नवीन व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी म्हणजे काय? ।। या पॉलिसीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय फरक पडेल? ।। खरंच तुमचं वाहन १५ वर्ष जुनं झाल्यावर भंगारात द्यावं लागणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

मित्रांनो नमस्कार, वाहन धारकांनसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट आहे. तुमच्याकडे ही जर टू व्हिलर, थ्री व्हीलर किंवा फोर व्हिलर असेल तर हा लेख तुमच्या साठी खूप महत्वाचा आहे. कारण कि मित्रांनो 13 ऑगस्ट 2021 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी वाहनांन संदर्भातील व्हेहिकल स्क्रॅपिंग पॉलिसिची घोषणा केली आहे.

आणि देशामध्ये ही जी नवीन व्हेहीकल स्क्रॅपिंग पॉलिसी जी केंद्र सरकार ने आणली आहे ही पॉलिसी नक्की काय आहे, या पॉलिसीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय फरक पडेल होणार आहे का? या पॉलिसीमुळे सर्वसामान्यांचं नुकसान होणार कि फायदा याबद्दल ची माहिती तुम्हाला कळेल. त्याचप्रमाणे ही जी नवीन पॉलिसी आहे या पॉलिसी अंतर्गत नियम व अटी काय आहे याबद्दल ची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.

सर्वात प्रथम आपण बघुयात कि केंद्र सरकार ने ही जी व्हेहीकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणलेली आहे ती नेमकी काय आहे? : जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणातर्गत अनफिट आणि प्रदूषण करणारी वाहने पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने वापरातून रद्द करण्यासाठी ही पॉलिसी देशामध्ये आणली आहे. ही वाहने भंगारात काढण्यासाठी म्हणजेच व्हेहीकल स्क्रॅपिंग पॉलिसी देशामध्ये सुरळीत पद्धतीने लागू करण्यासाठी काही पायाभूत सुविधा या देशामध्ये उभारल्या जाणार आहे.

ज्या मध्ये देशामध्ये जागोजागी ऑटोमॅटेड टेस्टिंग स्टेशन्स आणि नोंदणीकृत वाहने भंगार सुविधा उभराल्या जाणार आहे. या नव्या स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत 15 आणि 20 वर्ष जुनी वाहने भंगारात काढली जाणार आहेत. यामध्ये जी व्यावसायिक वाहन आहेत त्या व्यावसायिक वाहणाला 15 वर्षानंतर भंगार घोषित केले जाऊ शकते, तर खाजगी कार साठी, खाजगी वाहणासाठी 20 वर्ष मर्यादा आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमची 20 वर्षांची वैयक्तिक कार कचऱ्या मध्ये विकली जाणार आहे. नवीन पॉलिसी नुसार वाहन धारकांना वाहणाला निर्धारित वेळेनंतर ऑटोमेटेड फिटनेस सेंटरमध्ये घेऊन जावे लागेल. याठिकाणी वाहनाची इमिशन सिस्टिम, ब्रेकिंग सिस्टिम, त्याचप्रमाणे सेफ्टी कंपोनंट अश्या प्रकारच्या टेस्टिंग होणार असून वाहन भंगारात काढली जाईल.

नवीन पॉलिसी नुसार 20 वर्ष जुनी असलेली वाहने जी फिटनेस चाचणी पास करू शकणार नाहीत किंवा ज्या वाहणांची पुन्हा नोंदणी करू शकणार नाहीत, त्यांची नोंदणी रद्द केली जाणार आहे. त्यांची आधीची नोंदणी पूर्णपणे रद्द ठरवली जाणार आहे, जेणेकरून त्यांना रस्त्यावर धावता येणार नाही. याशिवाय 15 वर्ष जुन्या खासगी वाहणांची पुन्हा नोंदणी करण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.आता ही जी स्क्रॅपेज पॉलिसी आहे.

या नवीन स्क्रॅपेज पॉलिसी चा कार मालकाला नेमका फायदा कशापद्धतीने होणार आहे. अतिशय महत्वाचा असा हा मुद्दा आहे. वाहनधारकांने ज्या वेळेस नवीन स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत आपले वाहन स्क्रॅप केले आहे. त्या नंतर त्या वाहन धारकाला जुने वाहन स्क्रॅप केल्यावर एक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवून ज्यावेळेस वाहनधारक नवीन वाहन खरेदीसाठी जाईल त्यावेळेस त्याला नवीन वाहन खरेदीवर पाच टक्के सुट्टी मिळणार आहे

आणि ही जी पाच टक्के सूट आहे ती वाहन कंपन्या देणार आहे. यानंतर नवीन वाहन खरेदी करणार्‍यांना म्हणजेच ज्या वाहनधारकांनी ते वाहन स्क्रॅप केले आहे अशा वाहन धारकांना नवीन वाहन खरेदी केल्यानंतर नोंदणी शुल्क हे भरावे लागणार नाही त्याचप्रमाणे नवीन वैयक्तिक वाहन खरेदीवर अशा वाहनधारकांना रोड टॅक्स मध्ये 25% सूट मिळेल.

त्याचप्रमाणे जे व्यावसायिक वाहन आहे अशा व्यावसायिक वाहन खरेदी करताना त्यांना रोड टॅक्स मध्ये 15% सूट ही मिळणार आहे. वाहन धारकांना जुने वाहन स्क्रॅप केल्यानंतर ज्या काही सवलती मिळणार आहे जो काही लाभ मिळणार आहे ते अशा प्रकारचा लाभ असणार आहे. यानंतर वाहन धारकांला त्याच्या जुन्या कार ची किंमत नेमक्या कोणत्या आधारावर ठरवली जाईल.

तर मार्च महिन्यात संसदेच्या अधिवेशना दरम्यान वाहन स्क्रॅप धोरण सादर करताना माननीय श्री नितिन गडकरी म्हणाले होते की स्क्रॅप करायच्या वाहनाची मूल्य नवीन वाहणाच्या एक्स शोरूम किमतीच्या आधारित असेल. रद्द केलेल्या वाहनाचे मूल्य ऐक्स शोरूम किमतीच्या चार ते सहा टक्के असू शकते.

यानंतर दुसरा मुद्दा आहे व्यावसायिक वाहणासाठी नेमके काय नियम आहेत ? : सुरुवातीला स्वयंचलित फिटनेस चाचणीच्या आधारावर व्यावसायिक वाहने रद्द केली जातील, तर खासगी वाहने नोंदणी न करण्याच्या आधारावर रद्द केली जातील. जर्मनी, ब्रिटन, अमेरिका आणि जपानसारख्या देशांच्या आधारे हे नियम ठरवण्यात आले आहेत.

यानंतरच जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जर वाहन फिटणेस चाचणी पास झाले नाही तर काय होईल ? : तर जी वाहने फिटनेस टेस्टमध्ये नापास होतील, त्यांना ‘एंड ऑफ लाईफ व्हेइकल’ म्हणून घोषित केले जाईल. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास वाहन भंगारात काढले जाणार असून, अशी वाहने रस्त्यावर चालवता येणार नाहीत. फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यात अपयशी ठरल्याबद्दल १५ वर्ष जुन्या व्यावसायिक वाहणांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव या धोरणात आहे.

पुढचा मुद्दा आहे जे व्हीटेज गाड्यांचे काय होणार ? : व्हिंटेज कार या त्या कार आहेत ज्या १९१९ ते १९३० मध्ये मनीफॅकछुर केलेल्या आहेत. आता मित्रांनो या ज्या व्हिंटेज गाड्या आहेत. या व्हिंटेज गाडयांना या धोरणातून वगळण्यात आले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत या गाड्यांबाबत लवकरच नवीन नियमावली जाहीर केली जाणार आहे.

यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नवीन नियम कधी पासून अंमलात आणले जातील ? : फिटनेस टेस्ट आणि स्क्रॅपिंग सेंटरशी संबंधीत नियम १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होतील. सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांची १५ वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्याचे नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील. व्यावसायिक वाहणासाठी आवश्यक फिटनेस चाचणीशी संबंधित नियम १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील, इतर वाहणासाठी आवश्यक असलेल्या फिटनेस चाचणीशी संबंधीत नियम १ जुन २०२४ पासून टप्प्याटप्प्याने लागू होतील.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.