‘लेट्स रीड इंडिया’ च्या माध्यमातून पुस्तकं तुमच्या दारी, बना वाचनाचे वारकरी

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

हल्ली कुणी फारसं वाचत नाही, लोकं सतत मोबाईल किंवा टीव्ही बघत असतात, लहान असो किंवा मोठे; मोबाईल हेच त्यांचं जग झालं आहे, पूर्वीसारख्या लायब्रऱ्या तरी कुठे राहिल्या आतां? एक ना दोन. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे याबद्दल तुमच्या कानांवर असे काही संवाद पडले असतील. हातात सतत मोबाईल असण्याची अनेक कारणं असू शकतात, पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हल्ली जवळपास सर्व कामं मोबाईल वरचं होत असतात.

तुम्ही मोबाईलवर किती वेळ खर्च केला त्याची सूचना रोजचं येत असते, पण त्या सूचनेकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष केले जाते. तसं पाहिलं तर लोक वाचत नाहीत याचं खापर मोबाइलवर फोडण्यात काय अर्थ आहे? मोबाईल किती वेळ बघायचा हे आपलं आपणंच ठरवत असतो नाही कां? आपल्याला मोबाईल वर पूर्णपणे अवलंबून राहण्याची सवय लागली आहे कां? ह्या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने हो असं आहे. मग वाचनासाठी वेळ कसा काढायचा? आणि समजा तो काढू शकलो, तरीही पुस्तकं सहजपणे कुठे उपलब्ध होतील हा प्रश्न उरतोच. कारण लायब्ररी किंवा पुस्तकांचं दुकान जवळपास असणं तसं अवघडच.

ज्यांना पुस्तक वाचनाची सवय नाही त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, आणि ज्यांना पुस्तकंं वाचायला आवडतात, पण त्यांना ती सहज उपलब्ध होत नाहीत, अशा लोकांसाठी एका आयटी व्यावसायिक आणि अभियंत्यांच्या गटाने एकत्र येऊन महाराष्ट्रात ‘लेट्स रीड इंडिया’ चळवळ सुरू केली आहे. ह्या अंतर्गत ग्रंथालय वाचकांच्या दारात नेण्याची योजना आहे.

महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी ही मोहीम सुरू झाली आणि अल्पावधीतच त्यांच्याकडे विविध विषयांवरील १० लाखांहून अधिक पुस्तके जमा झाली. या मोहिमेच्या संस्थापकांपैकी एक श्री. प्रफुल्ल वानखेडे म्हणतात, की या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

“व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर पोसलेल्या आत्तांच्या पिढीला पुस्तकांकडे परत आणण्याचा आमचा प्राथमिक उद्देश आहे. त्यांच्यामध्ये वाचनाची सवय आणि संस्कृती पुन्हा जागृत करायची आहे. वाचन हेच त्यांना अधिक सुशिक्षित आणि अधिक सुसंस्कृत नागरिक बनवेल,” ते म्हणाले.

“पुस्तक वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्हांला पोहोचायचे आहे. आमच्याकडे आता तीन मोबाईल लायब्ररी आहेत. वाचक एका आठवड्यासाठी विनामूल्य पुस्तके घेऊ शकतात. एकच अट आहे, त्यांनी दुसरे पुस्तक घेण्यास पात्र होण्यासाठी त्या पुस्तकाबद्दल ३०० शब्दांचे पुनरावलोकन लिहून दिले पाहिजे,” ते म्हणाले. “नाहीतर होतं काय, की लोक पुस्तक घेतात आणि ते वाचतच नाहीत. ते पुस्तक घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात तसंच पडून असतं. लोक पुस्तक वाचतील याची खात्री करणे हा आमचा उद्देश आहे.”

“ज्यांना पुस्तके मिळवायची आहेत ते आमच्या सोशल मीडिया पेज किंवा वेबसाइट आणि ॲपद्वारे कनेक्ट होऊ शकतात. याशिवाय प्रत्येक पुस्तकासाठी एक QR कोड आहे. आमची मोबाईल लायब्ररी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना साप्ताहिक भेट देते,” वानखेडे म्हणाले.

सुरुवातीला ‘लेट्स रीड इंडिया’ फाऊंडेशनने महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशात हा उपक्रम सुरू करण्याची योजना आखली होती, पण कोव्हिडने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही योजना रद्द करण्यात आली.

“आम्ही आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत आहोत. येत्या दोन वर्षांत आम्ही राज्यातील प्रत्येक गांवात मोबाईल लायब्ररी घेऊन जाणार आहोत,” असे वानखेडे म्हणाले. “महाराष्ट्रात पाय रोवल्यावर आम्ही आमचे लक्ष उर्वरित देशाकडे केंद्रित करू.”

“आम्ही केवळ पुस्तकेच देत नाही, तर काय वाचले पाहिजे हे देखील सुचवतो. असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या वाचनाच्या निवडीबद्दल गोंधळलेले आहेत. त्यांना हवी असलेली पुस्तके वाचता आली तर त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात सहाय्य होईल,” वानखेडे म्हणाले.

तर मग वाट कसली बघताय? ह्या अनोख्या वाचन मोहिमेत सामील व्हा आणि वाचनाची आवड जोपासा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा