आपल्या मोबाईल द्वारे केवळ ५ मिनिट मध्ये नवीन पॅनकार्ड काढा ।। घरबसल्या मोफत ऑनलाईन पॅनकार्ड काढा ।। जाणून घ्या संपूर्ण माहिती !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

आयकर विभागाने पॅनकार्ड बनवणे खूप सोप्पे आणि मोफत केले आहे. पूर्वी पॅनकार्ड काढण्यासाठी पैसे आणि वेळ देखील जास्त लागायचा आता मात्र आपण आपल्या मोबाईल द्वारे केवळ ५ मिनिट मध्ये पॅनकार्ड काढू शकता त्यासाठी हा महत्वपूर्ण लेख पूर्ण वाचा.

-सर्व प्रथम आपल्याला पॅनकार्ड काढण्यासाठी google द्वारे आयकर विभागाच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर ची लिंक 👇 https://www.incometaxindiaefiling.gov.in/home -लिंक वर click केल्या च्या नंतर एक वेब पेज उघडेल त्यानंतर डाव्या बाजूला काही लिंक दिसतील

त्यातील तुम्हाला Instant PAN Through Aadhar या लिंक वर click करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन वेब पेज दिसेल. हे नवीन पेज उघल्या नंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील 1)Get New PAN 2)Check Status /Download PAN असे दोन पर्याय दिसतील.

मात्र आपल्याला नवीन पॅनकार्ड काढायचं आहे त्यामुळे आपल्याला 1)Get New PAN हा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय निवडल्या नंतर एक फॉर्म उघडेल त्यानंतर पहिल्या रिकाम्या चौकटीत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर त्याच्या पुढच्या चौकटीत तुम्हाला इंग्रजी मध्ये कॅप्चा दिसेल

तो तुम्हाला नीट बघून जशाच्या तसा पुढच्या चौकटीत टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला confirm या वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर तुम्हाला Generate Aadhar OTP पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल क्रमांक लिंक आहे

त्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येइल तो OTP क्रमांक तुम्हाला या चौकटी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला Terms and Condition या पर्यायाला ok करून validate Aadhar OTP आणि continue या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड वर असलेली संपूर्ण माहिती दिसेल,

जसे की तुमचा संपुर्ण पत्ता फोटो वगैरे संपूर्ण माहिती दिसेल.त्यानंतर तुम्हाला I accept that हा पर्याय निवडायचा आहे आणि त्याच्या नंतर तुम्हाला Submit PAN request हा पर्याय निवडायचा आहे, त्याच्या नंतर तुम्हाला एक Token id/Application id मिळेल

किंवा click here असा पर्याय दिसेल त्याच्या वरती click करून तुम्ही परत सुरवातिच्या किंवा मुख्य पेज वर येता म्हणजेच जे आपण पॅनकार्ड कडण्यासाठी जे सुरवातीला पेज open झाले होते त्या मुख्य पेज वर येता. मुख्य पेज वर आल्यानंतर तुम्हाला Instant आधार हा पर्याय निवडायचा आहे

आणि त्याच्या नंतर check status and Download हा पर्याय निवडायचा आहे. त्यांनतर तुम्हाला पहिल्या रिक्त जागेमध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.त्यांनतर तुम्हाला एक चौकटीत इंग्रजी मध्ये कॅप्टचा दिला असेल उदा.(Y796HB) व्यवस्थित पाहून तो जशास तसा त्याचा खाली असलेल्या रिकाम्या जागेत टाकायचा आहे,

त्यानंतर तुम्ही जो मोबाईल क्रमांक आधार कार्ड ला जोडलेला आहे त्या नंबर वर एक OTP क्रमांक येईल तो रिकाम्या जागेत टाकायचा आहे आणि नंतर submit हा पर्याय निवडायचा आहे. PAN allotment Successful अशी सूचना दिसेल. त्याच्या खाली तुम्हाला Download PAN असा पर्याय दिसेल

त्याच्यावर click केल्यानंतर तुमचे पॅनकार्ड Download होईल Download केलेले पॅनकार्ड तुम्हा open करायचे आहे .ते open करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागेल. त्या पासवर्ड च्या ठिकाणी पासवर्ड म्हणून तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकायची आहे.

त्यांनतर submit या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला तुमच पॅनकार्ड ओपन करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचं ओरिजन पॅनकार्ड मिळेल, त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काडून घ्यायांची आहे. हे पॅनकार्ड तुम्ही बँकिंग किंवा इतर शासकीय कामासाठी वापरू शकता. धन्यवाद !!!

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “आपल्या मोबाईल द्वारे केवळ ५ मिनिट मध्ये नवीन पॅनकार्ड काढा ।। घरबसल्या मोफत ऑनलाईन पॅनकार्ड काढा ।। जाणून घ्या संपूर्ण माहिती !

Comments are closed.