नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
गौर गोपाल दास हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतात ते त्यांचे प्रेरणादायी विचार. अगदी सोप्या आणि सौम्य भाषेत मांडलेले विचार कोणाचंही मन मोहून घेतील. इतकी मृदू वाणी आणि सुस्पष्ट विवेचन यामुळे गौर गोपाल दास यांचे चाहते जगभरात आहेत. केवळ प्रवचन नाही तर उत्तम हजरजबाबीपणा हा देखील त्यांचा एक गुणविशेष आहे.
गौर गोपाल यांचा जन्म 21 डिसेंबर 1973 ला पुण्यात झाला. पुण्याचा जन्म असल्याने उत्तम हिंदी प्रमाणे अस्खलित मराठीही ते बोलतात. सरकारी नोकरीतील वडिल आणि गृहिणी असलेल्या घरात सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच त्यांचंही बालपण गेलं. ते एका मुलाखतीमध्ये सांगतात की एका लाडावलेल्या मुलाप्रमाणेच ते हट्टीही होते. पण हुशार विद्यार्थी असल्याने हे सगळं चालून जायचं.
शाळेत असतानाच ते उत्तम गिटारिस्टही होते. तसेच अनेक स्पर्धांमधूनही त्यांनी बक्षीसं मिळवली होती. शालेय शिक्षणानंतर पुण्यातूनच त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तुमच्या आमच्या प्रमाणेच त्यांनी नोकरीचा मार्ग निवडला. Hp या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये ते रुजू झाले.
खरं तर चांगली डिग्री, उत्तम नोकरी हे सगळं हाताशी असताना व्यक्ती धनार्जनाच्या मागे लागतो. जास्तीत भौतिक प्रगती कशी करता येईल याचा विचार सतत करत असतो. पण गोपाल दासजी यांच्या मनात वेगळेच विचार सुरु होते.
आयुष्य सेट असतानाही त्यांना कुठेतरी अपुर्णता वाटत होती. 1995 ला त्यांनी नोकरी जॉईन केली. पण त्यानंतर जवळपास एकाच वर्षात इस्कॉन समुदायाशी जोडले गेले. या सेवेला वेळ देता यावा यासाठी त्यांनी नोकरीचाही राजीनामा दिला. इस्कॉनशी जोडले गेल्यानंतरही मनातील अहंकार कमी होण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागले.
घरातील सगळ्यात लाडावलेला, हट्टी मुलगा अशी ओळख बाजूला पडण्यास इथूनच सुरुवात झाली. अगदी नावडते पदार्थ खाण्यापासून ते इतरांशी जुळवून घेण्यापर्यंत त्यांना सुरुवात केली. पण मठात आल्यानंतर त्यांची भेट अनेक विद्ववानांशी झाली जे भौतिक जगात करिअरमध्ये उच्च स्थानावर होते.
याशिवाय आध्यात्मिकदृष्ट्याही प्रगत होते. त्यानंतर त्यांचा अहंकार कमी होऊ लागला. जवळपास दहा वर्षं आध्यात्मिक अभ्यास केल्यानंतर विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आज अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांना मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून बोललं जातं. त्यांच्या अभ्यासाचा गाभा आध्यात्माचा असला तरी आयुष्य, यश, भावना याबाबत बोलण्याकडे त्यांचा कल असतो. आजवर अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या फॉलोअर्समध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.