गोष्ट एका पोलिस इंस्पेक्टरच्या मुलीची. जिच्या नावावर आहे ‘भारतात सर्वाधिक काळ जेल मध्ये राहिलेली महिला’ असा रेकॉर्ड.

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

21 मे 1991. ही तारीख भारतीयांसाठी एक काळा दिवस समजली जाते. याचे कारण म्हणजे भारताचे लाडके पंतप्रधान राजीव गांधी यांची या दिवशी झालेली हत्या. माजी पंतप्रधान जे एक आदर्श पुत्र आणि आदर्श पंतप्रधान देखील होते त्यांची याच दिवशी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती. हा एक सुविचारित कट होता जो अनेक लोकांनी राबवला होता, यामागे LTTE (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम) चा हात होता .

राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी 7 जणांना टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. यापैकी एक म्हणजे नलिनी श्रीहरन . इतर दोषींप्रमाणे त्यांची शिक्षाही जन्मठेपेत बदलण्यात आली. कारागृहात सर्वाधिक काळ शिक्षा भोगणारी ती महिला कैदी देखील आहे. या प्रकरणात शिक्षा होऊनही त्यांचे आयुष्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या या लेखामद्धे.

कोण आहे नलिनी श्रीहरन? : नलिनी श्रीहरन या तामिळनाडूचे माजी पोलीस निरीक्षक पी. शंकर नारायणन यांच्या कन्या आहेत. त्याची आई नर्स होती. नलिनी यांनी इथिराज कॉलेजमधून इंग्रजी भाषा आणि साहित्यात ग्रॅज्युएशन केले आहे. ती 24 वर्षांची असताना राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना मदत केल्याबद्दल तिला दोषी ठरवण्यात आलं आणि तिला अटक करण्यात आली.

31 वर्षांच्या तुरुंगवासात नलिनी केवळ 3 वेळा पॅरोलवर बाहेर आली आहे. एकदा वडिलांच्या मृत्यूनंतर, दुसऱ्यांदा मुलीच्या लग्नात आणि तिसऱ्यांदा डिसेंबर २०२१ मध्ये आईची तब्येत बिघडली तेंव्हा.

नलिनी श्रीहरन यांनी 2019 मध्ये पंतप्रधान मोदी आणि तामिळनाडू उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी मर्सी किलिंगची मागणी केली होती. 

2020 मध्ये वेल्लोर तुरुंगात असताना नलिनीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. जेव्हा ही बाब मीडियामध्ये आली तेव्हा कळलं की कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारी आणखी एक महिला कैदी आहे. त्या महिलेला नलिनी यांच्या सेल मध्ये ठेवण्यात आले होते. नलिनीने आपला छळ केला त्यामुळे आपल्याला दुसऱ्या कारागृहात पाठवावे, अशी तक्रार त्या महिलेने केली होती. त्या प्रकाराबाबत कारवाई करून दुसर्‍या महिलेला नलिनीच्या सेल मधून हलवण्यात आले, त्यानंतर नलिनीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

नलिनी यांचे जीवन चरित्रही प्रकाशित झाले आहे. त्यांचे  जीवन चरित्र  पत्रकार एकलायवन यांनी लिहिले आहे. या पुस्तकात नलिनीने तिचे बालपण, लग्न, मुलीची अटक, शिक्षा याविषयी सांगितले आहे. या पुस्तकात नलिनी म्हणाल्या की, राजीव गांधी यांची हत्या होणार आहे हे मला किंवा त्यांचे पती श्रीहरन यांना माहीत नव्हते. या पुस्तकात त्यांनी राजीव गांधी यांची कन्या प्रियांका गांधी यांना 2008 मध्ये तुरुंगात भेटल्याबद्दलही सांगितले आहे. 

काही काळापूर्वी राजीव गांधी यांच्या हत्येचा दोषी  ए.जी. पेरारिवलनची  तुरुंगातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विशेषाधिकार वापरून त्यांची सुटका केली. सुटकेनंतर नलिनीने जामिनावर बाहेर येण्यासाठी न्यायालयात अर्जही  केला आहे . पेरारिवलनप्रमाणे तिचीही तुरुंगातून सुटका होईल, अशी आशा तिच्या आईला आहे. 

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.