सातवी पास उद्योजक ज्याने चार हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला ।। पापड व्यवसायातून लाखोंची उलाढाल करणारे राजू डोंगरे यांची यशोगाथा !!

अर्थकारण बातम्या लोकप्रिय

सोलापूर ,एक अस शहर जिथे बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे, कापडमील व्यवसायाच हे शहर,अशा शहरातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच काम केलं तेथील राजेश उर्फ राजू डोंगरे यांनी. इयत्ता सातवी शिकलेले राजू डोंगरे यांनी पापड बनवण्याचा लघुउद्योग सुरू केला, तांदळाचे पापड ,उडीद डाळीचे पापड, लोणची हे पदार्थ जेवणात असले की जेवणाला चव येते,

सोलापूर मध्ये उडीद डाळीच्या पापडला जास्त मागणी आहे, म्हणून राजेश यांनी हेच काम करण्याचे ठरवले. 2013 पासून त्यांनी या पापडाचा छोटेखाणी व्यवसाय सुरू केला सुरुवातीला अगदी चार महिला ते आता चार हजार महिलांना त्यांनी आतापर्यंत रोजगार मिळवून दिला आहे. तसेच दहा हजार महिलांना रोजगार मिळवून देणे हे त्यांचं लक्ष आहे.

राजेश डोंगरे यांचे वडील विष्णू मिल मध्ये कामाला होते, त्याच्या नंतर त्यांच्या पत्नी, राजेश डोंगरे यांच्या आई ने त्याच कंपनी मध्ये वॉचमन चे काम केले, सोबतच त्या पापड लाटण्याचे काम करु लागल्या. त्यांची मूलं ते आणलेलं पापडच पीठ ओढून देण्याचं तसेच इतर छोटी मोठी मदत करत असत.

जेव्हा मूलं मोठी झाली तेव्हा एक जण नोकरी वर लागला तर राजेश यांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले, सुरुवातीला फक्त चार बायकांना घेऊन त्यांनी पापड बनवण्याचे काम चालू केले, काम चालू करताच नवीन नवीन अडथळे येऊ लागले, लोक त्यांना चिडवू लागले, हे बायकांचं काम आहे हे काय करतोस,

पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, हळू हळू मागणी वाढू लागली आधी शंभर किलो डाळ ते आता ऐंशी टन डाळ चे पापड दर महिन्याला ते बनवतात, या मध्ये त्यांना सदैव साथ दिली ती त्यांच्या आई ने. सकाळी 4 ते 7 च्या दरम्यान पीठ मळण्याचं काम केलं जातं, मग ते पीठ इतर सेंटर ला पोचवतात, तिथे बाया येऊन 7 ते 9 च्या दरम्यान ते पीठ घरी घेऊन जातात

आणि मग पापड लाटून संध्याकाळी 4 ते 7 च्या दरम्यान ते आणून देतात, त्या पापडच वजन करून 25 रुपये किलो या प्रमाणे बायकांना पैसे दिले जातात. हे बनवलेले जास्तीत जास्त पापड बाहेर जातात, मुंबई मधील हॉटेल ओबेरॉय, ताजमहल, रिलायन्स या सारख्या मोठ्या हॉटेल व मॉल्स मध्ये ते पाठवले जातात, दर शनिवारी दहा टन पापड हे मुंबई ला जातात.

राजेश डोंगरे यांच्या या व्यवसायामुळे तेथील अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे,आणि त्याच श्रेय त्या महिला नेहमीच राजेश डोंगरे यांना देतात. गरिबीच्या परिस्थितीतून आज एक व्यायासायिक इथं पर्यंत चा प्रवास करताना त्यांना ही खुप अडचणी आल्या पण सर्व अडचणी वर मात करत, आणि जोखमींना तोंड देत त्यानी आज एक उत्तम आणि यशस्वी व्यायासायिक बनवून दाखवले आहे.