नोंदणीकृत कराराची तलाठ्याला माहीती देण्याची मुदत किती असते?।। खोटा गुन्हा जर दाखल झाला किंवा खोट्या गुन्ह्याची FIR नोंद झाली तर काय करावे?।।चुकीचा फेरफार रद्द होऊ शकतो का?।। नोंदणी कृत साठे करार रद्द करता येतो का? ।। नोंदणी कृत आणि अनोंदणीकृत कराराची वैधता किती? या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

प्रश्न क्र.1) नोंदणीकृत कराराची तलाठ्याला माहीती देण्याची मुदत किती असते ? उत्तर :एखाद्या व्यक्तीने एखाद्या मालमत्तेमध्ये जर काही हक्क किंवा अधिकार ग्रहण केले किंवा आशा व्यक्तीला जर हक्क आणि अधिकार प्राप्त झाले तर त्याची नोंद महसुली अभिलेखात होण्यासाठी तलाठ्याकडे त्याची माहिती देणे किंवा वर्दी देणे आवश्यक असते.

महाराष्ट्र जमीन महसूल समिती कलम 149 यामधील तरतुदी नुसार ज्या व्यक्तीला असे हक्क किंवा अधिकार प्राप्त होतात त्या व्यक्तीने हक्क आणि अधिकार प्राप्त झाल्यापासून 3 महिन्याच्या कालावधी मध्ये अशी माहिती किंवा वर्दी देने आवश्यक आहे. मात्र 3 महिन्या मधेच वर्दी दिली पाहिजे असं ही काही नाही.

उदा.एखाद्या व्यक्तीला समजा 3 महिन्यात पेक्षा जास्त कालावधी लागला तर त्याच्या हक्क आणि अधिकारावर काहीही विपरीत परिणाम होत नाही किंवा त्या व्यक्तीने तीन महिन्यांच्या नंतर वर्दी दिली म्हणून त्याची महसूल अभिलेखात नोंद होत नाही असही नाही.

फक्त महाराष्ट्र जमीन महसूल समिती कलम 152 नुसार जर एखाद्या व्यक्तीने विहित मुदतीत म्हणजे 3 महिन्याच्या आत अशी माहिती नाही दिली तर त्याच्या वर ५ रुपये इतकी दंडात्मक आकारणी होऊ शकते, जी आपल्या हक्क आणि अधिकारा चा विचार करता फारच नाममात्र आहे

त्यामुळे शक्य तो जर आपल्याला काही हक्क आणि अधिकार प्राप्त झाले असतील तर ३ महिन्याच्या आत त्याची माहिती तलाठ्याला द्यावी जर काहि कारणाने ३ महिन्याचा काळ उलटून गेला तर घाबरून जाऊ नये त्याने आपल्या हक्क किंवा अधिकारावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही.

प्रश्न क्र.२)खोटा गुन्हा जर दाखल झाला किंवा खोट्या गुन्ह्याची FIR नोंद झाली तर काय करावे? उत्तर: सगळ्यात पाहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या गुन्हा होतो तेव्हा तो खरा की खोटा हे सांगता येत नाही किंवा आपण त्या वेळेला आपण नक्की सांगू शकत नाही.

कोणत्याही गुन्ह्याचा त्याची तपासणी झाली, ते प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने सुनावणी नंतर त्याचा जेव्हा निकाल येतो तेव्हा एखादा गुन्हा खरा आहे किंवा खोटा आहे याबद्दल आपण अधिकृतरित्या म्हणू शकतो. ही झाली कायदेशीर बाब, मात्र काही वेळेला आपल्या विरोधात किंवा आपल्या परिचिताच्या विरोधात मुद्दामहुन खोटा गुन्हा नोंद झाला

त्याच्यावर आपल्याकडे काही कायदेशीर पर्याय आहेत का? तर निश्चितच आहेत सगळ्यात पहिला आणि सरळ धोपट मार्गासारखा पर्याय म्हणजे ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे त्या प्रकरणात हजर व्हायचं. गरज पडली तर जामीन घ्यायचा

आणि ते प्रकरण पूर्ण ताकतीने चालवून आपली निर्दोष मुक्तता करून घ्यायची याला काहीसा जास्त कालावधी लागतो हे मात्र खरं. जर आपल्याला जलद गतीने निकाल हवा असेल आपल्या विरोधात जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे.अस आपलं म्हणणं आहे

तो गुन्हा किंवा ती FIR रद्द करण्या करता आपण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो जर आपल्या प्रकरणात गुणवत्ता असेल आणि उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिला तर आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा किंवा FIR ही रद्द सुद्धा होऊ शकते.

प्रश्न क्र.3)चुकीचा फेरफार रद्द होऊ शकतो का? उत्तर: कोणताही फेरफार जेव्हा नोंद होतो तेव्हा तो चुकीचा किंवा बरोबर याबद्दल आपल्याला यावर फारस काही बोलता येत नाही. मात्र कालांतराने त्या फेरफराने कोणावर अन्याय झाला असेल कोणाचे हक्क किंवा अधिकार यावर विपरीत परिणाम झाला असेल तर तो फेरफार चुकीचा आहे

असे आपण म्हणू शकतो साहजिकच ज्या व्यक्तीवर किंवा ज्या व्यक्तीच्या हक्क आणि अधिकारावर ज्या एखाद्या फेरफराने विपरीत परिणाम झाला असेल तर अशी व्यक्ती त्या फेरफराच्या विरोधात sub divisional office किंवा प्रांत ऑफिस येथे अपील करू शकते.

फेरफार किंवा कोणताही महसूली अभिलेखा बद्दल जर बोलायचं झालं की त्याच्या विरोधात आपल्याला केवळ आणि केवळ महसूली विभागमध्येच दाद मागायला लागेल मात्र महसूली अभिलेखात जरी आपण फेरफार किंवा इतर काही गोष्टी आव्हाणीत करीत असलो तरी त्याच्या अनुषंगाने जर आपल्याला मालकी किंवा ताबा या इतर बाबीच्या संदर्भात काही निर्णय हवा असेल

त्याकरता आपण सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा दावा दाखल करू शकतो थोडक्यात काय तर ज्या फेरफारमुळे आपलं नुकसान होऊ शकत किंवा आपल्या हक्क अधिकारावर गदा येऊ शकते त्या विरोधात आपण महसूली किंवा महसूली आणि दिवाणी न्यायालयात आवश्यक ती कारवाई करू शकतो.

प्रश्न क्र.4) नोंदणी कृत साठे करार रद्द करता येतो का? उत्तर: निश्चितपणे करता येतो ज्या दोन व्यक्तींमध्ये साठे करार झालेला आहे त्याच दोन व्यक्तींना जर तो साठे करार रद्द करायचा असेल तर त्यासाठी एक रद्द पत्र तयार करून तो साठे करार रद्द करता येऊ शकतो.

मात्र त्यापैकी एखाद्या व्यक्तीला तो करार रद्द करून हवा आहे किंवा त्या करारामुळे एखाद्या व्यक्तीच्या हक्क आणि अधिकारावर गदा येतेय किंवा एखाद्या व्यक्तीच नुकसान होत असेल तर अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीला जो करार रद्द करून हवा आहे

किंवा ज्या व्यक्तीच या करारामूळे नुकसान होतंय त्या व्यक्तीस सक्षम दिवाणी न्यायालयात तो करार रद्द करण्या करता दावा दाखल करू शकतात.आणि एखाद्या प्रकरणाची परिस्थिती आणि गुणवत्ता याच्या अनुषंगाने जर दावा मंजूर झाला तर तो करार आणि त्याची नोंदणी ही रद्द होऊ शकते.

प्रश्न क्र.5) नोंदणी कृत आणि अनोंदणीकृत कराराची वैधता किती? उत्तर : सगळ्यात पाहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही करार वैध ठरण्यासाठी तो नोंदणी कृत असणे अत्यंत अवश्य आहे. सहाजिकच अनोंदणीकृत करार वैधच नसल्याने त्याची वैधता किती या प्रश्नाच्या खोलात शिरण्यात काही अर्थ नाही.

आता राहिला प्रश्न तो नोंदणीकृत कराराचा, आता नोंदणीकृत कराराची वैधता ही सर्व साधारणतः कायमची असते, याला अपवाद आहे तो मुदतीच्या कराराचा उदा.गहाण खत, leave and license agreement हे यासारखे काही करार असतात जे आपण ठराविक मुदतीसाठी करत असतो असे करार ते करार ज्या मुदती करता करण्यात आले आहेत

ती मुदत संपली आणि त्याचं नूतनीकरण केलं नाही तर तो करार आपोआप रद्द होतो. थोडक्यात काय तर ठराविक मुदती करता एखादा करार नोंदणीकृत करण्यात आला असेल तर त्या करारा मध्ये जी मुदत दिली असेल तर ती दिलेली मुदत संपली असेल तर त्यानंतर तो करार संपुष्टात येतो आणि एक प्रकारे अवैध म्हणजे त्या तारखे नंतर अवैध किंवा बेकायदेशीर ठरतो. धन्यवाद !!!

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.