पासपोर्टचा फॉर्म घरबसल्या कसा भरायचा ।। पासपोर्ट फॉर्म भरण्यासाठी काय काय माहिती आवश्यक आहे? ।। पासपोर्टचा फॉर्म भरल्यानंतर पुढे काय प्रोसेस होते? ।। कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? याविषयी महत्वाची माहिती !

प्रवास लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, परदेशात जायचं म्हटलं तर आपल्याला पासपोर्टची गरज पडते आणि पासपोर्ट काढायचा म्हटलं तर तो कुठे काढायचा किंवा एजंट कडे जाऊन पासपोर्ट काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. आज आपण पाहणार आहोत की पासपोर्टचा फॉर्म घरबसल्या कसा भरायचा आणि पासपोर्ट फॉर्म भरण्यासाठी काय काय माहिती आवश्यक आहे? पासपोर्टचा फॉर्म भरल्यानंतर पुढे काय प्रोसेस होते? पासपोर्ट फॉर्म भरण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

कोणत्याही व्यक्तीचा पासपोर्टचा फॉर्म भरण्यासाठी त्या व्यक्तीची काही माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. ती माहिती कोणती तर त्या व्यक्तीचे पूर्ण नाव,जन्म ठिकाण, ईमेल आयडी,शिक्षण, सध्याचा पत्ता, सध्याच्या पत्त्यावर किती दिवसांपासून रहिवासी आहे?, कायमचा पत्ता, मोबाईल नंबर, वडिलांचे पूर्ण नाव, आईचे पूर्ण नाव, लग्न झाले असल्यास फॉर्म भरणारी व्यक्ती मुलगा असेल आणि तिचे लग्न झाले असेल तर पत्नी चे पूर्ण नाव, आपत्कालीन संपर्क साधण्यासाठी व्यक्तीचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर तसेच यापूर्वी पासपोर्टसाठी नोंदणी केली होती का हे माहीत असणे आवश्यक आहे.

आता आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या कोणत्याही ब्राऊजरमधे जा आणि तिथे टाइप करा passport असे केल्यानंतर तुमच्यापुढे एक पेज ओपन होईल येथील तिसरा पर्याय म्हणजे पासपोर्ट फॉर्म india या पर्यायावर क्लिक करा किंवा www.passport.gov.in या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही पासपोर्टसाठी फॉर्म भरू शकता.

तुमच्यापुढे पासपोर्ट सेवा चे एक पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला सर्वात आधी एक रजिस्ट्रेशन आयडी तयार करावा लागतो,रजिस्ट्रेशन आयडी तयार केल्यानंतर आपल्याला फॉर्म भरता येतो. फॉर्म भरून झाल्यानंतर मुलाखत होते, आपण याच पेजवरील check appointment availability या पर्यायावर क्लिक करून मुलाखत ठरवू शकता.

तसेच तुमच्या अर्जाचे स्थिती तपासण्यासाठी track application status या पर्यायावर क्लिक करू शकता. तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील किंवा काही शंका असतील तर या पेजवर दिलेल्या नंबर वर म्हणजे 1800 258 1800 या नंबर वर कॉल फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता.

चला तर पाहुयात नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचे: नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी new registration या पर्यायावर क्लिक करायची आहे असं केल्यावर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल तिथे पासपोर्ट ऑफिस या पर्याय पुढे तुमच्याजवळ तुमच्या जिल्ह्यातील पासपोर्ट ऑफिस साठी पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर त्याखाली तुमचं नाव, आडनाव आणि जन्मतारीख टाकायची आहे. तसेच तुमचा ई-मेल आयडी टाकायचा आहे,ईमेल आयडी टाकल्यानंतर तो आयडी तुम्हाला तुमच्या लोगिन आयडी म्हणून पाहिजे असेल तर खाली दिलेल्या Do you want your login id to be same as email id? या पर्याय पुढे yes पुढे टिक करा अन्यथा No या पर्याय पुढे ठीक करा.

जर तुम्ही तुमच्या लोगिन आयडी वेगळा ठेवत असाल तर तो खाली दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्या पुढे दिलेल्या check avaibility यावर क्लिक केल्यावर तुमचा लॉगीन आयडी आधीच जर असेल तर तो घेणार नाही जर तुमचा लॉगिन आयडि या आधी कोणी बनवलेला नसेल तर खाली हिरव्या रंगाचा मध्ये तुमचं लॉग इन आयडी बनल्याचे तुम्हाला दिसते.

त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर,चिन्हे आणि आकडे या सर्वांचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्याखाली तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, जो की तुमच्या सुरक्षिततेसाठी असेल या प्रश्नाचे उत्तर फक्त तुम्हालाच माहिती असायला हवे.

आपल्या सोयीनुसार दिलेल्या पर्यायातून प्रश्न निवडायचा आहे आणि त्याखाली त्याचे उत्तर लिहायचे आहे तसेच खाली दिलेल्या कॅपच्या लेटर्स जशीच्या तशी खालच्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत आणि दिलेल्या register या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुमच्यासमोर तुमचे रजिस्ट्रेशन झालेल्याचा मेसेज येईल तसेच रजिस्ट्रेशन झाल्यावर अकाउंट चालू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वर आलेल्या मेल वरील लिंक ला जाऊन सिलेक्ट करायचे आहे.

त्यासाठी तुमचा ईमेल आयडी ओपन करा आणि त्यामध्ये तुम्हाला आलेल्या ईमेल वरील लिंक वर क्लिक करायचे आहे, असे केल्यानंतर आपण पासपोर्ट सेवा या साइटवर जातो. तिथे तुम्हाला तुमचा लोगिन आयडी टाकायचं आहे आणि सब्मिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे असे केल्यानंतर तुमच्या अकाउंट यशस्वीरित्या उघडले गेल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल.

त्याखाली दिलेल्या click here to login या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुमच्यापुढे लॉगिन पेज उघडेल,या पेजवर लोगिन आयडी पर्याय समोर तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी टाकायचा आहे आणि continue या बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि दिलेला कॅपचा टाकायचा आहे आणि लॉगिन या बटणावर क्लिक करायचं.

आता तुमच्यापुढे ओपन झालेल्या पेजवरील Apply for fresh passport/Reuse of passport या पर्यायावर क्लिक करायचे आहे, इथे दिलेल्या alternative 1 मधील click here to fill the application form online यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे.

त्यानंतर applying for या पर्याय पुढे जर तुम्ही पहिल्यांदाच पासपोर्ट काढत असाल तर fresh passport किंवा परत पासपोर्ट करत असेल तर Re issue passport या पर्याय समोर क्लिक करायचे आहे. खाली दिलेल्या अर्जाच्या प्रकारांमध्ये (Type of application) तुम्हाला जर नियमित वेळेनुसार पासपोर्ट काढायचा असेल तर normal अन्यथा तात्काळ पासपोर्ट हवा असेल तर tatkaal पर्याय समोर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट किती पेजचा हवा आहे त्या पर्यायाला पुढे क्लिक करायचे आहे आणि next या बटन वर क्लिक करायचे आहे. तुमच्यापुढे applicants details हे पेज उघडेल इथे तुम्हाला तुमचे नाव, आडनाव, लिंग, तुमचे टोपण नाव असल्यास हो किंवा नाही या पर्याय पुढे क्लिक करायचे आहे तसेच याआधी तुम्ही कधी नाव बदलले आहे का? असल्यास yes अन्यथा no या पर्याय पुढे क्लिक करायचे आहे.

खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि भारतात जन्म झाला आहे का नाही ते लिहायचे आहे. तसेच तुमची जन्माचे ठिकाण, राज्य, जिल्हा, तुमची वैवाहिक स्थिती म्हणजे की विवाहित, अविवाहित, विधवा, विधुर अशाप्रकारे निवडायची आहे. तुम्ही जन्मापासून जर भारतीय असाल तरbirth पर्याय समोर क्लिक करायचे आहे.

तसेच तुमच्याकडे जर पॅन नंबर असेल तर तो टाकायचा आहे, वोटर आयडी असेल तर त्याचा नंबर टाकायचा आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे नोकरी करता म्हणजे तुमचा स्वतःचा बिझनेस आहे की सरकारी नोकरी आहे की खाजगी व्यवसाय आहे यापैकी जे काही पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक तुम्हाला निवडायचा आहे.

तुमचे शिक्षण जसे की पदवीधर आणि त्यावरील शिक्षण सातवी किंवा त्यापेक्षा कमी किंवा दहावी किंवा त्यापेक्षा जास्त अशा प्रकारे जे पर्याय दिले आहेत त्यापैकी एक निवडायचा आहे त्या खाली दिलेला non ECR हा पर्याय तुमच्या शिक्षणानुसार आपोआप निवडला जाईल.

जर तुमच्या शिक्षण पदवीधर किंवा किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील हे हे बाजूला दिलेल्या पर्यायांमध्ये लिहिलेले आहे. नंतर तुम्हाला खाली तुमचा आधार क्रमांक टाकायचं आहे आणि खाली दिलेल्या declaration वर yes क्लिक करून save my details या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची माहिती टाकायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव, आईचे नाव आणि आई-वडिलांअतिरिक्त जर दुसरे कोणी पालक असतील तर त्यांचे नाव तिथे टाकायचे आहे. तसंच लग्न झाले असल्यास जोडीदाराचे नाव टाकायचे आहे.

ही माहिती टाकल्यानंतर save my details ह्या बटणावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर next या बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे व सध्याच्या पत्त्या साठी लागणारा पुरावा म्हणून कोणताही एक कागद जोडायचं आहे. पत्ता टाकताना जसा तुमच्या कागदपत्रावर आहे, तसाच तुम्हाला तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा कायमचा पत्ता वेगळा असल्यास तो इथे टाकायचा आहे जर कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता एकच असेल तर Is your permanent address is same as your current address? यापुढे yes असे निवडायचे आहे.

पुन्हा save my details ह्या बटणावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर next या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आपत्कालीन पत्ता आणि फोन नंबर टाकायचा आहे, समजा तुम्ही कुठे बाहेर गेले आणि काही आपत्कालीन स्थिती आली तर या पत्त्यावर फोन करून किंवा इतर साधनांद्वारे त्या व्यक्तीस संपर्क करता येईल अशा व्यक्तीचा पत्ता आणि फोन नंबर तसेच ईमेल आयडी असल्यास तोही तिथे टाकायचा आहे.

आणि पुन्हा save my details ह्या बटणावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर next या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा आधी पासपोर्ट रोखला गेला आहे का? आधी तुम्ही पासपोर्ट बनवला आहे का? आधीच्या पासपोर्ट बद्दल माहिती आहे का? हे टाकायचे आहे व पुन्हा save my details ह्या बटणावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर next या बटनावर क्लिक करायचे आहे.

आता यानंतर other details मध्ये असलेल्या प्रश्न तुम्हाला वाचावे लागेल आणि त्याप्रमाणे त्याचे उत्तरे yes किंवा No म्हध्ये द्यावे लागतील. आता पुन्हा save my details ह्या बटणावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर next या बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमच्या जन्माचा पुरावा साठी कागदपत्रे विचारले जातील, तिथे तुमच्याजवळ जन्माचा पुरावा म्हणून उपलब्ध असलेल्या कागद निवडायचं आहे. कोणताही कागद निवडताना त्यावर तुमची पूर्ण जन्मतारीख असणे आवश्यक आहे. तसेच राहिवासाचा पुरावा देताना देखील ज्यावर तुमचा संपूर्ण पत्ता आहे असा कागद निवडायचं आहे.

यानंतर येथे एक पर्याय आहे, तुमचा पासपोर्ट बद्दल होणारी हालचाल , तो तपासण्यासाठी पुढे गेलं किंवा त्याची सध्याची स्थिती काय आहे हे तुम्हाला जरा एसएमएस’द्वारे जाणून घ्यायचे असेल तर तिथे yes या पर्याय पुढे क्लिक करावे जर तुम्हाला एसएमएस’द्वारे माहिती नको असेल तर No या पर्याया पुढे क्लिक करावे. एसएमएस’द्वारे माहिती मिळवण्यासाठी पन्नास रुपये चार्जेस लागतात.

यानंतर आता तुम्हाला तुम्ही फॉर्म भरत असाल ते ठिकाण आणि त्या दिवशीची तारीख तिथे टाकायचे आहे आणि खाली I agree या बटन पुढे क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला preview application form या बटनावर क्लिक करायचे आहे. तुमच्या पुढे तुम्ही भरलेला फॉर्म उघडेल तो तुम्हाला नीट तपासून घ्यायचे आहे, फॉर्म दुसऱ्या व्यक्तीचा असेल तर त्याची प्रिंट काढून तुम्ही त्या व्यक्तीला ती तपासण्यासाठी देऊ शकता आणि त्यानंतरच तो फॉर्म सबमिट करा कारण की एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही.

फॉर्म तपासून झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला मुलाखतीसाठी वेळ आणि पैसे याबद्दल विचारले असेल, तिथे असलेल्या pay and schedule appointment या बटणावर क्लिक करा आणि तुम्ही कशा प्रकारे पैसे भरणार आहात ऑनलाईन किंवा चलनाद्वारे तो पर्याय निवडा, ऑनलाइन निवडले तर पुढे तुम्हाला तुमची माहिती दिसेल.आता परत next या पर्यायावर क्लिक करा तुमच्यापुढे मुलाखतीसाठी उपलब्ध असलेले शहर आणि तारीख दिसेल, त्याप्रमाणे ते तुम्हाला निवडायचे आहे.

आणि खाली दिलेला कॅपच्या जशाचा तसा टाकायचा आहे आणि next या बटनावर क्लिक करायचे आहे तुम्हाला त्या तारखेला मुलाखत नको असेल तर तुम्ही दुसरी तारीख निवडू शकता पण मात्र त्या तारखेची वेळ तुम्ही निवडू शकत नाही.तुम्ही पैसे भरल्यानंतर तुम्हाला मुलाखतीची वेळ कळेल.आता pay and book appointment ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.आता तुम्ही बँकेच्या पोर्टलवर याल तिथे तुमची बँक निवडून किंवा इतर ज्या काही पद्धतीने तुम्हाला पैसे भरणे शक्य असेल, त्या पद्धतीने तुम्ही पैसे भरायचे आहेत.

पैसे भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा डाव्या कोपऱ्यात असलेल्या Applicant home या बटणावर क्लिक करायचे तिथे services या पर्याय खाली असलेल्या view saved submitted application या पर्यायावर निवडायचे आहे, त्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म चा नंबर असलेला एक रकाना दिसतो तो निवडल्यावर तुम्हाला खाली तुमच्या फॉर्म बद्दलची माहिती मिळण्यासाठी पर्याय दिले जातात. तिथे view print submitted form आणि print application receipt या दोन प्रिंट काढायचे आहेत.

त्यानंतर त्या पावतीवर तुम्हाला तुमचे मुलाखतीची तारीख आणि वेळ दिसेल. तसेच तुम्ही पैसे भरल्याची देखील माहिती येईल. मुलाखतीसाठी जाताना फॉर्म सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच ओरिजनल कागदपत्रे घेऊन यावे. मुलाखत यशस्वी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसात पोलीस वेरिफिकेशन साठी बोलावले जाते. तुम्ही स्वतः देखील चौकशी करू शकता. पोलीस वेरिफिकेशन झाल्यानंतर पासपोर्ट प्रिंट होऊन घरी पोस्टाने येतो. त्यासाठी साधारण पंधरा दिवस लागतात. अशा प्रकारे तुम्ही पासपोर्टसाठी फॉर्म भरू शकता.

1 thought on “पासपोर्टचा फॉर्म घरबसल्या कसा भरायचा ।। पासपोर्ट फॉर्म भरण्यासाठी काय काय माहिती आवश्यक आहे? ।। पासपोर्टचा फॉर्म भरल्यानंतर पुढे काय प्रोसेस होते? ।। कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? याविषयी महत्वाची माहिती !

  1. आम्ही नवीन घर घेतले आहे.. पासपोर्टवर जुना पत्ता आहे. व्हिसा मिळवण्यासाठी नवीन पत्ता नुतवनीकरण करायचे आहे… काय करावे लागेल?

Comments are closed.