बांबूपासून सुमधुर संगीत निर्माण करणारा मोआ सुबाॅंगबाबत माहिती आहे का?

लोकप्रिय

 

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

बांबूपासून अनेक वस्तू बनवण्यात येतात हे तुम्हांला माहित असेल, जसं की फ्लॉवर पॉट, पेन स्टॅंड, खुर्च्या, सोफा, डायनिंग टेबल, आरामखुर्च्या, कंदिल, झुले, आणि आणखी बऱ्याच. बांबू हे इको फ्रेंडली असतात त्यामुळे त्यांचा वापर फायदेशीर ठरतो. पण बांबूपासून सुमधुर संगीत निर्माण करणारे वाद्य बनवले जाऊ शकते असा विश्वास नागालॅंड इथल्या पारंपरिक संगीतावर प्रेम करणाऱ्या मोआ सुबाॅंग आणि त्याची पत्नी आरेन्ला ह्यांना वाटला आणि जन्म झाला बम्हम या वाद्याचा.

लहान असतानां मोआ सुबाॅंग शाळेच्या म्युझिक ग्रुपमध्ये भाग घेत असे. काही वर्षांनी त्याच्या भावी पत्नीसह तो स्टेजवर गाण्याचे कार्यक्रम करू लागला. पुढे त्याने स्वत:चा फोक फ्यूजन बँड काढला आणि त्याच बरोबर नागालँडच्या लोककथांना पुनरुज्जीवित करणारी नवीन वाद्ये तयार केली.

आवश्‍यकता नवीन काहीतरी शोधण्यासाठी उद्युक्त करते यावर दृढ विश्‍वास ठेवणाऱ्या मोआने बम्‍हम हे एक पुरस्कार-विजेते वाद्य बनवले, जे अगदी नवोदितांना देखील सहज हाताळता येते आणि वाजवता देखील येते.

मोआने त्याची पत्नी एरेन्ला हिच्यासोबत नागालँडमधील संगीतकारांसह एकूण चार सदस्य असलेल्या ‘अबिओजेनेसिस’ ह्या फ्यूजन बँडची स्थापना केली. अबियोजेनेसिस बॅंड मधील गाण्यांचे बोल इंग्रजीत आहेत.

“आम्ही एक रॉक बँड म्हणून सुरुवात केली आणि कव्हर व्हर्जन तसंच ओरिजिनल असे दोन्ही प्रकार वाजवले पण गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही नागा संगीताचा सखोल अभ्यास केला. २००५ मध्ये नागा संगीत आणि विविध पाश्चिमात्य ट्यूनचे मिश्रण करून आम्ही एक नव्या प्रकारचं संगीत बनवलं ज्याचं नाव आहे होवे”.

भूतकाळातील सर्वोत्कृष्ट संगीत आणि समकालीन संगीत यांच्या मिश्रणातून नवीन प्रकारचे संगीत बनवण्यावर आमचा भर आहे. आतां आम्ही फक्त मूळ होवे संगीत वाजवतो ज्यातून आम्ही नागालँडच्या परंपरांबद्दल लोकांना माहिती देतो, तसंच पौराणिक कथा सांगतो.” मोआ सुबाॅंग सांगतात.

संगीत क्षेत्रामध्ये बरीच वर्ष घालवल्यानंतर मोआ आणि त्यांची पत्नी एरेन्ला यांच्या लक्षात आलं की नागा पारंपारिक संगीताच्या सर्व नोट्स आणि रचना वाजवू शकतील अशा विशिष्ट नॉन-पर्कशन वाद्यांचा अभाव आहे.

गिटार, व्हायोलिन, पियानो ह्या वाद्यांवर वेस्टर्न संगीत अधिक चांगल्या पद्धतीने वाजवता येतं. यामुळेच एक नवीन वाद्य विकसित करण्यास मी प्रवृत्त झालो. एक असं वाद्य जे वाजवायला सोपं असेल आणि सर्वात महत्वाचं; स्वदेशी असेल. आणि अशाप्रकारे बम्हमचा जन्म झाला; अर्थात अनेक चाचण्या घेतल्यानंतर.

बम्हम एक टिकाऊ, मध्यम आकाराचे, बासरीसारखे वाद्य मोआने बांबूपासून बनवले. हे वाद्य अवघ्या एका वर्षात विकसित करण्यात आले, आणि २००५ मध्ये मेघालयचे तत्कालीन राज्यपाल एम.एम. जेकब यांच्या हस्ते शिलाँगमधील आंतरराष्ट्रीय बांबू महोत्सवात त्याचे अनावरण करण्यात आले. मार्च २०१७ मध्ये राष्ट्रपती भवनात एका समारंभात सुबाॅंगने ग्रासरूट इनोव्हेशनसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा