काय आहे सेन्सेक्स (SENSEX) आणि निफ्टी(NIFTY)?।। जाणून घेऊया स्टॉक मार्केट बद्दल थोडक्यात !

अर्थकारण शैक्षणिक

नमस्कार ,आज आपण सेन्सेक्स आणि निफ्टी याबद्दल माहिती पाहणार आहोत. प्रत्येकालाच सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय असतं ? याबद्दल उत्सुकता असते. जेव्हा आपण दूरदर्शन वर सातच्या बातम्या बघायचो तेव्हा सांगण्यात यायचे की, आज सेन्सेक्स इतक्या अंकांनी घसरला किंवा इतक्या अंकांनी वधारला,तेव्हा एक उत्सुकता असायची की, सेन्सेक्स नक्की काय आहे?

आता आपण सेन्सेक्स आणि निफ्टी नेमका काय आहे हे जाणून घेणार आहोत. व त्यांच नेमक काम काय आहे? तुम्ही त्यात प्रत्यक्ष गुंतवणूक करू शकता का? किंवा तुम्ही त्यात अप्रत्यक्षरीत्या कशी गुंतवणूक करू शकता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहे.

तर सेन्सेक्स व निफ्टी समजून घेण्याआधी आपण स्टॉक एक्सचेंज बद्दल जाणून घेऊया, तर भारतात दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. व दोन्ही मुंबईत आहेत.1)BSE 2)NSE. NSE बीकेसी ला आहे व BSE दलाल स्ट्रीट ला आहे. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यात 5000 पेक्षा जास्त कंपन्याची गुंतवणूक आहे.

तर Nse मध्ये 1600 पेक्षा जास्त कंपन्यांची गुंतवणूक आहे. NSE हा आकड्यांच्या दृष्टीने भारतातला सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे. सेन्सेक्स हा BSE चा मुख्य निर्देशांक आहे. व निफ्टी हा NSE चा मुख्य निर्देशांक आहे. तर आता मुख्य निर्देशांक म्हणजे काय असतं?

आपण पाहिलं की BSE मध्ये 5000 पेक्षा जास्त कंपन्यांची गुंतवणूक आहे. जर BSE मध्ये म्हणजे स्टॉक मार्केट मध्ये काय चालू आहे? स्टॉक मार्केट ची आज काय परिस्थिती आहे हे माहिती करायचं असेल तर तुम्हाला जवळपास सर्व कंपनीची माहिती काढावी लागते म्हणून प्रत्येक कंपनी काय करत आहे व त्यानंतर तुम्ही माहिती करू शकाल की सर्व मार्केट कसे चालू आहे.

तर मार्केट वर आहे की खाली आहे की, तिथेच आहे या साऱ्या गोष्टी समजणे कठीण आहे. NSE वर सुद्धा 1600 पेक्षा जास्त कंपन्यांची गुंतवणूक आहे. तर या सर्व कंपन्यांची माहिती काढण खूप अवघड आहे. हाच प्रश्न सोडविला आहे, निफ्टी आणि सेन्सेक्स ने म्हणजे काय तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शोधायची गरज नाही.

सहज तुम्ही सेन्सेक्स व निफ्टी कडे बघून सांगू शकता की, आज मार्केट वर आहे की खाली. उदा. जेव्हा आपण बघतो की सेन्सेक्स व निफ्टी खूप वर गेले आहेत तेव्हा आपण म्हणतो की स्टॉक मार्केट वर गेले आहे .सेन्सेक्स व निफ्टी डाउन होते, तेव्हा आपण म्हणतो की मार्केट डाऊन आहे.

तर तुम्ही सहज सेन्सेक्स व निफ्टी कडे बघून मार्केटची परिस्थिती बघू शकता. आपण असं म्हणू शकतो की सेन्सेक्स व निफ्टी मार्केटचे निर्देशक आहेत. आता त्याचे प्रभाग समजून घेऊ. सेन्सेक्स मध्ये 30 कंपनी आहे. व निफ्टी मध्ये वेगवेगळ्या प्रभागाच्या 50 कंपनी आहेत.

वेगवेगळ्या प्रभागाच्या सेन्सेक्स चा फुल फॉर्म आहे. सेन्सेक्स = सेन्सेटिव्ह इंडेक्स. निफ्टी = नॅशनलफिफ्टी. सेन्सेक्स हा शब्द Sensitive index मिळून बनला आहे. व निफ्टी हा शब्द National fifty मिळून बनला आहे, निफ्टी म्हणजे त्यात 50 कंपनी आहे म्हणून.

सेन्सेक्स ने काय केले तर वेगवेगळ्या सेक्टर च्या टॉप कंपनी आहे त्यांना पकडले आहे, म्हणजे आयटी सेक्टर च्या टॉप कंपनी जसे TCS व इन्फोसिस, फार्मा सेक्टर च्या सन फार्मा व डॉक्टर रेड्डी, बँकिंग सेक्टर च्या axis, HDFC यांना सेन्सेक्स मध्ये स्थान दिले आहे. म्हणजे या सर्व टॉप कंपनी यात या प्रभागाला दर्शवतात.

त्यामुळे सर्व मार्केटची परिस्थिती जाणण्यासाठी आपल्याला मदत मिळते. सेन्सेक्स व Nifty मध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वजन असते, त्याबद्दल आपण जाणून घेऊया . जसा सेन्सेक्स मध्ये 30 कंपनी आहे तर Nifty मध्ये 50 कंपनी आहे सेन्सेक्स मधल्या तीस कंपन्यांना निवडण्याचे काम BSE करते आणि निफ्टी मध्ये ज्या 50 कंपनी आहेत.

त्यांना निवडण्याचे काम NSE करते, जेव्हा एखादी कंपनी खराब कामगिरी करायला लागते, तेव्हा तिला सेन्सेक्स व निफ्टी मधून बाहेर काढतात,त्याबदल्यात जी कंपनी चांगले सादरीकरण करते तिला प्रवेश दिला जातो. आता निफ्टी बद्दल माहिती पाहूया निफ्टी सध्या बघायचं झालं.

तर जानेवारी 2021 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे सर्वात जास्त म्हणजे 10.66 % weight आहे. त्यानंतर HDFC bank Ltd. 10.37 %, Infosys ltd 7.64 % अशाप्रकारे विविध कंपन्यांचे वजन आहे. आता समजून घेऊया निफ्टी व सेन्सेक्स तुम्हाला कसं कामात येऊ शकते?

तर हे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला माहिती देतात की, भारताची अर्थव्यवस्था सध्या कशी चालू आहे? कंपनीचे टॉप बिजनेस सध्या कसे परफॉर्म करत आहे? जर तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये स्वतःला गुंतवणूक करत असाल तर तुमचा हेतू असला पाहिजे कि, मला सेन्सेक्स आणि निफ्टी पेक्षा जास्त रिटर्न मिळाले पाहिजे. कारण तुम्ही सेन्सेक्स व निफ्टी मध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करू शकता. तुम्हाला मार्केट बद्दल माहिती नसेल तर तुम्ही इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.

उदा.सेन्सेक्स च्या इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमची गुंतवणूक तीस कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. त्या कंपन्यांच्या भारानुसार ती गुंतवले जाते. त्यामुळे तुमच्या सेन्सेक्स फंड चे रिटर्न सेन्सेक्स येवढे राहतील. जर एखाद्या वर्षी सेन्सेक्स ने 14% ने रिटर्न दिला तर सेन्सेक्स फंड सुद्धा जवळपास 14% रिटर्न देईल.

त्यामुळे जास्त मेहनत न घेता, तुम्ही सहजइंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही स्वतः गुंतवणूक करत असाल, स्वतः कंपनी शोधत असाल, तर तुमचा हेतू हा असला पाहिजे कि, आपले रिटर्न हे सेन्सेक्स व निफ्टी पेक्षा जास्त असले पाहिजे. सेन्सेक्स व निफ्टी व्यतिरिक्त मार्केटमध्ये इतरही इन्डायसेस आहेत.

वेगवेगळे सेक्टर असतात त्यांना ट्रॅक करणं सुद्धा खूप कठीण आहे. बँकिंग सेक्टर बद्दल बघितल तर भारतात खूप सार्‍या बँक आहे त्या पूर्ण बँकेचा ट्रॅक करणं अवघड आहे, त्यामुळे बँकिंग सेक्टर चे सुद्धा इन्डायसेस बनवलेले आहेत जसे की बँक निफ्टी NSE हा बँक सेक्टर चा इंडेक्स आहे.

अशा प्रकारे वेगवेगळ्या सेक्टर चे वेगवेगळे इन्डायसेस आहे. त्यामुळे त्या सेक्टर ची प्रत्येक कंपनीचा शोध करण तुम्हाला आवश्यक नाही. सहज तुम्ही त्या सेक्टर चा इंडेक्स बघून माहिती करू शकाल की, तो ठराविक प्रभाग कशाप्रकारे कामगिरी करत आहे. तर आपण म्हणू शकतो की, हे जे निर्देशांक आहेत त्यांनी आपले जीवन सोपे केले आहे.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “काय आहे सेन्सेक्स (SENSEX) आणि निफ्टी(NIFTY)?।। जाणून घेऊया स्टॉक मार्केट बद्दल थोडक्यात !

Comments are closed.