पैसे बचतीचे ३ सोप्पे आणि नवीन उपाय जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

आपल्या मराठी मध्ये एक म्हण आहे, सगळ्याचे सोंग आणता येते पण पैशाचे सोंग आणता येत नाही. असं म्हणतात माणसाच्या आयुष्यात 90 टक्के समस्या या पैशांमुळे असतात. यावरून आपल्या आयुष्यात पैशाचे किती महत्त्व आहे हे लक्षात येते. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि ज्यामार्गे आपण पैसे वाचवू शकतो. पैसे वाचवण्याचे 3 मार्ग:

१) बनावटी सेल्स किंवा डिस्काउंट पासून सावध राहा : हा मुद्दा नीट समजून सांगायचे आधी एक गोष्ट बघूया. दोन भावांचे कपड्याचे दुकान होते. मोठ्या भावाच्या एक गोष्ट लक्षात आली, की काही कपडे जुने झाले होते आणि ते विकले जात नव्हते. तेव्हा त्याने छोट्या भावाला विचारले की हे कपडे का विकली जात नाही? छोटा भाऊ म्हणाला मला पण काही समजत नाही.

हे कपडे कस्टमरला का आवडत नाही याची किंमत सुद्धा कमी करून पाहिली पण हे विकले जात नाही. मोठ्या भावाच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ती कल्पना आपल्या भावाला सांगितली. दुसऱ्या दिवशी जे कपडे जात नव्हते त्याच्यासमोर त्यांनी बोर्ड लावला.

50% डिस्काउंट याचे फक्त तीन पीस राहिले आहेत. लोकांची जबरदस्त मागणी. हा बोर्ड बघून लोकांना वाटले या कपड्यांची लोकांमध्ये प्रचंड मागणी आहे. शिवाय 50% डिस्काउंट मध्ये सुद्धा मिळत आहे त्यामुळे जे कपडे जात नव्हते ते पटापट विकायला सुरुवात झाली. आणि बरेच दिवसांपासून पडून राहिलेली कपडे काही वेळातच विकले गेले.

हे सगळे झाल्या नंतर च दोघे भाऊ जोर जोरात हसू लागले. भलेही ही गोष्ट छोटी आहे पण आज सुध्दा बरेच ब्रँड आपल्या सोबत असेच करतात. ते फक्त सेल किंवा डिस्काउंट चा बोर्ड लावून आपल्याला मूर्ख बनवतात. ते 30% किंवा 50% असा बोर्ड लावतात पण वास्तवात त्या वस्तूंचा भाव दुप्पट करून त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट लावत असतात.

आपण फक्त हे बघतो की 5000 ची गोष्ट आपल्याला 2500 मध्ये मिळत आहे. आणि आपल्याला वाटते आपला खूप फायदा झाला. त्यामूळे सेल्स मधून वस्तू विकत घेताना नीट तपासून बघा. की खरच त्या वस्तूवर डिस्काउंट दिला आहे का कोण आहे का? वेगवेगळ्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत तपासून बघा.

तेव्हा तुम्हाला समजेल की खरच त्या वस्तूवर डिस्काउंट आहे का नाही. सगळेच सेल्स ऑफर किंवा डिस्काउंट ऑफर वाईट असतात असे अजिबात म्हणायचे नाही. फक्त डिस्काउंट च्या नावाखाली आपल्याला कोणी मूर्ख बनवू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे.

2) देखावा करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा: आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्यांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. आपण सुद्धा हळूहळू त्यांच्या सारखे व्हायला लागतो. जर तुमची संगत अशा लोकांबरोबर आहे जे खूप शो ऑफ करतात, तेव्हा अनावधानाने तुमचे सुद्धा विचार त्यांच्यासारखे व्हायची शक्यता आहे.

अशी शो ऑफ करणाऱ्या मानसिकतेची लोक तुम्हाला जास्त खर्च करायला भाग पाडू शकतात. हे लोक नेहेमी महागड्या वस्तू विकत घेतल्यावर तुमची स्तुती करतील आणि स्वस्त वस्तू विकत घेतल्यावर तुम्हाला नाव ठेवतील. उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्या बजेटमधला एखादा स्मार्ट फोन विकत घेतला व त्यात बऱ्या पैकी चांगले फीचर्स आहेत तेव्हा ही लोक तुम्हाला म्हणतील,

‘अरे काय एवढा साधा फोन विकत घेतला. वन प्लस किंवा आय फोन विकत घ्यायचा होता.’ तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे असे बोलले तुमचे मानसिक रित्या खच्चीकरण करू शकते आणि अशाने तुम्ही तुमचे पैसे अशा गोष्टींवर खर्च कराल याची तुम्हाला गरज नाहीये.

त्यामुळे तुम्ही असे मित्र बनवा जे शो ऑफ नाही पण तुमचे व्यक्तिमत्त्व बघून तुमच्या बरोबर मैत्री करतात. असे मित्र तुम्हाला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून किंवा पैशाची उधळपट्टी करण्यापासून थांबवतील. अशाने तुम्ही महागड्या वस्तू विकत घेणार नाही आणि तुमचे भरपूर पैसे वाचतील.

३) नवीन एडिशन चे व्यसन : हे एक असे व्यसन आहे ज्यामध्ये माणसाला प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन एडिशन च्या गोष्टी विकत घ्यायची इच्छा असते. आणि मग त्या विकत घेण्यासाठी ते कर्ज काढायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. मी अशी लोक पाहिली आहेत जे प्रत्येक वर्षी आपला स्मार्टफोन बदलतात आणि दोन ते तीन वर्षांनी आपली कार बदलतात.

मग मंडळी त्यांचा जुना मोबाईल किंवा कार एकदम चांगल्या प्रकारे काम देत असेल. पण मार्केटमध्ये नवीन मॉडेल आले असल्यामुळे त्यांना सगळ्यांना दाखवायचे असते की आम्ही बघ अशा सगळ्या गोष्टी अशा लेटेस्ट वापरतो. हे सवय तुमच्या मध्ये असेल तर आत्ताच सावध व्हा. कारण ही सवय तुम्हाला फक्त अधोगती कडे घेऊन जाणार आहे.

पण मार्केटमध्ये सातत्याने काही ना काही नवीन येत राहणार आणि ती विकत घेण्यासाठी तुम्ही सातत्याने अशी पैसे उधळत राहिला तर पुढे काय होईल हे मला वेगळे सांगायची गरज नाही. या चक्रामधून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला असेट लायबिलिटी मधला फरक करता आला पाहिजे. या तीन मार्गांचा वापर करून तुम्ही आजच्या काळात भरपूर पैसे बचत करू शकता.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.