नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
प्रत्येकाच्या लहानपणीची कॉमन आठवण म्हणजे पार्ले जी बिस्कीट. चहात बुडवून खा किंवा मग पाण्यात बुडवून खा. कोणी आजारी पडल तर पार्ले जी नेतात. वाढदिवसाला भेट म्हणून पार्ले जी पुडा. तसा पार्ले जी बिस्कीटांचा संबंध 90 च्या पिढीशी जरा जास्त जवळचा आहे. आता बरीच बिस्कीट बाजारात आली पण पार्लेजी बिस्कीटांना तोड नाही. अजूनही कंपनी टॉपला आहे.
पण एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे महागाई वाढते पण पार्ले जी पुडा आज पण पाच रुपयातच का मिळतो? नेमका पार्ले जी चा मार्केटिंग फंडा आहे तरी काय? : याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आधी पार्ले चा इतिहास पाहायला लागेल. पार्लेजी कंपनी अस्सल भारतीय कंपनी आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला म्हणजेच 1939 च्या दरम्यान मुंबईचा पार्ल्यात ही कंपनी सुरू झाली. महात्मा गांधीजींचं स्वदेशी आंदोलन हे पार्ले जी कंपनी चे मूळ असल्याचं सांगितलं जातं.
त्या वेळेस भारतीय व्यापार पेठेवर ब्रिटिशांचं राज्य होतं. विदेशी महाग वस्तू भारतात विकल्या जायच्या ज्या श्रीमंत लोकांनाच परवडायच्या. त्या काळात ब्रिटिश लोक भारताबाहेर बनवली जाणारी कॅण्डी खायचे. कँडी चा व्यापार सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायचा. स्वदेशी आंदोलनातून प्रेरणा घेत मोहनलाल दयाळ यांनी भारतीयांसाठी भारतीय गोष्टी करायचं ठरवलं. ते जर्मनीत जाऊन कॅण्डी बनवायला शिकले आणि भारतात येऊन कारखाना टाकला.
पार्ले कंपनी मध्ये तयार झालेला पहिला पदार्थ होता ऑरेंज कॅन्डी. कमी किमतीची ही कँडी जबरदस्त लोकप्रिय झाली. मोहनलाल दयाळ यांची इंग्रजी व्यापाऱ्यां सोबत उठ बस असायची. त्यांना लक्षात आलं की ब्रिटिश लोक चहा बरोबर बिस्कीट खातात. त्यांनीही ठरवलं की आपणही याच क्वालिटी ची पण स्वस्तात अशी बिस्कीट बनवायची आणि पार्ले ग्लुकोज बिस्किटांचा जन्म झाला.
पार्ले बिस्कीटांची किंमत अगदी मजुरी करणाऱ्यांनाही परवडेल इतकी कमी होती आणि बिस्किटांची क्वालिटी पण उत्तम होती आणि हळूहळू पार्ले बिस्कीट अगदी खेड्यापाड्यात पोहोचल. त्याआधी भारतीयांना बिस्किट नावाचा प्रकारच माहिती नव्हता. या बिस्किटांनी ब्रिटिशांना सुद्धा वेड लावलं होतं. दुसर महायुद्ध संपलं आणि भारतात गव्हाची कमतरता भासू लागली.
बिस्किटे बनवण्याच्या कच्चा माला मध्ये गहू महत्त्वाचा घटक होता. पण अशा परिस्थिती समोर नाईलाजाने पार्ले जी ला प्रोडक्शन बंद करावा लागल, अगदी फॅक्टरीला कुलूप लागलं. 1975 मध्ये कंपनी पुन्हा सुरू झाली. पण या दरम्यान मोहनलाल यांचे निधन झाले. 1982 साली पार्ले ग्लुकोज चे नाव बदल पार्ले जी करण्यात आले. आणि पाकिटावरच चित्रातही बदल केला. पुड्यावर आधी गाईचे आणि गवळणी चे चित्र होते. त्याची जागा एका लहान मुलीने घेतली होती.
हा फोटो सुधा मूर्ती यांचा असल्याची अफवा मध्यंतरी पसरली होती. पण खरंतर या चित्रातली मुलगी अस्तित्वातच नाही हे तर फक्त एक चित्र होतं अशी आख्यायिका आहे. 80 च्या दशकात कंपनीने बिस्किटांचे भाव थोडेसे वाढवले आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यावर होत अगदी तसेच आंदोलन लोकांनी केलं.
शिवाय विक्रीदेखील कमी झाली. नाइलाजने कंपनीला शेवटी माघार घ्यावी लागली आणि पुन्हा आधीचेच भाव लागू करण्यात आले. पण या घटनेनंतर कंपनीला कळले की आपले प्रोडक्ट प्राईज सेन्सेटिव्ह आहे. लोकांच्या मनात पाच रुपयाचा पार्लेजी ही गोष्ट अगदी फिट बसली आहे. भारतीय ग्राहक हा किमतीला प्रायोरिटी देतो आणि हीच गोष्ट कंपनीला समजल. त्यानंतर आजतागायत कंपनीने कधीच बिस्कीट चा पुडा ची किंमत वाढवली नाही.
●आता कंपनीचे पैसे वाचवण्याच्या ट्रिक्स पाहूया : कंपनी ट्रांसपोर्टेशन आणि पॅकेजिंग चा खर्च वाचवते. कंपनीचा एकूण दहा फॅक्टरीज आहेत. शहराच्या 60 किलोमीटरचा आतच कंपनीचा फॅक्टरी असतात. त्यामुळे ट्रांसपोर्टेशन चा खर्च वाचतो. ज्या शहरापासून लांब आहेत तिथं कंपनी थर्ड पार्टी मॅनुफॅक्चरींग युनिट ऑपरेट करते. पार्ले चा आवरण आधी कागदापासून बनलं जायचं महागाई वाढत गेली तसा कागदाला भाव आला आणि कंपनीने कागदाऐवजी प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. खेड असो किंवा शहर असो आजही पार्ले पुडा पाच रुपयाला मिळतो. कंपनीने ब्रँड व्हॅल्यू म्हणून प्रसंगी तोटा सहन केला.
पण पार्ले जी ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करते का? : तर नाही. त्यांनी एक स्ट्रॅटेजी वापरली आहे. जरी सिग्नेचर प्रोडक्ट पार्ले जी असले तरी होणारा तोटा भरून काढण्यासाठी कंपनी इतर प्रीमियम प्रॉडक्ट विकते. जसे की हाइड अँड सिक, मोनॅको, मिलानो, ट्वेंटी-ट्वेंटी, फॅब ही बिस्किटे त्यांना प्रॉफिट मिळवून देतात. आजही पार्ले कंपनीचा जागतिक बिस्किट मार्केट मधला हिस्सा 60 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.
पार्ले जी ने मार्केटिंग फंडा असा वापरला की बिस्किट पुडा ची किंमत वाढवली नाही तर बिस्किटांचे वजन आणि क्वांटीटी कमी केली. आजही पार्ले पुडा पाच रुपये लाच म्हणतो पण बिस्किटांचा वजन आता 55 ग्रॅम असत. या पाच रुपयातले तीन रुपये कच्च्या मला साठी वापरले जातात तर 20 ते 25 टक्के पैसे हे पॅकेजिंगसाठी वापरले जातात. या बिस्कीटा मधून प्रॉफिट मार्जिन खूप कमी ठेवले आहे. ज्यामुळे भाव वाढवण्याचा कधी प्रश्नच येत नाही. आणि ग्राहक सुधा प्रोडक्टशी जोडून राहतो.
2003 साली पार्ले-जी सगळ्यात जास्त विकले जाणारे बिस्कीट बनलं. तर 2012 साली कंपनीने फक्त पार्ले जी बिस्कीट मधून पाचशे कोटींची विक्री केली. आता बिजनेस च्या बाबतीत सांगायचं झालं तर पार्ले बिस्कीट काय साधसुध बिस्कीट नाही. तर बिस्किटांच एक मोठे साम्राज्य आहे. आणि चवीच्या बाबतीत सांगायचे झाले तर पाण्यात बुडवून खा किंवा चहात.. चुरा करुन दुधात खा किंवा आवाज करून खा.. पार्ले जी म्हणजे आपलं बालपणच आहे, कडकी लागल्यावरच तरुणपण आहे आणि आयुष्यभर जपण्यासारखी आठवणही आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.