जेव्हा परिस्थितीमुळे निराश व्हाल, निक व्हुजिकिकबाबत जरुर वाचा !

आंतरराष्ट्रीय

अनेकदा जीवन आणि संघर्ष समानार्थी शब्द असावेत की काय अशी परिस्थिती आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला येते. परिस्थिती, आर्थिक, सामाजिक, अशा अनेक घटकांमुळे पराभवाचा सामना करावा लागतो. कितीही प्रयत्न करावेत, अनेक मार्ग शोधावेत तरी एका वळणावर निराशेचा सामना होतोच.

अनेकदा आपण खचतो, कंटाळून प्रयत्न सोडून देतो. कधी परिस्थितीला दोष देत अर्ध्या वाटेतच प्रयत्न करणं सोडून देतो. खरं पाहता संघर्षाच्या काळात, माणूस जितका मेहनती बनतो, तो इतर कोणत्याही प्रसंगी दिसत नाही. तरीही व्यक्ती संघर्षाकडे नकारात्मक दृष्टीकोनाने बघतात. त्यामुळेच अनेकदा प्रयत्नाने रस्ता पुर्ण करण्याऐवजी मार्गमध्येच सोडून देणं पसंत केलं जातं.

4 Inspiring Life Lessons from Nick Vujicic | Paul Sohn

खरं तर निराशावादी न होता माणसाने प्रयत्नांची कास धरली पाहिजे. आयुष्यात कधीही निराश वाटलं, सगळ्यांनी पाठ फिरवली, सगळे मार्ग बंद झाले असं वाटलं तर खचून जाऊ नका. ऑस्ट्रेलियाच्या निक व्हुजिकिकबाबत वाचलं तर आपला आतापर्यंतचा संघर्ष फिका वाटू लागेल. 4 डिसेंबर 1982 मध्ये ऑस्ट्रेलियात निकचा जन्म झाला.

जन्मावेळी तो इतर मुलांप्रमाणेच सर्वसाधारण होता. पण Phocomelia या दुर्धर आजाराने त्याला जन्मत:च ग्रासलं. या आजारामुळे निकच्या हाताची आणि पायांची वाढच झाली नाही. शरीराच्या नावाखाली केवळ धड असताना आणि डोळ्यासमोर उभं आयुष्य पडलेलं असताना कसं जगायचं या विचारानेच एखाद्याने हाय खाल्ली असती.

Nick Vujicic: Born without Limbs but Loving His Life and Purpose | Nick vujicic, Nick vujicic quotes, Faith in humanity restored

पण हा पठ्ठ्या जिगरबाज निघाला.एका अपंग व्यक्तीच्या गोष्टीने निकला प्रेरित केलं. आपणही काहीतरी करु शकतो हा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. पायाच्या जागी असलेली बोटं आणि काही उपकरणांच्या मदतीने निकने टाईप करायला शिकून घेतलं. यानंतर तुमच्या आमच्या प्रमाणेच त्याने अकाउंटिंग आणि फायनान्सची पदवीही घेतली.

जगभरात प्रेरक वक्ता म्हणून ओळखलं जात असलेला निक Life Without Limbs या NGO च्या माध्यमातूनही कार्यरत आहे. हात आणि पाय नसलेल्या निकला फुटबॉल आणि गोल्फ खेळायची आवड आहे. याशिवाय त्याला पोहायला आणि स्कायडायव्हिंग करायला ही अतिशय आवडतं. निकच्या जीवनशैलीने आजवर अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे तुम्हालाही कधी निराश वाटलं तर निकचा प्रवास डोळ्यासमोर आणायला विसरु नका.