रेशन दुकानदार तुम्हाला तुमच्या हिस्स्याचे संपूर्ण धान्य देतो कि नाही हे ऑनलाईन कसे बघावे?।। वन नेशन वर रेशनकार्ड कसे चेक करावे? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

वन नेशन वन रेशनकार्ड ही योजना सूरु झालेली आहे तर तुमचे नाव कुठे आहे तुमचं कार्ड तयार झाले का तुमचं नाव तुम्ही कसं पाहायचं आहे मोबाईल वरती तुम्ही तुमचं वन नेशन ऑन रेशन कार्ड पाहू शकता ते कसं पाहायचं हेच आपण पाहणार आहे. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे.

वन नेशन वन रेशनकार्ड पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्लेस्टोर वरती जायचे आहे आणि प्लेस्टोर वरती Umang अप्लिकेशन सर्च करायच आहे. लक्षात ठेवा Umang एप्लीकेशन सर्च केल्यानंतर हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया चे ॲप्लिकेशन आहे. त्यामध्ये काय काय प्रोसेस तुम्हाला करायची आहे. संपूर्ण प्रोसस सांगणार आहे.

तशीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. तरच तुम्हाला तुमचं वन नेशन वन रेशनकार्ड हे तुम्ही पाहू शकता. वन नेशन वन रेशन कार्ड बघण्यासाठी तुम्हाला Umang ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून, हे एप्लीकेशन ओपन करायच आहे. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मराठी/इंग्लिश/हिंदी लैंग्वेज तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता.

तर आपण एक लैंग्वेज सिलेक्ट करुया आणि खाली नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. नेक्स्ट पर्याय क्लिक केल्यानंतर वेलकम टू Umang तुम्हाला दिसेल. पण या सगळ्या सर्विसेस जर तुम्हाला चालवायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं इथं अकाउंट बनवावे लागत. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर बटणावर क्लिक करायचं.

वेलकम टू Umang याच्या खाली एक रजिस्टर ऑप्शन आहे. तर रजिस्टर वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला एक पिन क्रिएट करायच आहे. पिन तयार केल्यानंतर तुमचे अकाउंट तयार होईल.

त्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन बटणावर क्लिक करायचे आहे, आता आपण इतर लॉग इन बटनावर क्लिक करुया. लॉग इन बटनावर क्लिक करता तेव्हा तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो पिन क्रिएट केला होता, तो पिन तुम्हाला येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायच आहे.

लॉग इन केल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रकारच्या सर्विसेस आहेत त्या सर्विसेस दिसतील. तुम्हाला खाली तिथं एक ऑप्शन आहे होम आमच्या शेजारी ऑल सर्विसेस या ऑप्शन वर क्लिक करायच आहे. ऑल सर्विसेस या ऑपशन वर तुम्ही जेंव्हा क्लिक करतात तिथे उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला सर्च ऑप्शन आहे त्या सर्च ऑप्शन मध्ये तुम्हाला वन नेशन सर्च करायचं आहे.

वन नेशन जेव्हा तुम्ही सर्च करता तर तिथे तुम्हाला वन नेशन ची एक सर्विस दिसेल वन नेशन वन रेशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. या सर्व्हिसेस मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्विस ओपन होईल. यामध्ये तीन ऑप्शन तुम्हाला दिसतील.

व्हिव रेशन कार्ड डिटेल्स, व्हिव लास्ट सिक्स मंथ पर्चेस डिटेल्स आणि तिसरा चेक बॅलन्स ऑफ कॉमडिटी तर इथे जो पहिला ऑप्शन आहे व्हिव रेशन कार्ड डिटेल्स या बटनावर क्लिक करायचे आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला जो रेशन कार्ड वरती बारा अंकी नंबर जो आहे तो टाकायचा आहे.

बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकल्या नंतर चेक डिटेल्स बटणावर क्लिक करायच आहे. या बटणावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल, वेळ घेतल्यानंतर तुमची डिटेल जी आहे ती घरातली संपूर्ण डिटेल तुम्हाला दिसेल. तर इथे पाहू शकता आपले महाराष्ट्र राज्य त्यानंतर आपला जिल्हा.

त्याच्या नंतर तुमचा तालुका, तुमचा गाव त्यानंतर तुमचा पिन कोड त्यानंतर तुम्हाला खाली यायचं तुमच्या घरातली संपूर्ण जे जे नाव आहेत, रेशन कार्ड मध्ये जी नाव आहेत ते दिसतील. आणि आधार कार्ड तुमचे रेशन कार्ड सोबत लिंक आहे का? तर इथे आधारित सीडेड – Yes. इथे तुम्हाला ऑपशन दिसेल.

जर Yes ऑपशन असेल तर तुमचं रेशन कार्ड आधार कार्ड लिंक आहे असं समजून जाईल. तर हा झाला महत्वाचा पहिला पॉईंट ज्यामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड आहे ते अशा प्रकारे तुमचं नाव जे आहे ते पाहू शकतात. त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो व्हिव लास्ट सिक्स मंथ परचेस डिटेल्स via रेशन कार्ड, हा दुसरा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे,

तर इतर बारा अंकी नंबर टाकूया आणि चेक डिटेल्स वरती क्लीक करूया. तुम्ही मागील सहा महिन्यांमध्ये कोणकोणते रेशन घेतले म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल काय काय गोष्टी घेतल्या या सर्वांची मागील सहा महिन्यांची डिटेल्स तिथे तुम्हाला दिसेल. आता आहे तिसरा पॉइंट तो यासाठी आहे तुम्हाला रेशन किती किलो भेटते, आणि ते रेशन किती दराने भेटते.

आणि तसेच एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला रेशन भेटली नसेल तेही तुम्हाला इथे दाखवते. त्यासाठी तुम्हाला मंथ आणि इयर सिलेक्ट करावे लागते. तुम्ही कोणतेही वर्ष सिलेक्ट करू शकता. तुम्ही रेशन कार्ड नंबर टाकून तुम्हाला पाहिजे असलेल्या महिन्याची डिटेल्स काढू शकता.

संपूर्ण माहिती तुम्हाला येईल. तुम्हाला ट्रांजेक्शन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे ट्रांजेक्शन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेले रेशन बघू शकता. तेच तुमचे शिल्लक किती 0 kg आहे. म्हणजे तुम्ही तुमचे संपूर्ण रेशन घेतले आहेत. असे तुम्ही बघू शकता. अशाप्रकारे वन नेशन वन रेशन ही सर्विस चालू झालेली आहे.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा सिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.