प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायको मध्ये ह्या सात गोष्टी हव्या असतात ।। जाणून घ्या नवऱ्याच्या आपल्या बायकोबद्दलच्या असणाऱ्या अपेक्षा या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज पर्यंत सर्वात जास्त विनोद झालेला कोणता विषय असेल तर तो नवरा बायकोचा. आज पर्यंत प्रत्येकाच जीवन या विषयाशी निगडित आहे. आज मी इथे बायकोने आपल्या नवऱ्याशी कसे वागावे? आणि त्याच्या अपेक्षांची कशी पूर्तता करावी? याविषयी सांगणार आहे. प्रत्येक नवर्‍याला वाटते की आपल्या बायकोने या सात गोष्टींचे पालन आपल्या संसारात करायला पाहिजे आणि असे झाल्यास कोणत्याच नवरा बायकोचे भांडण होणार नाही.

प्रत्येक नवरा आपल्या बायको कडून कोणता अपेक्षा करतो? ते आपण पाहू. प्रत्येक नवरा कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करत असतो तो कधी रागावतो, कधी भांडतो परंतु त्याचे भांडण आणि रागही कायम नसतो. नवरा म्हणजे कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ असतो. नवरा म्हणजे सह्याद्री. भक्कम पर्वता सारखे कुटुंबाचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करतो.

मुलांच्या भविष्यासाठी जबर तो पत्नीच्या सुखासाठी नेहमीच प्रयत्नात असतो आणि नात्यांची वीण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी तो नेहमी तडजोड करतो, तो म्हणजे नवरा. कुटुंबाच्या जवळ गेलास बायको टोमणे मारते, तर बायकोच्या जवळ गेल्यास कुटुंब दुरावते. असा व्यक्ती म्हणजे नवरा. ठेच लागली की आई ग परंतु मोठ्या संकटात बापरे असा ज्याचा गजर होतो तोसुद्धा नवरा. शेकडो नाते सोडून सोबत येणाऱ्या पत्नीच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करणारा हा नवराच असतो.

तर मुलांच्या भविष्याच्या गरजांसाठी अखंड स्वतःला वाहून देणार ही नवराच असतो. इतरांच्या अपेक्षा पूर्ण होताना स्वतः मात्र कुठलीही अपेक्षा न करता अविरतपणे कर्तव्य बजावणारा कर्तव्य पुरुष म्हणजेच नवरा. कुटुंबाचा आधार असलेल्या नवऱ्याच्या आपल्या बायकोकडुन कोणत्या अपेक्षा असतात? ते आता आपण पाहू.

1. पत्नीने नवऱ्याला नात्यांच्या कात्रीत पकडून नये : एका कर्तव्यदक्ष नवऱ्याला सर्व नात्याची पूर्तता करणे गरजेचे असते. आई-वडील आणि पत्नी यामध्ये अडकलेला असतो तो म्हणजे नवरा. पत्नीला नवरा हवा असतो परंतु नवऱ्याचे नातेवाईक बरेच वेळा बोचतात. अर्थात प्रत्येक स्त्रीचा हा प्रश्न असतो असेही नाही बरं का. नवऱ्याला अशावेळी बायको की आई वडील असा प्रश्न पडलेला असतो.

खरं तर दोन्ही गोष्टी त्याला श्वास एवढा आवश्यक असतात म्हणून कर्तव्यदक्ष पत्नी बनण्यासाठी प्रत्येक स्त्रीने या गोष्टीला स्वतःच्या कौशल्याने संभाळला हवा. पतीवर राग व्यक्त केल्यापेक्षा बसून चर्चा करायला हवी. कारण निसर्गाने स्त्रीला दुःख रडून मोकळा करण्याचे स्वातंत्र्य आणि तशी भावनात्मक बनवलेले असते. परंतु पुरुषाला पुरुष पणामुळे सहसा रडता येत नाही. तो स्वतः आपल्या आत मध्ये जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्या हातावर हात देऊन त्याला साथ द्या. त्याच्या सर्व नात्याला जपण्याचा प्रयत्न करा.

2. नवरा मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नका : पाण्याला जर मुठीत घट्ट धरले तर काय होईल ? आणि हातात बसेल का ? नवऱ्याची अगदी ती स्थिती असते. नवरा कधीही हातात येत नसतो आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांचा तो त्यांचा भ्रम असतो. तो फक्त विश्वासाने, प्रेमाने, आपलेपणाने जवळील असतो. दिवसभर घराबाहेर राहणारा नवरा फक्त आणि फक्त प्रेमाने जवळ जाऊ शकतो. तुम्ही त्याला मुठीत ठेवणे शक्य नसते.

3. प्रत्येक पत्नी ने पती चा आदर करायला पाहिजे : परिस्थिती कशीही असो पत्नीने पतीचा आदर ठेवलाच पाहिजे. कारण जेव्हा घरातील स्त्रीच जर आदर ठेवत नसेल तर अशा घरातील पुरुष घराबाहेर पडताना आत्मविश्वासाने बाहेर पडू शकत नाही. घरातील प्रत्येक क्षणाचा परिणाम तिच्या कर्तव्यावर आणि दिवसभरातील प्रत्येक घडामोडीवर पडत असतो. त्याची पत्नी त्याच्या पाठीशी खंबीर असते. तो डोंगराला धडक दयायला ही मागे सरत नसतो. आणि ज्या पतीचा चा घरात आदर होतो त्याचा समाजातही आदर होतो.

4. दोघांचे भांडण दोघातच ठेवावे : ते दोघातच असायला पाहिजे. पती पत्नीचे भांडण होणे सहाजिक आहे परंतु जेव्हा हे भांडण तिसऱ्याचा पर्यंत जाते तेव्हा त्याला फाटे फुटतात. एक सत्य गोष्ट असते की सोबत तर दोघांना राहतेच आहे मग, आपण यातील वाद बाहेर न काढता दोघांमध्येही ठेवायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचे सिक्रेट संपले की नात्याचा गोडवा कमी होतो. शिवाय इतरांच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज किंवा भांडण संपवण्या ऐवजी वाढू शकतात त्यामुळे कोणताही गुंता दोघातच सोडवायला हवा.

5. तुम्ही स्त्री आहात हे कधीच विसरू नका : अनेक वेळा नोकरी करणाऱ्या स्त्रियांना किंवा घरकाम करणाऱ्या महिलांना ही असं वाटत असतं की आम्हीच सर्व का करायचे? परंतु निसर्गाने स्त्रीला स्त्रीत्व बहाल केले ते जोपासायला हवा. आपण कितीही प्रयत्न केला तरी शारीरिक प्रकृती ठरलेले असल्याने समाजात वावरताना कर्तव्य बजावताना आणि मातृत्वाच्या मातृत्वाच्या कर्तव्यात पुरुषां सारख्या सर्व गोष्टी करणे शक्य नसते.

तेव्हा अशावेळी काही गोष्ट गोष्टी मान्य केल्यास आयुष्य जगणं सहज सोपं जातं प्रत्येक गोष्ट पती सोबत शेअर करा. दुःख – आनंद यासोबतच पत्नी आपली स्वतःची चूक सुद्धा नवऱ्या सोबत शेअर करायला पाहिजे. संसारातील प्रत्येक गोष्ट ही घटना पतीसोबत शेअर करणारी पत्नी प्रत्येक पुरुषाला आवडत असते. यामुळे नाते घट्ट होत जाते, विश्वास वाढत जातो.

6.अपेक्षा आणि परिस्थितीचा विचार सुद्धा करायला पाहिजे : पत्नीला अनेक वेळा मोठा गिफ्ट व दागिने त्याचा मोह आवरत नाही आणि ही जरी सहाजिक गोष्ट असली तरीही पतीच्या खिशाचा आणि स्थितीचा विचार करणारे पत्नी पतीच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.

7.कधीच शेजाऱ्याची बरोबरी करू नये : कारण अनेक ठिकाणी ऐश्वर्य संपन्न आयुष्य असताना सुद्धा समाधान, आनंद नसतो. त्यामुळेच, प्रत्येक पत्नीने माझा संसार जगातील सगळ्यात चांगला संसार आहे ही मनाशी खूणगाठ बांधावी. पत्नीचा सर्वात मोठा दागिना नवरा आणि सर्वात मोठे ऐश्वर्या आपला संसार आणि मुले असतात. मित्रांनो नवरा-बायकोच्या नात्यांची वीण घट्ट राहण्यासाठी प्रत्येक नवरा बायकोने साशंक सुद्धा असू नये.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.