मित्रांनो आज आपला जो अभ्यासात्मक माहितीचा मुद्दा असणार आहे तो आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी पात्रता. आपण आज संविधानाच्या आधारावर जे मुद्दे दिले आहेत, घटनेमुळे दिलेले मुद्देआहेत, जी कलम आहेत, ज्या शिफारशी आहेत त्याच्या आधारावर आपण माहिती बघणार आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हे नसून पूर्ण देशाच्या बाबतीमध्ये पण हे नियम व अटी लागू होतात.
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्री बनण्यासाठी कोणतीही व्यक्ती पात्र आहे का? तर हो नक्कीच पात्र आहे, महाराष्ट्राचे रहिवासी असाल, भारतीय नागरिक असाल, सर्व मूळ पात्रता जे तुम्ही मात्र पूर्ण करत असाल तर तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री पदावर सरळ नियुक्ती करण्यासाठी पात्र आहात पण येणाऱ्या या सहा महिन्यांचा कार्यकाळामध्ये तुम्हाला विधानसभा व विधानपरिषद या दोन्हीपैकी एकाचे सदस्यत्व घेणं गरजेचं असतं.
याआधी आपण सदस्य म्हणजे काय हे पाहू, विधानसभेच्या सदस्यांनाच आपण आमदार म्हणतो, त्याचबरोबर विधानपरिषदेचे चे आमदार आहेत त्याना देखील आपण विधानपरिषदेचे आमदार म्हणतो. आणि महाराष्ट्राचे वैशिष्ट्य काय तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा पण आहे नि विधानपरिषदेत देखील देण्यात आलेले आहे.
आजच्या दिवसाचा विचार केला तर कर्नाटक मध्ये पण विधानसभा, विधानपरिषद आहे तेलंगणामध्ये पण आहे, उत्तर प्रदेश मध्ये आहे, बिहार मध्ये आहे, आणि पाचवा महाराष्ट्र मध्ये आहे, आंध्रप्रदेशमध्ये होती पण आत्ताच जानेवारी मध्ये आंध्र प्रदेश ची विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे. आपला मुद्दा आहे सदस्य बनण्यासाठीची पात्रता.
विधानसभेचे सदस्य, विधानपरिषदेचे सदस्य बनायचं असेल, जर समजा तुम्हाला विधानसभेत सभेच्या आमदारकीला उभ राहायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? 1.भारतीय नागरिक असणे गरजेचा आहे. 2.वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असावी. 3.तो/ती त्या राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
4.त्या राज्यांमधील मतदारसंघांमधील मतदार असणं गरजेचं आहे. संस्थेच्या मार्फत वेळोवेळी जे बदल करण्यात आलेले आहेत, सदस्यांच्या बाबतीमध्ये ते बदल आपण स्वीकारले पाहिजे, त्याबदलासाठी आपण पात्र असलं पाहिजे. या पात्रता पूर्ण करत असल्यानंतर तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला उभ राहू शकतात.
आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहू शकता आणि तुम्ही मतदान झाल्या नंतर आमदार म्हणून निवडून येऊ शकता. विधानसभेला legislative कोन्सिल म्हटलं जात, विधान परिषदेला legislative assembly अस म्हटलं जातं. तुम्हाला विधानपरिषदेचे सदस्य बनायचं असेल तर त्यात पात्रतामध्ये फक्त फरक एकच आहे की वयाची 25 वर्षाचे जागी वयाची 30 वर्षे तुमचे पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे.
इतर सर्व पात्रता सारख्याच आहेत. असे असल्यास विधान परिषदेच्या आमदारकीच्या निवडणूक लढवण्यास तुम्ही पात्र आहात.
आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हा की मुख्यमंत्री बनण्यासाठी या सदस्यांमधील जो निवडून आलेल्या व्यक्ती आहे त्याची नियुक्ती केली जाते हे मान्य आहेत.
पण समजा सर्वसामान्य व्यक्ती जी राज्याची मतदार आहे ती व्यक्ती मंत्री बनू शकते का? नक्कीच होऊ शकते, मुख्यमंत्री होऊ शकते, फक्त काय करावे लागेल येणाऱ्या सहा महिन्यांच्या काळामध्ये विधानसभा, विधान परिषद या दोन्हींचा सदस्यत्व स्वीकारणं गरजेचं आहे.
आता आपण महाराष्ट्र राज्याचा राज्यविधिमंडळाच्या बाबतीमध्ये काही मुद्दे पाहू. महाराष्ट्र राज्याचा राज्य विधिमंडळ दोन भागांमध्येविभाजित झालेले आहे. एक म्हणजे विधानसभा आणि दुसरं म्हणजे विधान परिषद. विधानसभेच्या बाबतीत विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, विधानसभेच्या सदस्य जे आहेत ते मागे जी आमदारकीची निवडनूक झाली या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण प्रत्यक्ष मतदान पद्धतीने आमदारांना निवडून दिलेलं आहे,.
यांना संविधान सभेचे सदस्य म्हटले जातात. महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे 288 सदस्य आहे, त्यांना प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडले जातात याच्यामध्ये ज्या व्यक्ती आहे त्या मंत्री बनू शकतात, सदस्य झाल्यानंतर ते पात्रता पूर्ण करतात आणि मुख्यमंत्री बनू शकतात, दुसरा मुद्दा आहे तो विधान परिषदेच्या बाबतीमध्ये आहे.
विधानपरिषदेच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत याच्यामध्ये विभागणी करण्यात आलेलीआहे, घटनेच्या आधारावर 1/3 सदस्य जे आहेत ते विधानसभेच्या सदस्यांच्या मार्फत निवडले जातात, दुसरे 1/3 सदस्य जे आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात, त्यानंतर 1/12 सदस्य जे आहेत ते पदवीधर मतदार संघातून निवडले जातात.
चौथा मुद्दा 1/12 सदस्य शिक्षक मतदार संघातून निवडले जातात आणि याच्या व्यतिरिक्त राहिलेले लेले सदस्य आहेत ते राज्यपालांच्या मार्फत नामनिर्देशित केले जातात. राज्यपाल कोणाला नामनिर्देशन करत असतात तर त्याच्यासाठी पण एक अट दिलेली आहे, जी व्यक्ती कलेच्या बाबतीमध्ये नैपुण्य प्राप्त केलेली असेल म्हणजे थोडक्यात आर्ट च्या बाबतीत नैपुण्य प्राप्त केलेले आहे असं राज्यपालांना वाटलं पाहिजे.
किंवा राज्याच्या संदर्भात एक कमिटी स्थापन केली असेल तर त्या कमिटीला ते वाटणे गरजेचे आहे म्हणजे, कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा आणि सहकार चळवळ या क्षेत्रांमधील व्यक्तींची नियुक्ती राज्यपाल यांच्यामार्फत होते व त्यांना राज्यपाल विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करतात.
या व्यक्तींच्या साठी कोणत्याही प्रकारचे मतदान होत नाही. वर सांगितलेल्या प्रमाणे 1/3 विधानसभेचे सदस्यांच्या मार्फत नियुक्ती केली जाते, 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नियुक्ती केली जाते, 1/12 पदवीधर मतदार संघ द्वारा आणि शिक्षक मतदारसंघ याच्यासाठी अप्रत्यक्ष पद्धतीने मतदान घेतले जातं.
तर त्याच्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की विधानसभा जी आहे ती प्रत्यक्ष मतदान पद्धतीने सदस्यांची नियुक्ती करते, विधानपरिषद ची आहे ती अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने सदस्यांची नियुक्ती करते. राहिलेले फक्त जे नामनिर्देशित सदस्य जे आहे ते सोडून अप्रत्यक्ष मतदान विधान परिषदेच्या बाबतीमध्ये होत.
विधानसभा, विधानपरिषद याच्यामधील व्यक्ती मंत्री, मुख्यमंत्री बनू शकते का? नक्कीच बनू शकते, यासाठी कोणतीही चुकीची पात्रता राहिली नाही. मंत्री, मुख्यमंत्री ची नियुक्ती राज्यपालांच्या मार्फत केली जाते. या संदर्भात भारताच्या घटनेमध्ये कलम 163, आणि कलम 164 हे राज्य मंत्रिमंडळात संदर्भात देण्यात आलेली कलम आहेत.
आता राज्य मंत्रिमंडळाने कलम 163 मध्ये काय सांगितले आहे बघा, कि राज्यपालांना साहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असतील आणि हे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्यपालांना सहाय्य आणि सल्ला देतील. कश्यासाठी साहाय्य आणि सल्ला देतील तर राज्याचा कारभार चालवण्यासाठी राज्यपालांना साहाय्य आणि सल्ला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ देत असतं.
याच्यात एक गोष्ट समजली की राज्यपाल हे फक्त राज्य प्रमुख असतात पण शासनप्रमुख आहेत, ते कोण असतात तर त्या राज्याचे मुख्यमंत्री असतात हे कलम 163 अंतर्गत आपण सांगू शकतो. तर कलम 164 मध्ये सांगितलेला आहे की जे मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते.
त्याचबरोबर मंत्र्यांची नियुक्ती पण राज्यपालांचा मार्फत केली जाते पण मुद्दा हा आहे की कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री किंवा मंत्री बनवू शकत नाही, मुख्यमंत्र्यांचा बाबतीमध्ये विचार केला तर मुख्यमंत्री बनण्यासाठी ज्या पक्षाला बहुमत मिळालेल आहे, त्या पक्षातील व्यक्तीलाच मुख्यमंत्री पदावर राज्यपालांच्या मार्फत नियुक्ती केली जाते.
किंवा एखादा पक्ष बहुमतात नसेल तरी युतीचा सरकारचा जस की आज महाराष्ट्र मध्ये आहे, युतिच्या सरकार मार्फत एका व्यक्तीची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली जाते. राज्यपालांना त्यांची निवड करावी लागते. आता जर मुख्यमंत्री सदस्य नसतील तर त्यासाठी काय करावे लागते, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्यत्व घेणे गरजेचे आहे.
आता आणखी एक मुद्दा म्हणजे जर राज्यपाल यांच्या मार्फत नामनिर्देशित केले जातात ते व्यक्ती मुख्यमंत्री बनू शकतात का? तर बनू शकतात कारण ते सदस्य म्हणूनच निवडले आहेत.
त्यामुळे आज महाराष्ट्राची परिस्थिती पहिली तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री पदासाठी पात्र तर आहेतच पण त्यांना विधान परिषदेवर, विधानसभेचे सदस्यत्व घेणे गरजेचे आहे. हे आपल्या घटनेमध्ये दिलेले मुद्दे आहेत. तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री होण्यासाठी ची पात्रता आणि त्याबद्दल चे काही मुद्दे.
Very nice info
आसिफ सुसूफ पठाण गोंडवडसा माहर जिं नां7038505083