पैशाबद्दलचे ५ धडे अजिबात चुकवू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल !
मित्रांनो, को’रो’ना या म’हामा’री मुळे पूर्ण जग हादरून गेले आहे. या मुळे पूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पण या को’रो’ना ने आपल्याला पैशाबद्दल ५ महत्वाच्या गोष्टी शिकवल्या आहे. कि ज्या आपल्या आयुष्यात आपण आज अंगिकारल्या नाही तर आपले भविष्य अडचणीचे असणार आहे.
१)हेल्थ इन्शुरन्स चे महत्व: मित्रांनो प्रत्येक वर्षी हेल्थ इन्शुरन्स विकत घेणे, किती महत्त्वाचे आहे. हे आपल्याला समजले. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपण आपल्या परिवारा साठी एका वर्षासाठी दवाखान्या मध्ये होणाऱ्या उपचारांसाठी घेतलेली पॉलिसी काही दिवसांपूर्वी एक वेळ अशी होती,
की सरकारी दवाखान्या मध्ये को’वि’ड रुग्णां’साठी एकही बेड उपलब्ध नव्हते. अशावेळेस नाईलाजाने लोकांना प्रायव्हेट दवाखान्या मध्ये जावे लागले. आणि सामान्य माणसाला प्रायव्हेट दवाखान्या तील खर्च अजिबात परवडत नाही. अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स कामाला येतो.
तुमच्या परिवाराचा ३ लाख किंवा ५ लाखाचा इन्शुरन्स असेल तर तुम्ही निर्धास्त राहता, नाही तर ऐनवेळा ला पैशाची जमाव जमवी करने, लोकांकडे पैसे मागणे, दागिने मोडणे, अशा गोष्टीला सामोरे जावे लागते. म्हणून वर्षाला थोडे पैसे देऊन पूर्ण परिवाराचा हेल्थ इन्शरन्स करणे, शहाणपणाचेे लक्षण आहे.
2)इमर्जन्सी फंड: मित्रांनो आपण पाहिले की या को’रोना काळामध्ये लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आणि अर्थव्यवस्था कोलमडल्या मुळे कंपन्या मध्ये नोकऱ्याच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे लाखो लोकांचे महिन्याचे उत्पन्न अचानक पूर्ण पणे बंद झाले. आपण अनेक बातम्या वाचल्या असतील, की आर्थिक अडचणी मूळे ह्या को’रोना च्या काळात अनेक लोकांनी आ’त्मह’त्या केली.
त्यामुळे मित्रानो उद्या जर अशी परस्थिती तुमच्यावर ओढवली तर तुमच्याकडे ६ महिने किंवा वर्षभर तुमचे घरे चालेल एवढा इमर्जनसी फंड बँकमध्ये उपल्ब्ध हवा. म्हणजे तुमच्याकडे येवढे पैसे पाहिजे, की उद्या जर तुमचे महिन्यांचे उत्पन्न बंद झाले, तरी ६ महिने किंवा 1 वर्षभर तुमचे घर व्यवस्थित काही अडचण न येता चाले पाहिजे.
3)पोर्टफोलिओ ची योग्य प्रकारे विभागणी आवश्यक: मित्रांनो या मुळे शेअर मार्केट सुध्दा कोसळले होते, तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये जर गुंतवणूक करत असाल. तर तुम्हाला समजले असेल कि कोणत्याही एका सेक्टर च्या शेअर मध्ये गुंतवणूक करून फायदा नाही. तुम्हाला तुमची गुंतवणूक वेग वेगळ्या सेक्टर मध्ये करावी लागेल याचे कारण म्हणजे एक किंवा दोन सेक्टर जरी कोसळले तरी दुसरे सेक्टर वर असल्यामुळे तुमचे नुकसान होत नाही.
४)बचतीचे महत्त्व(म्हणजे फालतू खर्च टाळणे): मित्रांनो, या लॉ’कडा’ऊन मध्ये माझ्या सुद्धा काही मित्रांच्या नोकऱ्या गेल्या. ज्या वेळेस मी या मित्रांबरोबर बोलायचो तेव्हा ते मला सांगायचे आमच्याकडे पैसे होते तेव्हा आम्ही निष्कारण काही गोष्टींवर खर्च केला.
जशी की मोबाईल असताना सुद्धा फक्त बाजारात नवीन व्हर्जन चा मोबाईल आला आहे म्हणून तो विकत घेणे. प्रत्येक आठवड्याला महागड्या पार्ट्या करणे, महागडे कपडे घेणे, महागडे शूज घेणे. त्यांचे म्हणणे होते की ते पैसे वाचवले असते किंवा कुठे गुंतवले असते, तर आता संकट काळी ते कामाला आले असते.
मित्रांनो, ह्याने आपल्याला बचतीचे महत्त्व शिकवले आहे तुम्ही मौज मज्जा नक्की करा. एन्जॉय करा. पण पैसे आहे म्हणून गरज नसताना फालतू गोष्टींवर खर्च करू नका. इथे मला वॉरेन बफेट यांचा एक विचार खूप आवडतो. तुम्ही जर अश्या वस्तू विकत घेतल्या ज्याची तुम्हाला गरज नाहीये, तर मग लवकरच तुम्हाला अध्या वस्तू विकाव्या लागतील ज्याची तुम्हाला गरज आहे. म्हणून बचतीला महत्व द्यायला सुरुवात करा आणि फालतू खर्च टाळा.
५)पॅसिव्ह इनकम(अप्रत्यक्ष उत्पन्न) चे महत्व: मित्रांनो, passive इनकम म्हणजे काम एकदाच करायचे. पण त्या कामाचे पैसे तुम्हाला सातत्याने मिळत राहणार. उदाहरण म्हणजे समजा तुमची जमीन आहे. तिथे तुम्ही छोट्या छोट्या खोल्या बांधता आणि त्या भाड्याने देता.
आता बघा त्या खोल्यांचे भाडे तुम्हाला आयुष्य भर मिळत राहणार. पॅसिव्ह इनकम चे दुसरे उदाहरण म्हणजे तुम्ही शेअर मार्केट मध्ये चांगल्या कंपन्याचे स्टॉक मध्ये पैसे गुंतवले आता ती कंपनी जस जशी प्रगती करत रहाणार. तुम्हाला डिव्हिडंट ह्या स्वरूपात त्याचा मोबदला आयुष्य भर मिळत रहाणार.
सध्या इंटनेट मुळे तुम्ही अनेक मार्गाने पॅसिव्ह इनकम कमवू शकता. जसे ब्लॉगिंग, यू-ट्यूब, ॲप बनवने, पुस्तके लिहिणे, ऑनलाईन कोर्सेस बनवणे. याने आपल्याला पॅसिव्ह इनकम चे किती महत्व आहे हे सांगितले आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.