मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना माहिती असेल ऑलम्पिक हा एक असा खेळ आहे, ज्यामध्ये जगभरातील खेळाडू यांच्या संबंधित देशाच्या स्मरणार्थ स्पर्धा करण्यासाठी एकत्र येत असतात. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस या शहरामध्ये करण्यात आले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या देशाने जिंकला आहे? अशातच आज आपण ऑलम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे 10 देश कोणते आहेत? आणि यामध्ये आपल्या भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..
◆ ऑस्ट्रेलिया : ऑलम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे देशांमध्ये ऑस्ट्रेलिया 10 वा क्रमांक लागतो. ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत 560 पदके जिंकली आहेत. यामध्ये 168 सुवर्णपदकांची, 177 रौप्यपदक आणि आणि 215 कांस्य पदकांचा समावेश आहे.
◆ नॉर्वे : ऑलम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे देशांमध्ये नॉर्वे या देशाचा 9 वा क्रमांक लागतो आणि ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण 567 पदके जिंकली आहेत यामध्ये 207 सुवर्णपदकाचा 187 रौप्य पदकांचा आणि 173 कांस्य पदकांचा समावेश आहे.
◆ जपान : ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारऱ्या देशांमध्ये जपान या देशाचा 8 वा क्रमांक लागतो. जपानने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण 575 पदके जिंकली आहेत यामध्ये 186 सुवर्णपदकाचा, 178 रौप्यपदक आणि 211 कांस्य पदकांचा समावेश आहे.
◆ स्वीडन : ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे देशांमध्ये या देशाचा सातवा क्रमांक लागतो. स्वीडनने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण 683 पदके जिंकली आहेत. यामध्ये 214 सुवर्णपदकाचा 228 रौप्य पदकांचा आणि 241 कांस्य पदकांचा समावेश आहे आणि महत्वाचे म्हणजे स्वीडन या देशाची लोकसंख्या फक्त 1 करोड इतकी आहे.
◆चीन : ऑलम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे देशांमध्ये चीन या देशाचा सहावा क्रमांक लागतो. चीनने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण 713 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 285 सुवर्णपदकाचा तर 231 रौप्य पदकांचा आणि 197 कांस्य पदकांचा समावेश आहे. चीन हा देश लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जातो.
◆ इटली : ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणार या देशांमध्ये इटली या देशाचा पाचवा क्रमांक लागतो. याने ऑलम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण 773 पदके जिंकली आहेत. यामध्ये 264 सुवर्णपदकाचा, 238 रौप्यपदक आणि 271 कांस्य पदकांचा समावेश आहे. या देशाची लोकसंख्या 5 करोड पेक्षा जास्त आहे.
◆ फ्रान्स: ओलंपिक सर्वाधिक पदक जिंकणारे देशांमध्ये फ्रान्स या देशाचा चौथा क्रमांक लागतो. फ्रान्सने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत 910 पदके जिंकली आहेत. यामध्ये 272 सुवर्णपदकांचा, 278 रौप्य पदकांचा आणि 340 कांस्य पदकांचा समावेश आहे आणि फ्रान्स या देशांमध्ये या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
◆ UK : ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे देशांमध्ये युनायटेड किंग्डम ग्रेट ब्रिटन या देशात तिसरा क्रमांक लागतो. युनायटेड किंगडम ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण 965 पदके जिंकली आहेत. यामध्ये 304 सुवर्ण पदक तर 329 रौप्य पदकांचा आणि 332 कांस्य पदकांचा समावेश आहे. यामध्ये ग्रेट ब्रिटनच्या संपूर्ण बेटांचा समावेश होतो. त्यामध्ये इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड तसेच आयर्लंड या बेटांचा समावेश आहे.
◆ जर्मनी : ऑलम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे देशांमध्ये जर्मनी या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण 1083 पदके जिंकली आहेत. यामध्ये 351 सुवर्णपदक तर 371 रौप्य पदक आणि 361 कांस्य पदकांचा समावेश आहे.
◆ अमेरिका : ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणार या देशांमध्ये अमेरिका या देशाचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिकेने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण 2980 पदके जिंकली आहेत. यामध्ये 1183 सुवर्णपदक तर 963 रौप्य पदकांचा आणि 839 कांस्य पदकांचा समावेश आहे.तर ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे देशांमध्ये आपल्या भारत देशाचा 53 वा क्रमांक लागतो. भारताने ऑलिंपिक आजपर्यंत फक्त 35 पदके जिंकली आहेत. यामध्ये 10 सुवर्णपदकाचा, 9 रौप्यपदकांचा आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे.
तर मित्रांनो आज आपण ऑलम्पिकमध्ये सर्वात जास्त जिंकणारा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. भारताने ऑलिंपिक मध्ये सर्वात जास्त पद्धत जिंकण्यासाठी काय केले पाहिजे? तुम्ही आम्हाला कमेंट करू नक्की कळवा..