आता असा मिळेल नवीन 7/12 उतारा II 7/12 उतार्‍यात झाले मोठे बदल II नवीन शा सन निर्णय !

शेती शैक्षणिक

मित्रांनो शेतकरी आणि 7/12 उतारा यांचं एकेमेकांनाशिवाय पान देखील हलत नाही असं म्हटलं तर त्यात वावग अस काहीच नाही कारण प्रत्येक शेतकऱ्यांसाठी 7/12 उतारा हा खूप महत्त्वाचा असतो, त्यावर त्यांच्या जमिनीचा सर्व लेखाजोखा अवलंबून असतो, त्यामुळे कोणताही जमिनीचा कारभार करायचा म्हटलं की 7/12 हा लागतोच.

शासनाने आता 7/12 ऑनलाइन मिळण्यासाठी महाभूमिअभिलेख या वेबसाईटवर सोय केली आहे. 7/12 उतारा जो बनतो तो गाव नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर12 यांच्या एकत्रित नोंदीतून बनवला जातो. गाव नमुना नंबर 7 यामध्ये भूधारकाचे नाव, शेतीचे नाव, भूमापन क्रमांक, भूधारण पद्धती, धारण क्षेत्राचा तपशील जसे लागवडी योग्य क्षेत्र, पोटखराब क्षेत्र या संदर्भातील नोंदी केलेल्या असतात.

त्याचप्रमाणे खाते क्रमांक, जमिनीवर जर इतर अधिकार असतील तर त्या संदर्भातल्या सविस्तर नोंदी असतात. तसेच जमीन जर कुळवहीवाटीची असेल तर त्या कुळाचे नाव अशा पद्धतीच्या नोंदी या यात असतात. तर गाव नमुना नंबर 12 मध्ये पिकांची नोंद ही केलेली असते. आणि या दोन्हींचा मिळून 7/12उतारा हा बनतो. 7/12 चा हा नमुना आहे हा वर्षानुवर्षे हाच चालत आला आहे.

त्यामुळे यात काही बदल हे अपेक्षित होते आणि खातेधारकांना गाव नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर 12 याच्या एकत्रिकारणाने जो 7/12 बनतो तो समजण्यास सोप्पा व्हावा, अधिकाधिक जमिनीचा तपशील हा 7/12 मध्ये मांडता यावा यासाठी जमीन महसूल विभाग हे काम करत होते.

आणि त्या अनुषंगाने मित्रांनो हा नमुना हा इ फेरफार प्रणाली ठेवणे, व खातेधारकांना वितरित करण्याकरिता क्षेत्रीय महसुली अधिकारी आणि प्राधिकारी यांना दिशानिर्देश हे देण्यात आले आहेत. आणि त्या संदर्भातल्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे 2सप्टेंबर 2020 चे परिपत्रक आले आहे. आणि याच शासन निर्णयाबरोबरच जो नवीन अद्ययावत असा नवीन 7/12 उतारा आहे त्याचा नमुना देखील या सोबत देण्यात आला आहे. तर मित्रानो या नवीन 7/12 उताऱ्यामध्ये झालेले बदल काय आहेत हे आता आपण जाणून घेऊ.

1.यात गाव नमुना नंबर 7 मध्ये गावाच्या नावासोबत GDC(government directory code )याचा देखील दर्शविण्यात यावा. 2.गावं नमुना नंबर 7 मध्ये अ लागवडियोग्य क्षेत्र आणि ब पोटखराब क्षेत्र हे दोन्ही (अ+ब)दर्शविण्यात यावे. 3.गाव नमुना नंबर7 मध्ये क्षेत्राचे एकक नमूद करून ,यात शेती क्षेत्रासाठी हे.आर. चौ. मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर. चौ. मी.हे एकक वापरावे.

4.गाव नमुना नंबर 7 मध्ये आधी खातेक्रमांक हा पूर्वी इतरहक्क राकण्यामध्ये नमूद केलं जातं असे.यानंतर खातेक्रमांक हा खातेदाराच्या नावासोबत च नमूद करण्यात केला जावा. 5.गाव नंबर 7मधील मयत खातेदार किंवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा इ कराराच्या नोंदी कंस करून दर्शवल्या जात होत्या.

आता ती ती कमी केलेली नवे व नोंदी कंस करून त्यावर आडवी रेषा मारून खोडुन दर्शविण्यात याव्या. 6.कोणत्याही गाव नमुना नंबर7 वर दर्शविलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार प्रलंबित फेरफार म्हणून इतरहक्क रकान्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात यावे. तसेच संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकही फेरफार प्रलंबित नसल्यास, फेरफार प्रलंबित नाही असे दर्शविण्यात यावे.

7.कोणत्याही गाव नमुना नंबर वर नोंदवण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक इतर हक्क रकान्याचाखाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक हा नवीन रकाना समाविष्ट करून दर्शविण्यात यावा. फेरफार घेण्याची प्रक्रिया इ फेरफार प्रणाली द्वारे ऑनलाइन झाल्यापासून एखादा स.नं./गट नं. या रकान्यात एकही फेरफार नोंदवला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक रकान्यात काहीही दर्शविण्यात येणार नाही.

8.या गाव नमुना नंबर 7 मधील सर्व जुने फेरफार क्रमांक गाव नंबर 7 वरील सर्व जुने फेरफार क्रमांक गाव नमुना नंबर 7 सर्वात शेवटीअसलेल्या जुने फेरफार क्रमांक ह्या नवीन रकान्यात एकत्रित रित्या नोंदविण्यात यावे. 9.गाव नमुना नंबर 7 कोणत्याही दोन खात्यातील नावांमध्ये डॉटेड लाईन छापण्यात याव्या त्यामुळे खातेदाराच्या नावांमध्ये अधिक स्पष्टता येते. 10.शेती क्षेत्रातील व बिनशेती क्षेत्रातील स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात यावे.

तसेच बिनशेतीच्या गा.न.नं 7 मध्ये पोटखराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात यावेत. 11.बिनशेती क्षेत्राचे गाव नमुना नंबर 7/12 साठी एकत्रितपणे गाव नमुना नंबर 12 छापून सदर क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने यामध्ये गाव नमुना नंबर 12 मधील माहिती भरण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे मित्रांनो 7/12 उताऱ्यातील झालेलं बदल वर दिले आहेत. ही आपणास कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि पोस्ट मधून मिळणारी माहिती आवडल्यास लाईक नक्की करा.