ओपन टेरेस किंवा मोठी बाल्कनी असलेले फ्लॅट किंवा सदनिका घेताय? थांबा ! ।। हि माहिती वाचा आणि नंतर निर्णय घ्या ।। तुमची फसवणूक तर होत नाहीय ना? सविस्तर माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

ओपन टेरेस किंवा मोठी बाल्कनी असलेले फ्लॅट किंवा सदनिका हे बहुतांश लोकांची पाहीली पसंती असते. आणि बऱ्याचदा लोक ठरवून अशा ओपन टेरेस वाले फ्लॅट किंवा सदनिका विकत घेत असतात. काही वेळेला अशी सदनिका नवीन प्रकल्प मधून घेतली जाते.

किंवा काही वेळेला पुनर्विक्री किंवा पुनरखरेदी करारा द्वारे अशा ओपन टेरेस वाल्या सदनिका आपण घेतो. मात्र जेंव्हा आपण ओपन टेरेस सह या फ्लॅट ची खरेदी करत असतो, ती ओपन टेरेस अधिकृत आहे किंवा नाही याबाबत आपण पुरेशी शहानिशा करत नाही.

बहुतांश वेळेला आपण ज्या माणसाकडनं घेत आहोत, त्या माणसाच्या करारामधे ती ओपन टेरेस दर्शवलेली आहे किंवा नाही येवढ्यावरच आपण समाधान मानतो आणि त्याच्या पुढची चौकशी किंवा शहानिशा आपण करत नाही.

आता बरेचदा काय होतं कि कोणत्याही जमिनीच्या तुकड्यावर त्या जमिनीच्या तुकड्याला असलेला FSI आणि इतर बांधकाम परवानगीचे नियम याच्या अनुषंगाने बांधकाम परवानगी देण्यात येते. काही वेळेला तिकडचा FSI आणि बाकी नियम याच्यामुळे त्या इमारती वरचे त्या जमिनीवरची जी इमारत असते त्याला काही पूर्ण माजल्यांची परवानगी मिळू शकत नाही.

उदाहरणार्थ काही वेळेला अशी इमारत असते असा तळमजला आहे, पहिला पूर्ण आहे, दुसरा पूर्ण आहे, तिसरा पूर्ण आहे, मात्र FSI संपल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे चौथा मजला जो आहे त्याला अर्धाच बांधायची परवानगी मिळालेली आहे अशा वेळेला होते काय मग तिसऱ्या मजल्याची जी स्लॅब आहे ती या फ्लॅट ची ओपन टेरेस आहे असे भासावन्यात येते.

मग त्याच्याकरता तिथे दर पडतात आणि त्या सदनिकेची ओपन टेरेस आहे अस भासवण्यात येते. असा काही वेळेला बिडर्सद्वारे भासवण्यात येत मग जो प्रथम खरेदीदार असतो मग तो तशीच विक्री पुढे सुद्धा करत असतो, मात्र होत काय ही बांधकाम परवानगी आणि मंजूर नकाशा या मध्ये जर ती जागा ओपन टेरेस म्हणून दाखवली नसेल,

तर कायदेशीरदृष्ट्या ही जागा म्हणजे जी स्लॅब आहे आणि त्याच्यावरची जी टेरेस आहे ती अंतिमता त्या सहकारी संस्थेच्या मालकीची असते. साहजिकच कोणत्याही जागेची खरेदी किंवा वापर करतांना ती जागा ज्या कारण करता मंजूर नकाशामध्ये दाखवण्यात आलेली आहे किंवा बांधकाम परवानगी मध्ये दाखवण्यात आलेली आहे,

त्याच कारणकरता ती वापरणे हे बंधनकारक आहे. असे असतांना जेंव्हा आपण असा फ्लॅट घेतो, ज्यामध्ये खालच्या मजल्याच्या स्लॅबचा वरच्या मजल्याच्या फ्लॅट करता अनधिकृत टेरेस म्हणून दर्शवून वापर आणि खरेदी विक्री केली आहे अश्या वेळेला जरी आपल्या करारामध्ये ओपन टेरेस असली जरी आपण त्याच्यावर मुद्रांकशुल्क म्हणजे स्टॅम्पड्युटी भरलेले असले.

तरी सुद्धा त्या केवळ त्या एका कारणामुळे ती जागा, त्या जागेचा आपल्याकडील ताबा आणि त्या जागेचा आपला वापर अधिकृत ठरु शकत नाही. कोणत्याही जागेचा ताबा आणि वापर अधिकृत ठरण्याकरता त्या जागेची बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा आणि त्याचा खरेदी किंवा विक्री करार या तिन्ही ठिकाणी ती जागा आपण ज्याच्याकरता वापर आहे.

उदाहरणार्थ आपण ओपन टेरेस जर असेन तर बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा आणि करार या सर्वांमध्ये ती ओपन टेरेस म्हणून दर्शवलेली असली पाहिजेत. जर तसे दर्शवण्यात आलेलं नसेल आणि आपण ती जागा खरेदी केली, उद्या आपण त्याचा वापर करणार आहोत आणि जर भविष्यात सहकारी संस्था म्हणजे ज्या सोसायटी मध्ये आपण ती जागा घेतलेली आहे

किंवा स्थानिक नगर रचना विभाग यांच्याशी त्या संदर्भात जर काही वाद झाला, तर आपण या टेरेसचा किंवा या जागेचा अनधिकृत वापर करत असल्याचं जर सिद्ध झालं, तर त्याच्याकरिता आपल्याला दंडात्मक कारवाईला सुद्धा सामोरं जायला लागण्याची शक्यता आहे.

हे लक्षात घेऊन जेंव्हा जेंव्हा आपण अशा फ्लॅट चा व्यवहार करत असतो किंवा ओपन टेरेस सह एखादा फ्लॅट विकत घेत असतो, तेंव्हा जी ओपन टेरेस आपल्याला ओपन टेरेस म्हणून विकत आहे. ती त्या इमारतीच्या बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा आणि आपल्याला विकणाऱ्या व्यक्तीचा करार या तीनही ठिकाणी ओपन टेरेस म्हणूनच दर्शविलेली आहे ना?

याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशी जर खात्री आपण करून घेतली नाही, आणि भविष्यात काही वाद निर्माण झाला, तर आपल्याला दंडात्मक कारवाईला सामोरं जायला लागण्याची दाट शक्यता आहे. हे टाळण्याकरता ओपन टेरेस च्या अधिकृत असण्याबद्दल जोवर आपलं समाधान होत नाही,

तोवर अश्या जगाचा व्यवहार किंवा करार पुढे नेणं हे कायम धोकादायक असतं. आणि म्हणूनच पूर्ण खात्रीशीर माहिती मिळत नाही तोवर असे व्यवहार किंवा करार शक्य तोवर आपण पुढे न नेणं हे आपल्या दीर्घकालीन फायद्याचे दृष्टीने जास्त महत्वाचा असतं.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा

व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “ओपन टेरेस किंवा मोठी बाल्कनी असलेले फ्लॅट किंवा सदनिका घेताय? थांबा ! ।। हि माहिती वाचा आणि नंतर निर्णय घ्या ।। तुमची फसवणूक तर होत नाहीय ना? सविस्तर माहिती जाणून घ्या !

  1. गुंतवणूक म्हणून घर कर्ज काढून घेणे कित फायद्याचे आहे

Comments are closed.