विधान परिषदेची निवडणूक पद्धती || पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक हि कशा प्रकारे केली जाते याबाबत अतिशय महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, पदवीधर विधान परिषदेची निवडणूक पद्धती कशी आहे?: मित्रांनो कायदे मंडळाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे विधानसभा, यामध्ये जनता एकूण 288 आमदार आणि खासदार मतदानाद्वारे निवडून देते. दुसरा आहे विधानपरिषद, यापैकी 26 जण हे इतर पक्षां मधून निवडले जातात.

जे की विधानसभेच्या आमदार किंवा सदस्याद्वारे निवडून दिले जातात, यासाठी विधानसभेचे आमदार खासदार आणि सदस्य मतदान करतात. त्यानंतर आणखी 26 सदस्य हे नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ज्याला स्थानिक स्वराज्य संस्था असे देखील म्हटले जाते यांच्या सदस्य द्वारे निवडून दिले जातात.

उरलेल्या 26 सदस्यांपैकी 14 सदस्य हे राज्यपाल निवडून पाठवितात. यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यातर्फे शिफारस केली जाते. त्यानंतर उरलेल्या 12 सदस्यांपैकी सहा सदस्य निवडले जातात. शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी सहा पदवीधर शिक्षक निवडले जातात. पदवीधर मतदार संघाद्वारे सहा सदस्य निवडले जातात.

हे सदस्य शिक्षकांच्या समस्या,जसे की नवीन शिक्षकांची भरती,अनुदानित विनाअनुदानित शाळा, एमपीएससी ज्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या, बेरोजगारी अशा अनेक प्रश्न मांडण्यासाठी असतात आणि उरलेले सहा सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात.

त्यासाठी माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक यांना मतदान करता येते.परंतु पदवीधर शिक्षकांना यासाठी मतदान करता येत नाही. मात्र शिक्षक मतदार संघातील लोक पदवीधर मतदार संघाला मतदान करू शकतात, परंतु त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना पदवीधर मतदारसंघांमध्ये मतदान करता येते.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक आणि राष्ट्रपतीची निवडणूक ही एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे निवडून दिली जाते. या पद्धतीद्वारे निवडणूक कशी केली जाते ते पाहू: पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्वारे मतदान केले जात नाही तर इथे बॅलेट पेपर द्वारे मतदान केले जाते.

म्हणजेच दिलेल्या सदस्यांपैकी कोणत्या सदस्याला तुमची सर्वाधिक पसंती आहे, हे तुम्हाला जांभळ्या शाईच्या पेनाने रोमन आकड्यांमध्ये 1 ,2 किंवा 3 अशाप्रकारे दर्शववावे लागते. पसंती क्रमांक टाकल्यानंतर हा बॅलेट पेपर बॉक्स मध्ये टाकायचा आहे.निवडणुकीचा निकाल लावण्यासाठी निवडणूक अधिकारी कोटा पद्धतीचा वापर करतात.

त्याद्वारे ते निवडून येणार्‍या सदस्यास किती मते मिळायला हवीत हे ठरवतात. मतदारसंघातून उभ्या असलेल्या सभासदांपैकी जिंकून येण्यासाठी उमेदवारास अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी पसंती क्रमांक एक दिलेला असला पाहिजे.परंतु असे न झाल्यास सर्वात कमी पसंती क्रमांक कुणास मिळाले हे बघितले जाते,

त्या सदस्याला उमेदवारीतून काढून टाकले जाते व त्याला मिळालेल्या मतांमधील कोणत्या उमेदवारास पसंती क्रमांक दोन ची मतं मिळाली आहेत हे तपासले जाते व ती मते त्या त्या उमेदवारांच्या मतांमध्ये मिळवली जातात, अशा प्रकारे पुन्हा दुसऱ्या क्रमांकाच्या कमी पसंती क्रमांक मिळालेल्या उमेदवारांची मते देखील पुन्हा तपासली जातात

व त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पसंती क्रमांक असलेल्या उमेदवारास त्याच्या मतांमध्ये ती मिळवुन दिली जातात. अशाप्रकारे ठरवलेला कोटा पूर्ण होईपर्यंत केले जाते. जर निवडणुकीला उभा असलेल्या मतदारांपैकी एकही उमेदवार कोटा पूर्ण करू शकत नसेल तर एकल संक्रमण पद्धत वापरून वर दिल्या प्रमाणे सर्वात कमी पसंती क्रमांक मिळालेल्या सदस्यांची मते त्यांना मिळालेल्या मतांमध्ये ज्या उमेदवारास पसंती क्रमांक दोन मिळालेल्या आहे त्यांना दिली जातात व याच पद्धतीने ज्या उमेदवारांची मते सर्वाधिक होतील तो उमेदवार निवडून येतो.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.