आज आपण पाहणार आहोत जर बदली किंवा अन्य कारणामुळे आपण दुसऱ्या गावात, दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात गेला असाल तर तिथल्या मतदार यादीत तुमचे नाव कसे ऍड करता येईल? त्यासाठी आपल्याला गूगल किंवा क्रोमच्या एखाद्या ब्राऊजर वर यावे लागेल,
तिथे तुम्हाला टाईप करायचे आहे NVSP म्हणजे नेशनल वोटर सर्विस पोर्टल ची वेबसाईट आपल्यापुढे दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर नॅशनल वोटर सर्विस पोर्टल च्या पेजवर आपण थेट पोहोचणार आहोत. या पेजवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला वोटर पोर्टल बीटा(voter portal beta) हा पर्याय दिसेल
त्यावर क्लिक करायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला साइन इन (sign in) करायचे आहे साइन इन (sign in) करण्यासाठी तुम्ही गुगल, ट्विटर, फेसबुक, लिंगडीन यापैकी कोणतेही अकाऊंट वापरू शकता, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यापुढे पाच पर्याय दिसतील यामध्ये नवीन मतदार नोंदणी(new voter registration), मतदार यादीतील सुधारणा (correction in voter id),
इतर ठिकाणी बदली मतदान कार्ड बदलणे (transfer to other place) आणि मतदार यादीतून नाव काढणे (deletion of voter) असे पाच पर्याय दिसतील. यापैकी तिसरा पर्याय म्हणजेच इतर ठिकाणी बदली हा आपल्याला वापरायचं आहे. त्याचप्रमाणे या पेजवर तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाचा ट्रेकिंग नंबर (tracking number) वरून त्याची सद्यस्थिती पाहता येते.
या पेजवर वर दिलेल्या ट्रेकिंग स्टेटस (tracking status) या पर्यायाला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. आता इतर ठिकाणी बदली म्हणजेच shifted to other place या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे एक पेज ओपन होईल, जिथे तुमचे नाव येईल आणि एक मेसेज येईल तिथे गेल्यानंतर तुम्हाला लेट्स स्टार्ट (Lets start) या बटनावर क्लिक करायचे आहे,
यानंतर तुमच्या पुढे दोन पर्याय येतील No, I don’t have a voter id number आणि Yes, have a voter id number यापैकी दुसऱ्या पर्यायावर म्हणजे आपल्याकडे मतदान कार्ड वरील नंबर असल्याकारणाने त्या पर्यायावर क्लिक करून आलेल्या रकान्यात तुम्हाला तुमचा मतदान कार्ड वरील नंबर टाकायचा आहे,
हे टाकल्यानंतर fetch details या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि खाली आलेल्या मेसेज पुढे proceed या बटणावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यापुढे दोन टॅब दिसतील. ज्यामध्ये आपली माहिती भरलेली असेल व त्या खाली दोन पर्याय दिसतील shifted outside assembly constituency आणि shifted within assembly constituency म्हणजे तुम्ही विधानसभा मतदार संघाच्या बाहेर जात आहात किंवा विधानसभा मतदार संघाच्या आतच राहणार आहात,
आता समजा आपण विधानसभा मतदार संघाच्या बाहेर बदली होऊन गेलेले असाल तर पहिला पर्याय निवडायचा आहे आणि save and continue या पर्यायावर क्लिक करायचे आहे असे केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल ज्यावर एक OTP पाठवला जाईल, मोबाइल नंबर टाकल्यानंतर send otp ह्या बटणावर क्लिक करायचे आहे,
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल ज्यामध्ये OTP दिलेला असेल तो नंबर तुम्हाला स्क्रीनवर आलेल्या रकान्यामध्ये भरायचं आहे आणि verify या बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तिथे success, your mobile no is verified असा मेसेज येईल. त्यानंतर पुढे आलेल्या पेजवर तुम्हाला तुमचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे,
त्यानंतर तुम्हाला ज्या मतदार संघात तुमचे नाव टाकायचे आहे ते निवडायचे आहे, त्यासाठी खाली दिलेल्या पर्यायात राज्य, जिल्हा आणि मतदार संघ निवडायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सध्याच्या पत्त्याचा पुरावा म्हणून बँक पासबुक, रेशन कार्ड, लायसन्स, पासपोर्ट, इलेक्ट्रिसिटी बिल यापैकी जे पण उपलब्ध असेल ते निवडायचे आहे आणि त्याचा नंबर खाली दिलेल्या रकान्यात तुम्हाला टाकायचा आहे,
त्यानंतर select the file to upload या बटनावर क्लिक करून तुम्हाला jpg format म्हणजे फोटो स्वरूपात 2mb पर्यंतची फाईल अपलोड करायची आहे.अपलोड झाल्यानंतर तिथे तुम्हाला मेसेज दिसेल well done your file has been uploaded हा मेसेज आल्यानंतर save and continue या बटनावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर आलेल्या पेजवर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे, तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून जे कागदपत्र उपलब्ध आहेत ते तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे, त्याचा नंबर तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि त्याची फाईल तुम्हाला तेथे अपलोड करायची आहे. अपलोड झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला तसाच मेसेज येईल आणि हे झाल्यानंतर save and continue या बटन वर क्लिक करायचे आहे,
यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करण्यासाठी विचारले जाईल, तिथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, अपलोड झाल्यानंतर तिथे तुमचा फोटो आणि नाव येईल. तुम्हाला जर काही अपंगत्व असेल तर खाली दिलेल्या पर्याय पैकी एक पर्याय निवडायचा आहे किंवा इतर काही प्रकारचे अपंगत्व असेल तर other या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ते टाकू शकत
आणि जर कोणत्याही प्रकारचे अपंगत्व नसेल तर no disability या पर्याय पुढील बॉक्स मध्ये टिक करा आणि save and continue या बटणावर क्लिक करा. हे झाल्यानंतर तुमच्या पुढे तुम्ही सादर केलेला एक अर्ज लिखित स्वरूपात येईल, त्याच्याखाली I accept यापुढील बॉक्समध्ये ठीक करून save and continue या बटणावर क्लिक करायचे आहे असे केल्यानंतर पुढे जे पेज येईल,
त्यावर तुम्ही सध्या राहत असलेल्या पत्त्यावर कधीपासून राहत आहात ते तुम्हाला टाकायचे आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्या वर्षापासून आणि कोणत्या महिन्यापासून राहत आहात ते तुम्हाला निवडायचे आहे. त्यानंतर त्याखाली तुम्हाला declaration आलेला दिसेल तिथे तुम्हाला place यापुढे तुम्ही कुठून अर्ज करत आहात ते टाकायचे आहे
आणि save and continue त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्यापुढे फॉर्म 6 उघडेल, ज्यामध्ये तुम्ही भरलेली सर्व माहिती असेल, यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर खाली दिलेल्या edit या बटनावर क्लिक करून तुम्ही बदल करू शकता जर सर्व माहिती योग्य असेल तर submit या बटनावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला एक ट्रॅकिंग नंबर मिळेल, तसेच तो तुमच्या मोबाईल नंबर वर देखील येईल, ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. तर अशाप्रकारे तालुका, जिल्हा किंवा राज्य यामधून काही कारणामुळे जर तुमची बदली झाली असेल आणि मतदार यादीतून नाव तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलायचे असेल तर घरबसल्या ते करता येईल.
सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Maj nav Matadar yadit takayche aahe tr plz maje nav tayt register karate.. 😌🙏