एखाद्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे पेशंटचा मृत्यू झाल्यास कायद्यात काय तरतुदी आहेत?

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

उपचार ही आजच्या काळाची मूलभूत गरज आहे. आजारी व्यक्तींवर विज्ञानाच्या मदतीने उपचार केले जातात. सरकारद्वारे उपचारासाठी डॉक्टरांची नोंदणी केली जाते. हे नोंदणीकृत डॉक्टरच त्यांच्या पद्धतीने उपचार करू शकतात. अॅलोपॅथीचा कोणताही नोंदणीकृत डॉक्टर अॅलोपॅथीने उपचार करू शकतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक, होमिओपॅथी डॉक्टर देखील आहेत, जे त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनुसार उपचार करतात.

एखाद्या पेशंटचे जर एखादे ऑपरेशन करायचे असेल तर ते अॅलोपॅथी मधील डॉक्टरच करू शकतात. परंतु काही वेळा असे दिसून येते की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चुकीचे ऑपरेशन केले जाते किंवा काही चुकीची औषधे दिली जातात, ज्यामुळे रुग्णाचे कायमचे नुकसान होते. काही वेळा रुग्णांचा मृत्यूही होतो. मात्र, डॉक्टरांचा निष्काळजीपणा सिद्ध करण्यासाठी पेशंटकडे कमी पुरावे असल्याने डॉक्टरांचा निष्काळजीपणा सिद्ध करणे अवघड आहे.

डॉक्टर साहेबांद्वारे रुग्णांना विविध रोगांसाठी विविध औषधे लिहून दिली जातात. जेणेकरून रुग्ण त्याच्या आजारपणामधून बरा होईल. औषधे देताना डॉक्टरांना बराच विचार करून औषधे द्यावे लागतात जेणेकरून रुग्णाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये. परंतु काही वेळा निष्काळजीने डॉक्टर आपली जबाबदारी नीट पार पाडत नाहीत. यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो किंवा रुग्णाला काही गंभीर इजा होते. काही वेळेला ऑपरेशन करताना झालेल्या चुकीमुळे रूग्णाला कायमस्वरूपी अपंगत्व येते. नक्कीच कोणतेच डॉक्टर जाणून-बुजून असे कृत्य करणार नाहीत, परंतु त्यांची चूक किंवा निष्काळजी याला करणीभूत ठरते. कायद्याने डॉक्टरांचे असे काम गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवले आहे.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणा मुळे झालेले नुकसान : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचे कोणतेही नुकसान झाले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू होत नसून शरीराचे किरकोळ नुकसान होत असेल तर अशा नुकसानीस डॉक्टर जबाबदार धरले जातात. यावर फौजदारी कायदाही आहे. फौजदारी कायदा म्हणजे ज्या कायद्यात एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते. डॉक्टरांचा निष्काळजीपणा हा गुन्ह्याच्या श्रेणीत येतो, अशा निष्काळजीपणाचा उल्लेख भारतीय दंड संहिता 1860 मध्ये करण्यात आला आहे.

IPC 337 : भारतीय दंड संहितेचे कलम ३३७ निष्काळजीपणामुळे होणाऱ्या किरकोळ नुकसानाशी संबंधित आहे. मात्र, या कलमात डॉक्टर असा कोणताही शब्द नाही. परंतु सर्व प्रकारच्या निष्काळजीपणाच्या बाबतीत ते लागू होते. कोणत्याही व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे समोरच्या व्यक्तीच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे किरकोळ नुकसान झाले तरच हे कलम लागू होते.

या कलमानुसार डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे किरकोळ नुकसान झाल्यास  ( उदाहरणार्थ, ऑपरेशनमध्ये डॉक्टरांच्या चुकीमुळे/निष्काळजीमुळे काही गुंतागुंत निर्माण होणे, चुकीच्या औषधांमुळे रुग्णाचे किरकोळ शारीरिक/मानसिक नुकसान होणे )  हे कलम लागू होते. या कलमात 6 महिन्यांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

IPC 338 : भारतीय दंड संहितेचे कलम ३३८ एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजी कृत्यामुळे दुसऱ्याला झालेल्या गंभीर दुखापतीवर लागू होते. कधी-कधी निष्काळजीपणा इतका असतो की समोरच्या व्यक्तीचे गंभीर नुकसान होते. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की हानी म्हणजे शारीरिक हानी, ज्याला कायद्याच्या भाषेत नुकसान म्हणता येईल.

जर कोणत्याही निष्काळजीपणामुळे एखाद्याला गंभीर दुखापत झाली आणि कायमचे अपंगत्व आल्यास हे कलम लागू होईल. डॉक्टरांच्या बाबतीतही कलम लागू होऊ शकते. डॉक्टरांनी आपल्या उपचारात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा केल्यास आणि अशा निष्काळजीपणामुळे रुग्णाला कायमची दुखापत झाली, तो कायमचा अपंग होऊन त्याचे जगणे कठीण झाले, तर डॉक्टरांवर या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.

भारतीय दंड संहितेच्या या कलमानुसार दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. कोणत्याही निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत होणे हा या कलमाचा मूळ अर्थ आहे. वाहन अपघाताच्या बाबतीतही हे कलम लागू होते.

सिव्हिल केस : डॉक्टरांचा निष्काळजीपणा कोणत्याही रुग्णाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एखादी व्यक्ती कायमची अपंग होऊ शकते. अशा अपंगत्वामुळे त्याला आयुष्यभर कोणतेही काम करता येत नाही, त्यामुळे त्याच्या आयुष्यात आर्थिक संकट येते. अश्या परिस्थितीत त्या व्यक्तीचे जगणे कठीण होऊन बसते अशी अनेक प्रकरणे आहेत. अशा लोकांना कायद्याने दिलासा दिला आहे.

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 : डॉक्टरांच्या सेवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत ठेवण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याचा मूळ उद्देश म्हणजे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे. सेवा पुरवणाऱ्या किंवा उत्पादनाची विक्री करणाऱ्या व्यक्तीने असे कोणतेही कृत्य केले असेल, ज्यामुळे ग्राहकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले असेल, तर ग्राहक संरक्षण कायद्यान्वये खटला भरला जातो.

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या न्यायालयाला ग्राहक मंच म्हणतात. कोणत्याही प्रकारची कोर्ट फी या न्यायालयात भरावी लागत नाही. लोकांना पूर्णपणे मोफत न्याय देण्याचे काम ग्राहक मंच करते. मात्र, येथे केसेसची वर्दळ आणि न्यायालये कमी असल्याने न्याय मिळण्यास थोडा वेळ लागतो.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ग्राहक मंचाकडून केली जाते. रुग्ण ग्राहक मंचात आपली केस नोंदवू शकतात. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अशा प्रकरणांमध्ये डॉक्टरांना प्रतिवादी आणि रुग्णाला वादी बनवले जाते. या मंचात रुग्ण मंचाकडे आर्थिक स्वरुपात नुकसान भरपाईची मागणी करतो. ग्राहक मंचामध्ये केस सिद्ध केल्यानंतर पीडित पक्षाला डॉक्टरांकडून नुकसान भरपाई मिळते. परंतु येथे केस सिद्ध होणे आवश्यक आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. डॉक्टरांचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास रुग्णाला प्रतिवादी कडून ( डॉक्टर/हॉस्पिटल ) भरपाई दिली जाते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.