१ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यावर एक लाख मिळणार तर नक्की काय आहे ही माझी कन्या भाग्यश्री योजना? कसा लाभ घेऊ शकता? कोण पात्र आहे? अटी आणि शर्ती काय आहेत? कागदपत्रे कोणती लागणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

१ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा होणार आहे. ही न्युज काय आहे? कशाची आहे, हा खूप गोंधळ लोकांच्या मनात आहे, नक्की काही कळत नाही हे, काय आहे? तर ही माहिती बरोबर आहे पण हि माहिती आहे ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची. तर ही योजना नक्की काय आहे यात तुम्हाला कसा लाभ होतो, याची पात्रता काय आहे, याचा अटी काय आहे, या योजने चे स्वरूप काय आहे, कोण कोणती कागदपत्रं लागणार आहे आणि या योजने चा अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती दिली आहे.

ही योजना १ एप्रिल २०१६ रोजी सुरु झाली, हि योजना बँक ऑफ महाराष्ट्रा येथे राबवली जाते व याचा अर्ज देखील बँक ऑफ महाराष्ट्रा मध्ये करता येतो, आपण या योजनेचे स्वरूप, जीआर, अटी व शर्ती याची माहिती दिली आहे. सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर बी पी एल आणि ए पी एल म्हणजेच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड या दोन्ही साठी आहे.

यात सर्वात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे पिवळं रेशन कार्ड ज्यांचा कडे आहे त्यांना म्हणजेच दारिद्र्य रेषे खालील. यात उत्पन्नाची मर्यादा आहे ७.५ लाखाची तर केशरी शन कार्ड असलेल्या पण उत्पन्न ७.५ लाखापेक्षा कमी असेल तर अश्या व्यक्तींना याचा लाभ घेता येतो.

ही योजना सुरु झाली १ एप्रिल २०१६ पासून पण १ ऑगस्ट २०१७ ला आला होता या योजनेचा फायनल जी आर ज्या मध्ये सविस्तर अशी सुधार केलीली सगळी माहिती भेटेल. यामध्ये १ जानेवारी २०१४ पासून दारिद्र्य रेषे खालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला कुटुंबातील २ आपत्यांपर्यंत ही योजना लागू करण्यात आली आहे, सगळ्यात महत्वाचं कुटुंबातील २ मुली या योजनेला पात्र आहेत.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींचा शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे , मुलींचा आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ हि योजना लागू करण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन अपत्य मुलींसाठी लागू असून

दारिद्र रेषेवरील ए पी एल कुटुंबात म्हणजे केशरी रेशन कार्ड असलेल्या काही मुलींना लाभ देण्यात येणार आहे. या योजना शासन निर्णयान्वये अधिक्रमित करून ‘माझी कन्या भाग्येश्री योजना दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागू करण्यात येत आहे.

येथे लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थी कोण आहे? तर एका मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अनुज्ञेय रक्कम व शासनाकडून बँकेत गुंतावणूक करण्यात येणारे ५०,००० रुपये, व मुलीचा वया चा टप्यानुसार द्यावयाची रक्कम यात तुम्हला किती रक्कम भरावी लागणार आहे ६ वर्षी, १२ वर्षी व कशी प्रकारे काढता येईल.

तर वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत ५००००/- रुपये अनुज्ञेय असणारे आणि वयाचा ६ वर्षानंतर त्या ५००००/- वर जे व्याज जमा झाले आहे ते फक्त काढता येणार आहे. पुन्हा मुद्दल रुपये ५००००/- गुंतवणूक करून ६ वर्षासाठी अनुज्ञेय होणारे व्याज हे १२ व्या वर्षी काढता येणारे आहे.

म्हणजेच १२ वर्षात एकूण १ लाखाची गुंतवणूक करायची आहे आणि फक्त व्याज जे आहे ते तुम्हाला काढता येईल, पुन्हा तुम्हाला ५००००/- गुंतवणूक करायची आहे परत ६ वर्षाचे अनुज्ञेय होणारे व्याज आणि एकूण रक्कम तुम्हाला वयाचा १८ व्या वर्षी काढता येणार आहे म्हणजे वयाचा १८व्या वर्षी तुम्ही मुद्दल साचलेले व्याज आणि शासनाचे ५००००/- अशी पूर्ण रक्कम काढता येणार आहे.

याच प्रकारे तुम्ही २५०००/- ची गुंतवणूक करू शकता , ज्यात शासन सुद्धा २५०००/- रक्कम तुम्हाला देणार. दोन मुली असल्यास दोन वेगळ्या गुंतवणूक केल्यास शासन तुम्हाला दोन्ही मुलींसाठी रक्कम देऊ शकत. जर तुम्ही २५०००/- गुंतवणूक करत आहेत तर शासन सुद्धा २५०००/- देणार आहे, तुम्हाला मुलीचा जन्माचा वेळी आणि ६ वर्षांनी पुन्हा २५०००/- भरून तुम्ही ६व्या आणि १२ वर्षी फक्त व्याज काढू शकणार आहेत आणि वयाचा १८ व्या वर्षी मुद्दल व्याज आणि शासनाची रक्कम अशी एकूण रक्कम तुम्हाला काढता येणार आहे .

या योजने चे अटी व शर्ती काय आहेत?: – सदर योजना बँक ऑफ महाराष्ट्रा मध्ये राबविण्यात येईल. त्यासाठी बँकेसोबत आयुक्त, एकात्मिता विकास सेवायोजना, नवी मुंबई हे करारनामा करतील. बँकेसोबत मुदत ठेवीची कार्यपद्धती कशाप्रकारे राबवण्यात येईल याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. – माता/ पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्य आहे.

– माझी कन्या भाग्यश्री योजने १ ऑगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यांनंतरच्या मुलींना अनुज्ञेय राहील. – ही योजना १ ऑगस्ट २०१७ पासून लागू करण्यात आली असून ज्या मुलीचा जन्म १ ऑगस्ट २०१७ पूर्वी व दुसऱ्या मुलीचा १ ऑगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या व माता पित्याचे कुटुंब नियोजन दाखल सादर केल्यास फक्त दुसऱ्या मुलीला २५०००/- इतका लाभ अनुज्ञेय राहील.

– पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असून दुसरे अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. – कुटुंबात पहिले अपत्य मुलगी व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तीला हा लाभ देय असेल, जर तिसरे अपत्य जन्मल्यास त्याला हा लाभ अनुज्ञेय नसेल. तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक / दोन अपत्यांचे लाभ बंद होतील.

तसेच प्रदान करण्यात आलेली रक्कम ९११ अतिप्रदानाची वसुली या लेखाशिर्षांतर्गत जमा करण्यात येईल. – लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे. – योजने चे लाभ घेण्यासाठी बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

-मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मूळ मुद्दल रक्कम व त्यावरील १८ व्या वर्षी देय असणारे व्याज अनुज्ञेय होण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे व इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे. -दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली योजनेस पात्र असतील. -बालगृहातील अनाथ मुलींसाठी हि योजना अनुज्ञेय राहील (दत्तक पालकांनी मुलीचे अकाउंट उघडून हा लाभ त्या अकाऊंटला देण्यात येईल) मात्र दत्तक पालकांवर योजनेचा सर्व अटी / शर्ती लागू राहतील.

अशा बऱ्याच अटी आणि शर्ती आहेत ज्या तुम्ही खाली दिलेल्या GR वर पाहू शकता. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/201602261720426830.pdf तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जाऊन तुम्हाला योजनेचा सुधारित अर्ज मिळू शकतो. https://t.me/shetiandudyog.

दिलेल्या लिंक वर अर्ज आहे तो डाउनलोड करायचा आहे व प्रिंट मारून तो भरायचा आहे. प्रपत्र अ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हा अर्ज भरायचा आहे. ज्या मध्ये अर्जदाराचं पूर्ण नाव, आधार नंबर , मुलीचे नाव,मुलीचे नातं काय आहे. वडिलांचं किंवा आई च नाव, पत्ता लिहायचं आहे.

मुलीचा आई च नाव व मुलीची माहिती मुलीचे नाव, जन्म ठिकाण, वेळ,जन्म नोंद कुठे केली आहे, नोंद केलेली तारीख व क्रमांक आधार नंबर. कुटुंबातील एकूण अपत्यांची माहिती भरायची आहे, लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी पाहिजे व कुटुंबात एक किंवा दोन अपत्य असावे व कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केली पाहिजे. या आधी सावित्रीबाई फुले या योजने चा लाभ घेतला आहे किंवा नाही हि माहिती द्यावी लागणार आहे .

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी: १. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र २. उत्पन्नाचा दाखला ३. राशन कार्ड ४. सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र ५. लाभारती मुलीचे आधार कार्ड. या नंतर भरायचा आहे प्रपत्र बी, हा अर्ज बालगृह / शिशुगृह किंवा महिला व बाळ विभागांतर्गतच्या इतर निवासी संस्था येथील संस्थेचा अधिक्षकाने जिल्हा महिला बाळ विकास अधिकारी यांच्याकडे करायचा आहे.

या नंतर प्रपत्र क इथे तुम्हाला पालकाचे हमीपत्र द्यायचे आहे. यात पालकाची माहिती आणि सही करायची आहे. हा संपूर्ण अर्ज घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जायचं आहे आणि वरील कागदपत्र आणि अर्ज जमा करायची आहे आणि २५००० किंवा ५०००० जमा करायचा आहे, या नंतर तुम्हाला या योजने चा लाभ १८ वर्ष नंतर घेता येणार आहे.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “१ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यावर एक लाख मिळणार तर नक्की काय आहे ही माझी कन्या भाग्यश्री योजना? कसा लाभ घेऊ शकता? कोण पात्र आहे? अटी आणि शर्ती काय आहेत? कागदपत्रे कोणती लागणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखातून !

Comments are closed.