नवीन स्मार्टफोन घेताय? कुठल्या गोष्टींची काळजी आपण नवीन स्मार्टफोन घेताना घेतली पाहिजे?।। नवीन फोन घेण्याच्या फोन कंपन्यांनी लावलेल्या सवयीला आपण कुठल्या गोष्टींचा विचार करून थांबवू शकतो?।। याविषयी महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

आपण टीव्ही, फ्रीज हे पाच, आठ, दहा, पंधरा वर्षांनी विकत घेतो. पण स्मार्टफोन जे आहे ते काही लोक एक दीड वर्षाने नवीन घ्यायला लागले आहे. सारखे लोकांना नवीन फोन घ्यायचेच असतात. तरुण मुले तर 6-8 महिन्यांनी घेता कारण काही तरी नवीन आलेलं असतं पण मित्रांनो हे बरोबर नाही.

मी आज सांगणार आहे कधी तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेतला पाहिजे, आणि बाय करताना तुम्ही कुठल्या गोष्टींकडे बघायला पाहिजेत. सगळ्यात अगोदर तुम्ही एक स्मार्ट फोन मध्ये काय करता? हा स्वतःलाच प्रश्न विचारा. एक पेपर वर लिहा, टॉप 3 गोष्टी तुम्ही काय करता? उदाहरणं जास्त फोटो काढतात, फोन करता, विडिओ बघता, गेम खेळता.

ते सुद्धा रँक करा सगळ्यात जास्त महत्वाचा माझ्यासाठी फोन चा कॅमेरा आहे, दुसऱ्या नुंबर वर आहे गेमिंग, तिसऱ्या नंबर वर फोन चे दिसणे म्हणजे फोन चा design म्हणजे प्रत्येक माणसाचं एक युनिक रिक्वायरमेंट असते. आणि ते तुम्ही पेपर वरती लिहिल्यानंतर तुम्हाला कळेल, मला माझ्या स्मार्टफोनमध्ये हे पाहिजे. आणि मग तुम्ही एक राईट डिसिजन घेऊ शकतात.

दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही किती दिवस हा फोन वापरणार आहे. आता ती जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय-काय तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जनरली फोन किती दिवस वापरण्याचा विचार करता. जर तुम्हाला मला विचारले तर एक कुठलाही फोन असुदे कमीत कमी एक स्मार्ट फोन 2 वर्ष वापरला पाहिजे हे महत्वाचे आहे. जर तुम्ही 3-4 वर्ष वापरात असाल तर खूपच छान.

आजकाल इतके लवकर टेक्नॉलॉजी सारखी चेंज होते आणि चेंज होत राहणार आहे. पण याचा अर्थ असा नाही कि नवीन गोष्ट आली कि आपण नवीन फोन विकत घ्यायचा. कारण दर १ महिन्याने 2 महिन्याने, 6 महिन्याने अजून एक नवीन गोष्ट येणार आहे.

आत्ता जरी तुम्ही नवीन फोन खरेदी केला तरी तुम्हाला वाटणार आहे अरे मी एक महिना थांबायला पाहिजे होते. त्यापेक्षा सर्वात चांगली गोष्ट तुम्ही जेंव्हा तुमचा फोन पूर्णतः खराब झालेला आहे. अक्षरशः रिपेअर करू शकत नाही. आणि तुम्ही त्याच्यावर जर काम करायाचे आहे ते तुम्ही करू शकत नाही उदाहरणार्थ, तुम्ही फोन करता आणि फोनच होत नाहीये तर मग तुम्ही फोन चेंज करा.

बर आता फोन घेतांना आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणजे ग्लासबिल्ड आहे, मला ग्लास पाहिजे, ग्लास बिल्ड पाहिजे. अरे कशाला पाहिजे? प्लास्टिक असलं चांगला प्लास्टिक डिसाईन असला त्यावर कव्हर लावा लोकांना कळणार सुद्धा नाही. प्लास्टिक आहे कि ग्लास आहे.

पण जेंव्हा ग्लास डिसाईन चे तुम्ही फोन घेता म्हणजे तुम्ही त्यासाठी पैसे जास्त देता. ज्यांचे बजेट कमी आहे त्यांच्यासाठी आहे हे. दुसरी गोष्ट जसे मी पाहिले म्हणालो तुम्ही कश्यासाठी फोन वापरता? गेमिंग साठी दिवसभर त्यावर गेम खेळता. गेमिंग जास्त करू नका ते अजिबात चांगलं नाहीये.

पण समजा थोडे फार तुम्ही गेमिंग करत असाल किंवा अशी गोष्ट करत असला दिवसभर तुम्हाला फोन धरून ठेवावा लागतो तर तुम्ही विचार करायला पाहिजे कि जास्त हेवी फोन नको कारण कि दिवसभर तुम्ही धरून काहीतरी तुम्ही त्याच्यावर काम करणार असाल तर तुम्ही बोटे वगैरे दुखतील जास्त मोठा पण फोन नको.

छोटा असलेला बरा म्हणजे तुम्ही मॅनेज करू शकाल. या ज्या गोष्टी असता त्या विचार करणे खुप गरजेचे असते. पण तोच हेवी फोन दुसऱ्यांसाठी अतिशय चांगला असतो उदाहरणार्थ तुम्ही टूर वरती जाता, तुम्ही बाहेर फिरायला जाता आणि फोन वापरता आणि तुम्हाला त्याची जी बॅटरी लाईफ आहे ती दीड-दोन दिवस पाहिजे.

कारण कि तुम्ही बाहेर जाणार वापरणार, सारखं सारखं चार्ज करायला मिळणार नाही. तर तुम्ही मोठी बॅटरी लाईफ वाला फोन घ्या. पण तुम्ही फोन जास्त वापरात नसला पण 2-3 दिवस तुम्हाला बॅटरी लाईफ पाहिजे तर हेवी फोन घायला काही हरकत नाही. हे जे छोटे छोटे प्रश्न आहे, ते तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे.

आता मी डिस्प्ले बद्दल सांगतो सर्व म्हणता ते एमोलेड डिस्प्ले पाहिजे. पण का पाहिजे? जर का तुम्ही कंटिन्यूअसली सन लाईट मध्ये बाहेरच डायरेक्ट सनलाईट मध्ये फोन वापरत असाल तर हो किंवा माग तुम्ही जास्त मल्टि मीडिया वापरात असाल याचा अर्थ तुम्ही खुप विडिओ बघता, अर्धा दिवस नेटफिक्स वर असता तर हो एमोलेड मी हो म्हणेल.

बाकी सर्व जी लोक फोन करता, थोडेफार गेमिंग करता, इन फॅक्ट गेमिंग मध्ये तुम्ही 120 हर्ट घ्या फास्ट रिफ्रेश रेट त्याच्यामध्ये तुम्हाला मज्जा येईल. आणि एमोलेड घेतला आणि त्याच्यामध्ये जात फास्ट रिफ्रेश रेट नसला, तर तुम्हाला तेव्हडी मज्जा येणार नाही. तर हा सुद्धा प्रश्न विचारायचा कि हो एमोलेड आहे चांगला टेकनॉलॉजि आहे चांगली पण मला त्याची गरज आहे का?

सगळ्याच गोष्टी असणे चांगलेच आहे पण पैसे जास्त द्यावे लागतात. आपण एक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो O.S. म्हणजे ऑपेरेटिंग सिस्टिम्स. म्हणजे जे सॉफ्टवेअर असते फोन मध्ये त्याच म्हणजे अँड्रॉइड असते पण त्यावर्ती U.I. असते. आता तुम्ही कश्याशी कन्फर्टेबल आहात. कारण प्रत्येक फोन चे U I असते ते वेगळे असते.

म्हणजे तुम्ही MI चे बघा तुम्ही ‘रिअल मी’ चे बघा, विवो चे बघा ओप्पो चे बघा सर्वांचे स्वतःचे UI असता आणि त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात काही खराब गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही जेंव्हा फोन घेणार असला तेंव्हा त्याचे OS कुठले आहे हे नक्की बघा विचार करा आणि मग घ्या. त्याचे कारण सांगतो. सर्वात जास्त तुमचे जे इन्टेरेकशन होत असत.

म्हणजे तुम्ही स्मार्ट फोन वरती OS द्वारे म्हणजे गेम खेळता आहे, अँप ओपन करता आहे सर्व OS थ्रू होत असते. सर्व इन्टेरेकशन OS थ्रू होत असते त्यामुळे OS कुठली आहे त्यापेक्षा UI कुठली आहे हे नक्की लक्षात घ्या. आणि हो ज्या ब्रँड चा फोन घेत आहे ते ब्रॅण्ड्स अपडेट्स देता आहे का सिक्युरिटी रेगुरेली अपडेट्स येता का? एक वर्ष दोन वर्ष सॉफ्टवेअर अपडेट्स म्हणजे आता अँड्रॉइड 9 वर घेतलेलं अँड्रॉइड 10 अँड्रॉइड 11 मिळेल का या सर्व गोष्टींकडे बघणे महत्वाचे असते.

कॅमेरा बद्दल मला महत्वाचा सांगायचे आहे मेगा पिक्सल काउन्ट does नॉट काउन्ट. म्हणण्याचा उद्देश असा कि 64 मेगा पिक्सल 108 मेगा पिक्सल आहे म्हणून फोन घ्यायला काही अर्थ नाही. जरी 64 मेगा पिक्सल असला तरी 12 मेगा पिक्सल वाला दुसरा फोन चांगला फोटो काढू शकतो. Yes हा पिक्सल गेम नाही आहे हा.

त्याचा सेन्सर असता त्याचा OS असतो त्याचा ISP म्हणजे CPU किंवा image सिग्नल प्रोसससिंग म्हणजे image कशी प्रोसेस करता या सगळ्या त्यामध्ये असतात. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आणि मग पोस्ट प्रोसेसिंग होऊन तुमचा एक फोटो तयार होतो. 64 मेगा पिक्सल 108 मेगा पिक्सल सेन्सर आहे म्हणून जर का तुम्ही स्मार्ट फोन घेतला.

याची खात्री होत नाही कि तुमचा फोटो चांगला निघेल. त्यामुळे त्याच्यावर थोडे research करा. तुमच्यासाठी जर कॅमेरा महत्वाचा असला तर त्याचे features वगैरे बघा पण पिक्सल कडे लक्ष नका देऊ. जास्त मेगा पिक्सल असलेला कॅमेरा असला म्हणजे असे नाही कि चांगला फोटो निघेल.

आता कनेक्टिव्हिटी ऑपशन बद्दल बोलायचे झाले तर आज काल सर्व सारखेच येतात. NFC पाहिजे का तुम्हाला NFC ची काही गरज नाही NFC चे आपल्याकडे अँप्लिकेशन नाहीये. आपण जास्त वापरात नाही, त्याची गरज नाहीये. हो पण तुम्ही पावसाळ्यात जास्त फोन वापरात असाल जास्त बाहेर तुम्ही पाणी जिथे जास्त असेल अश्या ठिकाणी काम कारत असाल तिथं तुम्ही फोन वापरात असाल तर तुम्ही IP सर्टिफिकेशन नक्की बघायला पाहिजे जसे कि IP 52 सर्टिफाइड आहे IP 65 सर्टिफाइड आहे जे काही सर्टिसिकेशन असते ते आहे कि नाही बघा.

तुमची गरज काय आहे ते बघून स्वतःला प्रश्न विचारून नंतर स्मार्ट फोन घ्या. आता अजून 2 गोष्टी महत्वाच्या आहे ज्या तुम्हाला सांगणार आहे. फोन घेतल्यानंतर जर खराब झाला आणि तो तुम्हाला नीट करता आला नाही तो फोन तर किती महागात पडेल असा फोन.

म्हणजे तुम्ही 2 महिन्यापूर्वी नवीन फोन घेतला आणि खराब झाला त्याच सर्विस सेंटर जवळ नसले तर दूर कुठल्या सर्विस सेन्टर ला द्यावा लागतो मग तो महिना भर ठेवावा लागतो. त्यामुळे आफ्टर सेल सर्विस महत्वाची आहे. त्यामुळे इंटरनेट वर जा कशी सर्विस आहे, लोक काय म्हणत आहे त्याच्याशी बद्दल social मीडिया एखाद्या ब्रँड ची सर्विस कशी आहे हे नक्की शोधा आणि त्यानंतर निर्णय घ्या. त्यानंतर तुम्ही ज्या ब्रँड चा स्मार्ट फोन घेत आहे त्याचे सर्विस सेंटर 5-10 किलोमीटर पर्यंत असले पाहिजे हे महत्वाचं आहे.

आणि आता शेवटचा ज्वलंत प्रश्न 5G फोन घेऊ का नको?: तुम्ही जर एखादा फोन 4-5 वर्ष वापरणार असेन तरच तुम्ही 5G कडे लक्ष दया. आणि फोन घेतांना 5G हे महत्वाचे कारण नसावे. पाहिले परफॉर्मन्स नंतर कॅमेरा मग फोन ची बॅटरी, त्याचा डिस्प्ले आणि त्यानंतर मग 5G असे असायला पाहिजे.

5G ला जास्त महत्व देऊ नका. अजूनही कमीत कमी दीड ते दोन वर्ष आहे 5G ला भारतात येण्यासाठी. आणि जरी 5G आले तरी तुमच्या शहरात केंव्हा येईल हे माहिती नाही. जसे 4G खुप अगोदर आले पण ते पुण्यात येण्यास दोन वर्ष लागली. तसाच 5G येण्यास वेळ लागू शकतो.

बरेचशे ब्रॅण्ड्स 5G फोन लाँच करत आहे म्हणून तुम्ही घेण्याची गरज नाही. आणि शेवटी तुम्ही जेवढा बजेट ठरवता तेव्हड्याचाच फोन घ्या म्हणजे 15000 चा फोन घेणार असाल आणि 17000 मध्ये थोडे जास्त मिळत असेन तर असा करू नका. जे बजेट आहे त्याच्यामधे घ्या कारण बजेट तुम्ही सारखे वाढवू शकता. त्यामुळे जेवढे बजेट आहे त्यात फोन घ्या.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.