कोर्टातून जमिनीची वाटणी कशी करून घ्यावी? जाणून घ्या वाटणीच्या दाव्याबद्दल सविस्तर माहिती.

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण अश्या समाजात राहतो, जिथे आपल्या मुला-मुलींबद्दल अपार प्रेम आणि काळजी आई-वडील, आजी-आजोबा यांना असलेले आपणास पहावयास मिळते. याचेच एक खूप चांगले उदाहरण म्हणजे, आई-वडील प्रॉपर्टीचे खरेदी दस्त स्वतःच्या नावे न करता डायरेक्ट आपल्या मुलाच्या किंवा मुलींची नावे करून देत असतात. कुटुंब खूपच जास्त श्रीमंत असेल तर प्रत्येक मुलाच्या नावे वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे खरेदी दस्त देखील करून देतात तरी देखील पुढे जाऊन भविष्यामध्ये प्रॉपर्टी संबंधाने वाटपाबद्दल खूप मोठे वाद निर्माण होत असतात.

एक उदाहरण पाहून ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. रमेश आणि सुरेशच्या वडिलांनी दोघांच्या नावे प्रत्येकी 18 एकर आणि 23 एकर जमीन खरेदी केली होती. जमीन रमेश आणि सुरेशच्या नावे विकत घेतली तेंव्हा दोघांचे वय अनुक्रमे 18 वर्षे आणि 20 वर्षे असे होते. रमेशच्या नावे असणारी 18 एकर जमीन अगदी गावच्या जवळ आणि महामार्गालगत होती. त्याचप्रमाणे सुरेश च्या नावे असणारी 23 एकर जमीन गावापासून चार ते पाच किलोमीटर दूर अंतरावर असून ती शेतजमीन होती. अशा परिस्थितीमध्ये सुरेश ने रमेश कडे वाटपाबाबत विचारणा केली असता रमेश ने सदर जमीन माझे खरेदीचे आहे आणि त्यामध्ये वाटपाचा काहीच संबंध नाही अशी सुरेश ला उडवाउडवीची उत्तरे दिली.

आता अश्या परिस्थितीत दोन प्रश्न निर्माण होतात, एक म्हणजे, सुरेश ला रमेश च्या प्रॉपर्टी मध्ये वाटपाची मागणी करता येईल का? आणि दूसरा प्रश्न म्हणजे, सुरेश ला त्यासाठी कोणता पुराव्यांची गरज लागेल?

या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर पाहूया.

1. पहिला प्रश्न : सुरेशला वाटप मागता येईल का? : तर हो. सुरेश ला त्या प्रॉपर्टीमध्ये वाटपाची मागणी करता येईल. त्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे पुरावे म्हणून दाखल करावे लागतील ते आपण सविस्तर पाहू या. सुरेशला वाटपाचा दावा कसा दाखल करता येईल ते सर्वप्रथम पाहूया.
या उदाहरणाच्या इतिहासात थोडेसे डोकावून पाहिले तर आपल्याला हे स्पष्ट लक्षात येईल की सदर ची प्रॉपर्टी ज्या वेळेस रमेश आणि सुरेश च्या नावावर खरेदी केली गेली होती त्यावेळेस तीजमिन रमेश व सुरेश च्या वडिलांनी स्वकष्टार्जित पैशांमधून खरेदी केली होती. म्हणजे ती प्रॉपर्टी रमेश आणि सुरेश च्या वडिलांनी त्याच्या एकत्र कुटुंबात खरेदी घेतलेली होती. किंबहुना ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबातील उत्पन्नातून खरेदी घेतलेली होती आणि त्यामुळे सुरेश या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे मध्ये सरस निरस मनाने वाटप मागू शकतो. परंतु या वाटपाच्या दाव्यांमध्ये सुरेशला असे काही कागदोपत्री पुरावे दाखल करावे लागतील ज्यामध्ये स्पष्ट झाले पाहिजे कि, ती प्रॉपर्टी रमेशने त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक उत्पन्नातून घेतलेली नाही.

2. कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल? : सर्वात प्रथम सुरेशने कोर्टासमोर त्या बँक खात्याचा उतारा दाखल करावा लागेल कि ज्या खात्यामधून पैसे त्या पूर्वीच्या जमीन मालकाला दिलेले आहेत. आता अनेक जणांच्या मनात एक प्रश्न देखील उद्भवला असेल की, जुन्या काळात सर्व व्यवहार रोखीने व्हायचे तर त्याचा कागदोपत्री पुरावा कसा उपलब्ध करता येईल? बघा जर ते खरेदी खताचे पैसे बँकेच्या खात्यातून काढून पूर्वीच्या मालकाला सुरेशच्या आणि रमेश च्या वडिलांनी दिलेली असतील तर त्या खात्यामधून त्या विशिष्ट दिवशी एवढी मोठी रक्कम काढली गेलेली होती. तर निश्चितच त्याच दिवशी दस्त झालेला असल्याने ती रक्कम त्याच विशिष्ट दिवशी काढली गेलेली होती. हे कोर्टाला पटवून द्यावे लागेल.

आता आणखीन खोलवर विचार केला, आणि असे समजून चालले की ते पैसे रोख स्वरूपात दिले होते आणि ते घरातील पैसे होते तर अशा परिस्थितीमध्ये काय पुरावा दाखल करावा? तर अशा परिस्थिती मध्ये त्या खरेदी दस्ताचे वेळेस जे कोणी साक्षीदार हजर होते, त्यांना साक्षीदार म्हणून कोर्टासमोर हजर करावे. त्या साक्षीदाराची साक्ष घेऊन कोर्टाला ही बाब पटवून द्यावी कि, सदर खरेदी दस्ताचे पैसे रोख स्वरूपात सुरेश आणि रमेश चे वडील यांनीच दिलेले होते.

आता आपण इथे सर्वच परिस्थिती ग्राह्य धरतोय तर, आणखीन एक वाईट परिस्थिती ग्राह्य धरू कि, दस्त करते वेळेस तेथे हजर असणारे साक्षीदार किंवा ओळखदार कोणीच जिवंत नाही. तर मग आता कसे सिद्ध करणार की पैसे सुरेश आणि रमेश च्या वडिलांनी दिले होते. अशा परिस्थितीत ते हे फक्त आणि फक्त रमेशच्याच पुराव्यातून सिद्ध करता येईल की, ते पैसे रमेशने दिलेले नसून त्याच्या वडिलांनी दिलेली आहेत. आता ते कसे सिद्ध करता येईल? ते आपण पाहू.

बघा जेव्हा रमेश ची साक्ष किंवा सुरेश चे वकीलसाहेब उलट तपास घेतील त्यावेळेस त्यांनी रमेश ला कोण कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? की जेणेकरुन सत्य कोर्टासमोर येईल याचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. या गोष्टीसाठी अनुभवी आणि हुशार वकीलसाहेबांची आपण निवड केलेली असेल तर आपले काम बर्‍यापैकी सोपे होईल. चला आपण आपल्या उदाहरणात कोणते प्रश्न विचारले गेले हे पाहूया.

सर्वप्रथम तर रमेशचे खरेदी दस्ता वेळेस चे वय विचारलं पाहिजे . जे होते 18 वर्ष. अठरा वर्ष आणि मग जमीन खरेदी करते वेळेस रमेश काही काम धंदा करत होता का, जेणेकरून रमेशने प्रॉपर्टी खरेदी केली? अशा परिस्थितीमध्ये जर रमेशने अठरा वर्षाच्या वयात तो काहीच काम धंदा करत नव्हता किंवा ती जमीन खरेदी घ्यायला त्याच्याकडे ते पैसे कोठून आले याबाबत व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत, तर निश्चितच रमेश खोटे बोलत आहे हे कोर्टापुढे सिद्ध होईल. आणि ती जमीन खरेदी करण्यासाठी जर रमेशने पैसे नाही दिले तर मग ते पैसे रमेश च्या वडिलांनीच एकत्र कुटुंबातील पैशातून जमीन खरेदी घेतली आणि ते रमेश च्या नावावर करून दिलेली होती. त्या यामुळे ती प्रॉपर्टी रमेश ची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी नसल्याने तसेच एकत्र कुटुंबातील प्रॉपर्टी असल्याने सुरेश त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप मागू शकतो.

परंतु इथे गोष्ट हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे, जसे सुरेश हा रमेशच्या प्रॉपर्टी मध्ये वाटा मागू शकतो, तसेच रमेश देखील सुरेशच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा मागू शकतो.

आता इथे एक परिस्थिती अशी देखील असू शकते की रमेशने त्या मिळकती पैकी काही मिळकतीची विक्री केलेली असू शकते. अशा परिस्थितीमध्ये सुरेश तो खरेदी दस्त त्याला वाटपामध्ये येणाऱ्या हिस्यावर बंधनकारक नाही असे कोर्टाने जाहीर ठराव करून द्यावा अशी देखील मागणी सुरेश या वाटपाचा दाव्यामध्ये करू शकतो. म्हणजेच सुरेश याच दाव्यामध्ये वाटप मागू शकतो. रमेशने प्रॉपर्टी ची विक्री करू नये म्हणून त्याच्या विरुद्ध मनाई मागू शकतो. प्रॉपर्टी संदर्भाने जर एखादा खरेदी दस्त झालेला असेल तर तो दस्त सुरेशच्या वाटपात येणार हिस्यावर बंधनकारक नाही असा जाहीर ठराव देखील करून मागू शकतो.

त्याचप्रमाणे जर रमेश ने खरोखर त्या प्रॉपर्टीचा खरेदी दस्त अगोदरच एखाद्या व्यक्तीला करून दिलेला असेल, तर त्या खरेदी दस्ताच्या अनुषंगाने तयार झालेला फेरफार देखील सुरेशला एसडीओ साहेबांकडे आव्हानित करावा लागेल. म्हणजेच जर सुरेशला रमेश कडून वाटप मागायचे असेल तर, अगोदर सांगितलेली कागदपत्रे तसेच कोर्टात दावा दाखल करून योग्य ते पुरावे दाखल करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे इथे आपण एखाद्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी घेतलेली असेल तर ती प्रॉपर्टी वाटपात कशी मागता येते. याबाबतची सविस्तर माहिती घेतलेली आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.