नोकरी सोडून बिजनेस सुरु करायचा विचार करताय? तर हा लेख नक्की वाचा !

नोकरी सोडून बिजनेस सुरु करायचा विचार करताय? तर हा लेख नक्की वाचा !

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात, मला जॉब करत करत बिझनेस करायचा असेल तर मी करू शकतो का? किंवा जर मला डायरेक्ट बिझनेस करायचा असेल. सध्या मी जॉब करतोय तर ते माझ्यासाठी शक्य असेल का? याबद्दल सविस्तर माहिती आपण करून घेणार आहोत. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला जॉब करत बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी पहिला ऑप्शन आहे तुम्हाला तुमची विचारसरणी बदलावे लागेल. जर तुम्ही सध्या जॉब करताय आणि तुम्हाला वाटत असेल, की मला खूप जास्त काम करावे लागते खूप मेहनत करावी लागते.

खूप सारा वेळ माझा कंपनीमध्ये वापरला जातोय. आणि बॉसची कटकट, बऱ्याच गोष्टींचे टेन्शन, यामुळे जर तुम्ही जॉब सोडून व्यवसाय करायच्या नादी लागत असाल तर मात्र तुमची फसवणूक होणार. आणि शंभर टक्के तुमचा लॉस होणार. याचं काय कारण? बिझनेस जर तुम्हाला करायचं असेल तर खूप सारे लोक तुम्हाला सांगतात.

सुरुवातीचे काही दिवस मेहनत करायची. नंतर एक टीम बनवायची. जेव्हा तुमच्याकडे टीम असते ती टीम काम करते आणि तुम्ही मात्र निवांत राहता. कोणतही काम करण्याची गरज नाही. पण या गोष्टी सत्य नाही. जर तुम्हाला प्रोपर्ली बिजनेस सेट करायचा असेल, कंटीन्यूअस त्याची ग्रोथ करायची असेल. तर त्यासाठी डेफिनेटली तुम्हाला मेहनत करावी लागते.

तुम्हाला बरेच लोक सांगतात सोशल मीडियावर त्याचे फोटोज दिसतात, मोठे बिझनेस मॅन हे काम करतच नाही. त्याची व्हिडिओ असतात, फोटो असतात. ते तुम्हाला सोशल मिडियावर दिसत असतात. हे अर्ध सत्य आहे. ते सोशल मीडियावर दिसतात. पण ते दिसतात यासाठी की त्यांना त्यांची ब्रँड व्हॅल्यू वाढवायची असते. म्हणून ते सोशल मीडिया वर दिसत असतात. पण जर तुम्हाला तुमचा बिजनेस सेट करायचा असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागते.

जर तुम्हालाही मेहनत घेण्याची इच्छा नसेल. तर जॅब तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर जॉब मध्ये सुद्धा तुम्हाला मेहनत घ्यायची नसेल. तर तिकडे सुद्धा वाढ होणार नाही. जर तुम्हाला मेहनत करण्याची इच्छा असेल. काहीतरी मनात विचार असतील, किंवा काही तरी नवीन करण्याची इच्छा असेल. तर डेफिनेटली तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेस मॅन होऊ शकता. आणि त्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करू शकता.

दुसरा पॉईंट आहे इन्व्हेस्टमेंट, मोठी गुंतवणूक: मी बऱ्याच लोकांना पाहतो, ते म्हणतात मी वीस लाख, चाळीस लाख, पन्नास लाख, एक कोटी रुपये इन्वेस्ट करून मोठं अंपायर उभा करणार आहे. मला मोठं हॅटेल सुरू करायचं आहे. मला मोठं वर्कशॉप सुरू करायचा आहे. आणि त्यामधून जर तुमचं नुकसान झालं किंवा तो बिझनेस तुम्हाला प्रॉपर करता आला नाही. तर त्यामधून खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला एखादा बिजनेस सुरू करायचा असेल. तर त्यासाठी अचानक एवढी मोठी गुंतवणूक करू नका.

मी एक उदाहरण सांगतो. माझा एक मित्र होता. जो माझ्यासोबत जॉब करत होता. त्या ठिकाणी एक घटना घडली. त्याला ज्या कंपनीमधून आमच्या कंपनीला ऑर्डर येत होती. त्या कंपनी मधील एका एम्प्लॉइ ने कमेंट दिली. की तू स्वतः वर्कशॉप सुरू कर. मी तुला डेफिनेटली ऑर्डर देईल. आणि जेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून एक वर्कशॉप सुरू केलं. त्या कंपनीमधून रिझाईन करून स्वतःचा एक छोटं वर्कशॉप सुरू केलं. त्याच्या मध्ये गुंतवणूक केली होती 70 लाख रुपये. पण तेही एका व्यक्तीच्या भरोशावर. जेव्हा त्याचं वर्कशॉप पूर्ण झालं. तेव्हा तो त्या व्यक्तीला पुन्हा कॉल करून सांगू लागला की मला तुम्ही ऑर्डर देण्याचं वचन दिलं होतं.

तुम्ही मला आता ऑर्डर द्यायला का? तेव्हा त्या व्यक्तीने ऑर्डर देण्यास नकार दिला. वेगवेगळी कारण सांगितले. कंपनी प्रॉब्लेम सांगितले, वेगवेगळे इशू सांगितले. पण त्याचा परिणाम माझ्या मित्रावर झाला. 70 लाख रुपये गुंतवणूक केलेल्या बिझनेस जागीच ठप्प झाला. तो त्या काम देणाऱ्या व्यक्तीला दोश देत होता. त्यामुळे माझ्या बिजनेस फेल झाला.

त्याच्यामुळे माझं वर्कशॉप बंद पडलं. 70 लाखांचे नुकसान झालं. पण मित्रांनो याला खरं जबाबदार कोण? तो मित्रच. कारण विचार न करता एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांनी हा एवढा मोठा डिसीजन घेतला. त्यामुळे त्याला सर्व काही विकण्याची वेळ आली. आणि अक्षरशः गरीबित जीवन व्यतीत करावा लागलं. खूप वर्ष त्याला धक्के खावे लागले. आणि त्यानंतर एक छोटा मोठा जॉब त्याला पुन्हा मिळाला. आणि तो आता त्याचं जीवन जगत आहे. पण जर तुम्ही सुद्धा अशी मोठी चूक करणार असाल. तर ती मुळीच करू नका.

तिसरा पॉईंट आहे बॅक टेस्टींग: आता तुम्ही म्हणाल या सर्व गोष्टी तुम्ही सांगितल्या. जर बिजनेस रन झाला नाही, तर मोठी गुंतवणूक केली नाही तर बिझनेस सुरू होणार नाही. जर सुरुवात करायची असेल तर घाबरून चालत नाही. पण मित्रांनो त्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत. ज्याला आपण बॅक टेस्टिंग म्हणतो. आता बॅक टेस्टींग म्हणजे काय? समजा तुम्हाला एक मोठा ट्रक घ्यायचा आहे. किंवा ट्रॅव्हल्स कंपनी सुरू करायची आहे. ट्रॅव्हल साठी वेगवेगळ्या व्हाल्वो वगैरे तुम्हाला लागणार आहेत.

पण हे करण्यासाठी तुम्हाला मोठी गुंतवणूक करण्याची गरज असते. पण ही गुंतवणूक न करता सुद्धा तुम्हाला सक्सेसफुल बिझनेस मॅन बनता येऊ शकतं. ते कसं, सुरुवातीला बॅक टेस्टिंग करण्यासाठी. बिझनेस रन होतो की नाही हे चेक करण्यासाठी बाहेरून ट्रक, ट्रॅव्हल्स रेंट व घेऊ शकता. प्रति महिन्याला त्या मालकाला तुम्ही काहीतरी रक्कम देऊ शकता. आणि त्याच्याकडून ते वाहन काही महिन्यासाठी काही दिवसासाठी ट्रायल बेसेसवर घेऊ शकता. जेव्हा तुम्ही तो बिझनेस रन करायला लागता.

तेव्हा तुम्हाला समजतं किती कस्टमर आहेत. किती बिजनेस होऊ शकतो. कीती त्याच्यामध्ये इन्वेस्ट करावे लागतात. कशाप्रकारे यांची रनिंग कॉस्ट असते. कोणते प्रॉब्लेम्स आहेत. त्याचे एडवांटेज काय, डिसएडवांटेज काय? खरंच आपण यामध्ये एवढी गुंतवणूक करायला हवी का? कारण जेव्हा आपण लांबून हा बिझनेस पहात असतो. तेव्हा आपल्याला वाटत असतं यामधून खूप मोठी रक्कम आपण कमवू शकतो. ह्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे. म्हणूनच आपण त्या बिजनेस मध्ये उतरतो.

पण जेव्हा आपण त्या मध्ये एंट्री करतो. आणि काम करायला सुरुवात करतो. त्यावेळी समजतं, त्याच्या मधे खूप सारी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामधून एवढेच प्रॉफिट मिळतं. याचा प्रॉफिट वाढवण्यासाठी ही गोष्ट करावी लागते. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी शिकून घ्या. आणि त्या नंतर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करून काम करायला सुरुवात करा. समजा तुम्हाला शेती करायची असेल. आणि शेतीमधून लाखो रुपये कमवता येतात हा तुमचा समज असेल किंवा एखादं उदाहरण तुम्ही पाहिला असेल.

किंवा वाचल असेल. त्यासाठी डायरेक्ट शेती खरेदी करण्याची गरज नाही. एखाद्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही टाईअप करू शकता. एक वर्षासाठी दोन वर्षासाठी त्याच्याबरोबर टाईअप करून त्याला ठराविक रक्कम देऊ शकता. आणि ती शेती तुम्ही स्वतः करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला समजेल एक्च्युअल त्यामधून प्रॉफिट किती मिळतं? जसं ट्रक आणि वॉलवो खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक होते. समजा वीस ते तीस लाख रुपये तुम्हाला गुंतवावे लागले असते.

पण जेव्हा तुम्ही ती वस्तू भाड्याने घेतली. तेव्हा उदाहरणार्थ त्याला तुम्ही तीस हजार रुपये दिले असतील. मंथ्ली तीस हजार रुपये त्या ट्रक साठी तुम्हाला द्यावे लागले. आणि टोटल तुमचं प्रॉफिट झाला असेल 70 हजार रुपये. डीजेल, ड्रायव्हर ही सगळी कॉस्ट आणि इतर काही कॉस्ट असेल. ती वजा करून एक दहा हजार रुपये तुमच्याकडे शिल्लक राहतील. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल प्रॉफिट किती होतं आणि याचे रनींग कॉस्ट किती आहे? त्यासोबतच पहिल्या महिन्यात समजत तुम्हाला लॉस झाला. जर तो लॉस असेल, तर तो लोस तीस-चाळीस लाखापेक्षा खूप कमी असेल. कारण पाच दहा हजार तुमचा लॉस होईल. पण जर तुम्ही डायरेक्ट गुंतवणूक केली असती, तर काय झालं असतं? खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागलं असतं.

चौथा आहे जॉब विथ बिजनेस : या मध्ये काय आहे , तुम्हाला जॉब तर कंटिन्यू करायचा आहे. जॉब सोडून डायरेक्ट बिजनेस मध्ये एन्ट्री करू नका. आम्ही सुद्धा बिजनेस सेट करण्यासाठी खूप प्रयत्न केले. तेही जॉब करत, आणि जेव्हा बिझनेस एका ठराविक लेव्हलला येऊन पोहोचला. तेव्हाच मी जॉब सोडून बिझनेस करू लागलो. आता तुम्हाला काय करायचं? समजा तुमचं स्वप्न असेल हॉटेल सुरू करायचं. हॉटेल सुरू करण्यासाठी किमान पन्नास लाखांपासून पुढे इन्व्हेस्टमेंट करावे लागतात.

साठ लाख, सत्तर लाख, एक कोटी, दोन कोटी. पण या केस मध्ये काय करू शकता तुम्ही स्वतः एक छोटीशी फ्रेंचायसी घेऊ शकत. त्यांच्या त्या फ्रेंचायसी मधून कामाची सुरुवात करू शकता. किंवा स्विगी आहेत, झोमॅटो आहे. अशा वेगवेगळ्या कंपन्यांसोबत टाय अप करून त्यांच्या वेबसाईटवर स्वतःला रजिस्टर करून, एका दुसऱ्या हॉटेल सोबत टाइप करा. आणि त्या हॉटेलमधून जी काही ऑर्डर असेल ती परचेस करा. आणि कस्टमर पर्यंत पोहोचवा. म्हणजेच काय? हॉटेल मालकाकडून तुम्ही परचेस केला आणि इकडे जो काही कस्टमर असेल त्याला सेल केला.

म्हणजे थर्ड पार्टी काम केलं. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. तिथे काय होतं कोणतीही गुंतवणूक न करता थर्ड पार्टी काम करता. यामधून तुम्हाला समजतं कस्टमर किती आहे. तुम्हाला ऑर्डर किती मिळते. बिजनेस ला ग्रोथ कशी होईल? अशा अनेक गोष्टी या मधून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आणि जर तुम्हाला यामधून रिस्पॉन्स चांगला मिळाला तर जेवण तुम्ही स्वतः बनवू शकता. हॉटेलचा जो काही बिझनेस असेल तर तुम्ही स्वतः घेऊ शकता.

स्वतःच्या घरांमधून एक किंवा दोन खोल्या वापरू शकता. आणि त्यामधून जेवण बनवण्याची प्रोसिजर कम्प्लीट करू शकता. ती ऑर्डर मात्र तुमचा एम्प्लॉई तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवेल. तुम्ही जॉब करत होता जॉब करत असताना एक व्यक्ती तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जाता, त्या वेळी तो डिलिव्हरी करायचा. म्हणजे काय तुम्हाला जॉब सोडण्याची गरज नाही. पेमेंट तर महिन्याला येतच राहील. त्याच्यासोबत बिझनेस सुधा रण होईल. आणि तो कशा प्रकारे चालतो हे सुद्धा समजेल.

अगदी त्याचप्रमाणे कोणताही बिझनेस असेल तो जर तुम्हाला नेक्स्ट लेवल घ्यायचा असेल तर त्यासाठी बॅक टेस्टींग करनं खूप गरजेचं असतं. आणि जॉब सोडून जर डायरेक्ट बिजनेस मध्ये उतरला. जो तुमचा प्रायमरी अर्निंग सोर्स आहे, तो सोडुन जर दुसऱ्या अर्नींग सोर्स कडे वळण्याचा प्रयत्न केला. तोही पहिला सोर्स बंद करून. तर मात्र खूप मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता असते. जरूर यामध्ये प्रत्येक वेळी नुकसानच होईल असं नसतं. बर्याच वेळा फायदा होतो.

पण जर नुकसान झालं तर काय? याला म्हणतात खरी रिस्क मॅनेजमेंट. प्रॉपर रिस्क मॅनेज करून जर तुम्ही काम करायला सुरुवात केली. तर कोणत्याही संकटाला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही किंवा मोठे फायनान्शियल क्रायसिस तुमच्यासमोर उभे राहणार नाहीत. कारण आता वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. इंडिया मार्ट असेल, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट आहेत, ओला, उबर अशा वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता.

जर तुमची कार असेल तर त्यासाठी ओला उबर आहे. जर तुमचे वेगवेगळे प्रॉडक्ट तुम्हाला सेंल करायचे असतील. तर त्यासाठी आमेझोन, फ्लिपकार्ट, इंडियामार्ट अशा अनेक वेबसाईट आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सेल करू शकता. बॅक टेस्टींग करू शकता. त्यामुळे जसे मी तुम्हाला सांगितलं कोणत्या क्षेत्रात काम करायचं असेल स्वतःची इंडस्ट्री सुद्धा उभा करायचे असेल. तर एक काम करा जो तुमचा कस्टमर असेल त्याच्याशी डील फायनल करा.

आणि एका थर्ड पार्टी प्रमाणे दुसऱ्या कंपनीतून तो प्रॉडक्ट बाय करून या तुमच्या कस्टमरला सेल करा. जेव्हा हे सर्व व्यवस्थित प्रकारे चालू होईल तुमचं थर्ड पार्टी काम खूप चांगल्या लेव्हलला पोहोचेल, तेव्हा त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. अन्यथा विदाऊट कष्टमर कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट करणे तेही दुसऱ्याच्या भरोशावर खूप तोट्याचे ठरू शकतं. आणि संकटाला तुम्हाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवातीला बॅक टेस्टिंग करा. स्वतःच्या स्ट्रेंथ, विकनेस त्या बिझनेसचे अडवांटेज अंड डिसद्वांटेज सर्वकाही कॅल्क्युलेट करा. रिस्क प्रोपर्ली मॅनेज करा. आणि त्यानंतर त्या बिजनेस मध्ये एन्ट्री करा. विदाऊट एनी नॉलेज डोन्ट इन्वेस्ट इन एनी बिजनेस.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

admin

अशाच माहितीसाठी आपल्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा !

error: Content is protected !!