्षकांचं जणू भावविश्वच व्यापलेलं असतं. तरीही प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी मालिकांमध्ये नवे नवे ट्रॅक आणले जातात.

पण ऐतिहासिक मालिकांवर मात्र प्रेक्षक मनापासून प्रेम करताना दिसतात. इतिहासातील सोनेरी क्षण, जोश आणणारे प्रसंग चित्ररुपाने समोर पाहाताना एक वेगळीच अनुभूती येते. मराठी मालिकांनी इतिहास छोट्या पडद्यावर साकारण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. पाहुयात कोणकोणत्या ऐतिहासिक मराठी मालिका यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

राजा शिवछत्रपती – मराठी जनांचं दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या मालिकेने प्रेक्षकांसमोर आणला. या मालिकेत मराठी इतिहासाला घराघरात पोहोचवलं. अभिनेता, खासदार अमोल कोल्हे यांनी या मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

Raja Shivchhatrapati - Disney+ Hotstar

सावित्रीजोती – स्री शिक्षणाचे महामेरु म्हणून ओळखले जाणारे महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सावित्री जोती या मालिकेने उलगडला. त्यावेळी असलेली परिस्थिती स्त्री शिक्षणासाठी या जोडप्याने उचलेले कष्ट, आपल्या ध्येयाबाबत असलेली तळमळ या मालिकेत दाखवण्यात आली होती. अभिनेत्री अश्विनी कासार आणि ओमकार गोवर्धन हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसले होते.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर – महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट या मालिकेने उलगडला. बाबासाहेबांची शिक्षणाविषयीची तळमळ, अभ्यासू वृती या मालिकेतून दाखवली गेली. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसले होते. तर रमाईच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसली होती.

Dr. Babasaheb Ambedkar - Disney+ Hotstar

स्वराज्यजननी जिजामाता – महाराष्ट्राच्या आऊसाहेब जिजाऊ यांचा तेजस्वी जीवनप्रवास स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून उलगडला. या मालिकेत जिजाऊंचा बालपणापासूनचा प्रवास दाखवला गेला. या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार ही युवा जिजाऊंच्या भूमिकेत दिसली होती. तर नीना कुळकर्णी या उत्तरार्धात दिसल्या होत्या.

स्वामिनी – पेशवाईच्या वैभवाच्या कथा आजही सुरसपणे ऐकल्या वाचल्या जातात. रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्या नात्यावर आधारलेली मालिका म्हणजे स्वामिनी. या मालिकेने रमा – माधव यांचा जीवनप्रवास दाखवला तर माधवराव पेशवेपदी विराजमान झाल्यानंतर या मालिकेने निरोप घेतला.

स्वराज्यरक्षक संभाजी – स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची दैदिप्यमान संघर्ष गाथा या मालिकेतून दिसली. या मालिकेत अभिनेता शंतनू मोघे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसले होते.

स्वराज्य सौदमिनी ताराराणी – दोन छात्रपतींच्या नंतर स्वराज्याचा गड कणखरपणे सांभाळणा-या रणरागिणी म्हणजे ताराराणी. अभिनेत्री स्वरा ठिगळे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती.

Watch Swarajya Saudamini Tararani Online - All Latest Episodes Available on  SonyLIV

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा