कित्येक वर्षांपासून भारतीयांना पडलेले हा प्रश्न अखेर सुटला. जाणून घ्या ‘मेलेडी इतनी चॉकलेटी क्यू है.’

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कोणतेही उत्पादन विकण्यासाठी त्याबाबतची जाहिरात ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात हा सर्वोत्तम पर्याय आहे. ग्राहक एखादे प्रॉडक्ट तेंव्हाच खरेदी करतो जेंव्हा तो टीव्ही वर अथवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याबद्दलची जाहिरात पाहतो. याशिवाय, कोणत्याही उत्पादनासाठी त्याची टॅगलाइन देखील खूप महत्वाची असते. जाहिरातीमध्ये मजेशीर टॅगलाइन असल्याशिवाय ती जाहिरात आणि ते प्रॉडक्ट दोन्ही अपूर्ण वाटते. त्यामुळे प्रत्येक कंपनी ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी जाहिरातीसोबत आकर्षक टॅगलाइन देखील देते.

भारतातील सुप्रसिद्ध कंपनी ‘पार्ले’ तिच्या अनेक उत्तम उत्पादनांसाठी ओळखली जाते. ‘पार्ले जी’, ‘पार्ले किस्समी’, ‘पार्ले मोनॅको’, ‘पार्ले हाइड अँड सीक’, ‘पार्ले न्यूट्री चॉईस’ आणि ‘पार्ले क्रॅक जॅक’ यासह अनेक उत्पादने लोकांच्या आवडत्या उत्पादनांपैकी एक आहेत. या उत्पादनांपैकी एक म्हणजे ‘पार्ले मेलडी चॉकलेट’. हे उत्पादन देखील विशेष आहे कारण त्याची टॅगलाइनच एवढी लोकप्रिय झाली की लहाना पासून मोठ्यांच्या तोंडी ही टॅगलाइन घर करून होती. या जाहिरातीत एक प्रश्न विचारला जातो, ‘ही मेलडी इतकी चॉकलेटी का आहे? ही टॅगलाईन तुम्ही ऐकलीच असेल. आणि ती नकळत तुमच्या डोक्यात घर करून राहते. यामुळे दुकानात गेल्यावर तुम्हाला ती टॉफी दिसल्यास आपला मोह आवरत नाही, आणि आपण ती टॉफी खरेदी करून खातो.

मेलीडी इतकी चॉकलेटी का आहे हा प्रश्न आपण कित्येक वर्षांपासून ऐकत आहोत, पण ‘मेलडी’ एवढी चॉकलेटी का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी परिपूर्ण वैज्ञानिक उत्तर घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मेलेडी इतकी चॉकलेटी का आहे?

वास्तविक, पार्ले मेलडी चॉकलेट बनवण्यासाठी Soy-Lecithin नावाचा पदार्थ वापरला जातो. हे केवळ या टॉफीचे शेल्फ-लाइफ वाढविण्यास मदत करत नाही तर हा पदार्थ साखरेचे क्रिस्टलायझेशन आणि चॉकलेटचे द्रवीकरण देखील नियंत्रित करते. ही टॉफी बनवण्यासाठी पार्ले कंपनी प्रामुख्याने सोया-लेसिथिन या घटकाचा वापर करते..

याशिवाय सोय-लेसिथिन हा घटक मेलडी चॉकलेटला घट्ट बनविण्यात मदत करते. मेलडी ही एक द्विस्तरीय कँडी आहे ज्यामध्ये कॅरमेलचे आवरण आणि चॉकलेटचा कोर असते. इतर कँडीजच्या तुलनेत मेलेडी आपल्याला फ्लेव्होनॉइड्सचा भरपूर डोस देते. खरं तर, फ्लेव्होनॉइड्सचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्त प्रवाह सुधारण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.

याचसोबत, सोय-लेसिथिन हा घटक ‘कोको बटर आणि कोको’ वेगळे होण्यापासून रोखण्यास देखील मदत करते. कोको बटरचा वितळण्याचा बिंदू सुमारे 34-35 °C असतो, जो शरीराच्या सरासरी तापमानापेक्षा थोडा कमी असतो. अशाप्रकारे कोको बटर 23-25°C च्या सामान्य खोलीच्या तापमानात घट्ट राहते, परंतु तोंडात टाकल्यावर ते लवकर आणि सहज वितळते. हे आपल्याला टॉफीच्या आतील भागातून मिळते जे दाट असते आणि आपल्याला ते ‘चॉकलेट’ वाटते .

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.