नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज नक्की लाईक करा.
हाउ टू मेक मनी, म्हणजे 10 सेकंद चि क्लिप झाली, एखादा फोटो झाला, तर त्याची किंमत करोड मध्ये जाते. फोटो सेल करून सुद्धा आपण करोडपती होऊ शकतो आहे एवढी पावर आहे या एन एफ टी मध्ये. त्यामुळे आज आपण इथे, NFT म्हणजे काय? ते बघणार आहोत ते कसं सेल केलं जातं? आणि कशाप्रकारे त्याचे पैसे मिळतात ? NFT कोणीही करू शकतो आणि त्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. अगदी घरबसल्या तुम्ही करोडपती होऊ शकता. त्यामुळे एन एफ टी म्हणजे काय त्याची प्रोसेस म्हणजे काय? आपण डिटेल्स मध्ये बघू.
एन एफ टी म्हणजे काय तर, नॉन फंजिबल टोकन. नॉन म्हणजे नाही, फंजिबल म्हणजे रिप्लेसेबल आणि टोकन म्हणजे एकाद्या प्रकारचं सर्टिफिकेट. म्हणजेच असं सर्टिफिकेट जे कधीच रिप्लेस एबल नाही आहे. किंवा अशी गोष्ट जी कधीच रिप्लेस होऊ शकत नाही. जी फक्त तुमच्या मालकीचे आहे.
◼️उदाहरण : १. जसं की मोनालिसा ची पेंटिंग. ताजमहल किंवा ताजमहल एकदाच झाले ते पुन्हा बनणार नाही. त्यामुळे ती एक एकमेव गोष्ट आहे. म्हणजे रिप्लेसेबल नाहीये. तसं थोडक्यात सांगायचं झाला तर समजा, एखादी गोष्ट आहे, लता मंगेशकर जा आहेत. त्यांनी एक नोट आहे पाचशे रुपयाची आणि त्यावर सही केली आणि ती समजा आपल्याकडे आहे.
लतादीदी आता आपल्यामध्ये नाहीयेत त्यामुळे अशी पाचशेची नोट पुन्हा आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे जी माझ्याकडे नोट आहे तिला भरपूर किंमत आहे. पाचशेच्या नोटा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या आहेत, पण हि जी पाचशेची नोट आहे तिला काही खासियत आहे. ही वेगळी आहे. कारण की त्यावर त्यांची सही आहे. त्यामुळे जर मी या नोटच एन एफ टीमध्ये कन्वर्जन केलं तर, त्याची भरपूर सारी बोली लागू शकते.
भारतातच नाही तर जगभरात त्यांचे खूप चहाते आहेत. त्यामुळे त्या पाचशे रुपयांसाठी कुणी हजार ची बोली लावेल, कुणी लाखाची बोली लावेल, कोणी करोडची सुद्धा बोली लावू शकेल. त्यामुळे त्या एका 500 रुपये च्या नोटीची आपल्याला भरपूर सारे पैसे मिळतील. म्हणून अशा ज्या काही गोष्टी आहेत, ज्या युनिक आहेत ते विकून आपण येथे पैसे कमवू शकतो शकतो.
नॉन फंजिबल टोकन म्हणजे एखादी अशी गोष्ट जी रिप्लेस केली जाऊ शकत नाही. त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे. स्वतःच्या मालकीचा आहे आणि अशी गोष्ट जी तुम्ही विकु शकणार आहात. टोकण म्हणजे जी पाचशेची नोट माझ्याकडे आहे, आणि ती नोट समोरच्याला जर विकत आहे तर तो कशावरून मानेल की ही गोष्ट माझीच आहे? तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही तर सर्टिफिकेट असायला हवा आणि जर ते सर्टिफिकेट माझ्याकडे असेल तर तो ती गोष्ट हसी खुशी माझ्याकडून घेऊ शकेल. कारण त्याला माहित आहे की ती गोष्ट माझीच आहे. ती मी काही कुठून चोरलेली नाही, खोटी गोष्ट नाही. तर याच सर्टिफिकेट ला टोकण असं म्हणलं जातं आणि हे जे टोकन आहे हे ब्लॉक चैन मध्ये स्टोअर केला जातो.
आता ब्लॉक चेन म्हणजे काय? तर भरपूर सारे कम्प्युटर्स त्यांचे इथेरियम ब्लॉक चेन चे जाळे असते. त्याच्यामध्ये हे डाटा स्टोअर केला जातो. हे जगातील सगळ्यात सेफ नेटवर्क आहे. काही दिवसांनी ज्या शाळा, बँका आहेत त्या याच प्रोसेसमध्ये येणार आहेत. कारण हा डाटा आपण कधीच डिलिट करू शकत नाही. म्हणजे जर आपला कम्प्युटर आहे, त्याच्यावरून जर हे सर्टिफिकेट उडवलं किंवा दुसऱ्या कोणत्याही एक्स, वाय , झेड अशा कोणत्याही कम्प्यूटर वरुन तुम्ही उडवलं हे जरी केलं तरी तरी अशी भरपूर मोठी चेन आहे त्यामुळे ते कधीच डिलीट होऊ शकत नाही.
म्हणजे एखादी गोष्ट जी आपण बनवली आहे त्याचे सर्टिफिकेट आपल्याकडे आहे तरी ते आयुष्यभर मरेपर्यंत जोपर्यंत ती ब्लॉकचेन आहे तोपर्यंत ते राहणार आहे. त्यामुळे याचा फायदा असा होतो की आपण एखादी गोष्ट विकली जर ती आपल्या मालकीची आहे तर आपल्याला त्याची रॉयल्टी मिळते. दुसऱ्याने विकत घेतली परत ती विकली तर त्यामुळे आपण भरपूर सारे पैसे मिळू शकणार आहोत.
◼️आता आपण काही टॉप सेलिंग एन एफ टी बद्दल माहिती बघू : १. ट्विटरची जी पहिली पहिली ट्विट आहे ती 21 करोड रुपयांना विकली गेली होती. तर एवढी मोठी ताकत आहे या एन एफ टी मध्ये. याची अजून काही उदाहरणे आहेत ती पण बघू.
२. एक माकडाचे चित्र होतं ज्याला आर्ट करून क्राउन घातला होता आणि त्याची बोली 20 करोड लावली होती. आणि 23 करोड रुपये ला गेल सुद्धा होतं. एवढी किंमत द्यायला त्याच्यामध्ये काही सुद्धा नव्हतं, तरीही त्याची बोली 20 करोड होती. त्यामुळे तुम्ही असं काही हटके बनवू शकता. मग ते काहीही असू शकतो किंवा दहा सेकंदाचा व्हिडीओ असू शकतो, फोटो असू शकतो, काहीही असू शकतो. ते आपल्याला त्या NFT सेलिंग च्या वेबसाईट वर टाकायचा आहे. आपल्याला जर हे अस एखाद हटके काहीही विकायचा असेल तर त्यासाठी वॉलेट लागत. त्याच एक ॲप आहे ज्यावर आपण हे क्रिप्टो ठेऊ शकतो. आपले जे पण क्रिप्टो विकले जाणार आहेत, त्याचे पैसे आपण आपल्या बँक बँकेमध्ये पाठवू शकणार आहोत. त्यासाठी ते वॉलेट लागणार आहे.
२. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ होता. जेव्हा ते हरले होते तेव्हा बनवला गेला होता. दहा सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. पण तरीसुद्धा त्याला 48 कोटी रुपये मिळाले. म्हणजेच दहा सेकंदाचे व्हिडिओ ला 48 कोटी रुपये मिळू शकतात. म्हणजेच एकदाची अख्खी लाईफ बनून जाईल. याचा फायदा असा पण आहे की हे आपण इंडिया मध्येच नाही विकत तर आपण हे ज्या वेबसाईटवर टाकतो, त्यावर लोक जगभर जगभरातून येतात. इथून ते घेतात त्यांना जे आवडतं ते ते विकत घेतात आणि ते त्यांच्या मालकीचं होऊन जातं. नंतर ते त्यांचं काहीही करू शकतात.
३. एका मुलाने सेल्फी अपलोड केला ती पण लाखो रुपयांमध्ये गेलेली आहे. एन एफ टी कशी बनवायची? तर जर तुम्हाला फोटो शूट येतो, डिझाईनिंग येतो, जर तुमचं आर्किटेक्चर झाला आहे. अशी कोणतीही गोष्ट जी तुम्ही युनिक करू शकता. मग ते तुम्ही मोबाईल द्वारे पण बनवू शकता. लॅपटॉप वर ही बनवू शकता किंवा तुम्हाला फोटोग्राफीचा नाद आहे तर तुम्ही एखादा फोटो काढला जो एकदम युनिक आहे. एकदम हटके आहे. आणि जो फक्त तुमच्याकडे आहे. तर तर त्यातही तुम्ही एन एफ टी करू शकणार आहात.
3. किंवा तुम्ही एखाद्या किल्ल्यावर गेला आहात आणि तिथे तुम्हाला एखादी विशिष्ट जुनी गोष्ट सापडली आणि ते युनिक काय आहे, तर त्याचा ही तुम्ही एन एफ टी करून विकू शकणार आहात. यामध्ये असं नाही आहे कि एखाद्याकडे खूप टॅलेंट आहे, म्हणजे फक्त तोच पैसे कमवू शकतो किंवा एखाद्या कडे कमी टॅलेंट आहे तर तो कमी पैसे कमवू शकतो. तर असं काही नाहीये. एखादी नविन युनिक गोष्ट जर तुम्हाला बनवता आली, तर त्याद्वारे तुम्ही लखपती काय करोडपती सुद्धा होऊ शकता. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा.
NFT बद्दल तुम्हाला अजून काय माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा महित लवकरच त्यावर लेख लिहून आपल्या वेबसाईटवर टाकू.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.