मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मिळणार या महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत..

अर्थकारण बातम्या

 

राज्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आता मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. तसा याविषयी शासनामार्फत GR सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. या बाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच मुख्यमंत्री माजी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या सलेंडरचा लाभ कसा घेता येणार आहे? त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
30 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा GR प्रकाशित केलेला आहे. यांचे टायटल मुख्यमंत्री अन्न योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरची पुनर्भरण म्हणजेच रिफील मोफत उपलब्ध करून देणे बाबत असे आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तीन गॅस सिलेंडरचे मोफत दिली जाणार आहे ते गॅस सिलेंडर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या ठिकाणी ठरविण्यात आलेले आहे.
याच्या माध्यमातून आता शासन निर्णय कोणता घेण्यात आलेला आहे, ते आपण आपण सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी या जीआरमध्ये हा खूप महत्त्वाचा उल्लेख आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राज्यात राबविण्यात येणार आहे. मित्रांनो या योजनेसंदर्भात मध्ये पात्रता म्हणजे तर सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी या गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने असणे आवश्यक असणार आहे. तसेच सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत पात्र असलेली सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र आहेत.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांची कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. एका कुटुंबात रेशन कार्डनुसार एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे. सदर लाभ केवळ 14.2 किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या या धारकांना अनुज्ञेय असणार आहे. या योजनेअंतर्गत सर्वात आधी या सिलेंडरची पैसे लाभार्थ्याला आपल्या खिशाला मधून द्यावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये शासनाकडून त्या गॅस सिलेंडरची पैसे जमा करण्यात येतील, असे वर्षातून 3 मोफत गॅस संबंधित लाभार्थ्यांना मिळणार आहे.
या योजनेचा जीआर तुम्हाला हवा असेल तर तो ऑनलाइन सरकारच्या वेबसाईटवर सहज मिळून जाईल.