प्लास्टर केल्यानंतर त्यावर भेगा पडू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?।। भेगा, तडे, चिरा का पडतात? कारणे आणि उपाय याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

आज आपण कंस्ट्रक्शन बांधकामा मधील एका महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. तर हि माहिती कंस्ट्रक्शन रिलेटेड आहे पण सगळ्यांसाठी आहे, बांधकाम क्षेत्रामधील जे काम करतात त्यांच्या साठीच आहे असं नाही तर सर्वांसाठी हि माहिती आहे, म्हणजे जे काम करून घेणार असतील, करणार असतील, कंस्ट्रक्शन क्षेत्रामधील गवंडी, मिस्त्री, सुपरवायझर, इंजिनिअर ह्या सर्वांसाठी हि माहिती आहे.

प्लास्टरिंग संबंधित म्हणजे गिलावा कामासंबंधित माहिती आपण घेणार आहोत. ज्यामध्ये आपल्याला सगळयांना बांधकामामध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे गिलावा कामाला भेगा पडतात किंवा प्लास्टरिंग कामाला जे काही क्रॅक पडतात. हे का होतात? त्याची कारणे काय आहे? जे गिलाव्याला तडी जाऊ नये, भेगा पडू नये, क्राक पडू नये तर हे होऊ नये म्हणून आपण काय करायचे आहे किंवा त्याची कारण काय आहेत ज्याच्या मुळे हे प्रॉब्लेम होतात.

आपल्याला जिथे गिलावा करायचा आहे, ज्या भिंतीवर गिलावा करायचा आहे किंवा कॉक्रिटचा जो पृष्ठभाग असेल, ज्या मध्ये सिलिंग असेल ज्या मध्ये कॉलमचा भाग असेल, जिथे आपल्याला गिलावा करायचा आहे, तो गिलावाचा पृष्ठभाग पहिल्यांदा सरफेस खरबरीत करून घ्यायचा आहे, म्हणजे स्मूथ नसायला पाहिजे,

आपल्याला जिथे गिलावा करायचाय तो जर भाग स्मूथ असेल किंवा लेवल सफई असेल आणि त्याच्या वर जर आपण मॉटर्न टाकल, सिमेंटचा माल ह्यावर टाकला तर चिकटत नाही त्यामुळे आपल्याला तिथे काय करायचं तर जो काही सरफेस आहे पृष्ठभाग आहे. तो पहिल्यांदा खरबरीत करून घ्यायचा असतो. समजा विटांची भिंत असेल तर काय करायचे तर त्याचे जे काही जॉईंट असतात त्याच्यात थोड्या खाचा मारून घ्यायच्या

४ ते ५mm पर्यंत खाच मारली तर चांगले हे तसेच त्या नंतर पृष्ठभाग थोडा खरडून घ्यावा.जर कॉलम वर गिलावा करायचा असेल तर पहिल्यांदा खाचा मारून घ्यावा. कॉलमचे ज्या वेळेस आपण शटरिंग काढतो त्यावेळेस ते केल जात. थोडस खाचा मारून त्या वरती गिलावा घेतल जाते किंवा सीलिंग वरती डायरेक्ट आपण गिलावा करत नाही त्याच्यावर थोडंस आधी खरडून घेतले जाते त्यानंतर त्यावरती गिलावा काम केले जाते

जेणेकरून आपले सिमेंट वाळूचा जो माल आहे त्या वरती चिकटला पाहिजे त्याला पकडून ठेवल पाहिजे. या पद्धतीने आपल्याला तो पृष्ठभाग किंवा सरफेस आहे तो तयार करायचा आहे. तर पहिला मुद्दा आपण पहिला जो काही पृष्ठभाग खरबरीत करून घेणे किंवा जो सरफेस आहे जिथे आपल्याला गिलावा करायचा आहे तो भाग थोडा खरबरीत करून घ्यायचा आहे जेणे करून आपल्याला त्या वरती गिलावा व्यवस्थितपणे करता येईल.

जिथे आपल्याला गिलावा करायचा आहे तिथे विटा पाणी शोषून घेतील एवढच पाणी पाणी मारून घ्यायच आहे. गिलाव्याला भेगा पडतात तर त्याच मेन कारण हेच आहे, जास्त भेगा पडत असतील तरी त्याच कारण हेच असते. ज्या वेळेस एखाद्या भिंतीवर गिलावा करायचा असतो त्यासाठी माल कालवतो, पृष्ठभाग खरबरीत करतो, आणि जो काही सिमेंटचा मॉटर्न तयार केलेला असतो, मग हा जो काही माल भिंतीवर चिटकवतो, थापीने त्या वर मारतो आणि पट्टीने लेवल करून घेतो.

दोन- तीन तासा नंतर किंवा थोड्या वेळा नंतर किंवा ठराविक कालावधी नंतर भिंतीतल्या विटा मॉटर्न मधलं पाणी शोषून घेतात. ज्या भिंतीवर आपल्याला गिलावा करायचा असतो मग तो कॉक्रिटचा पृष्ठभाग असेल, विटांची भिंत असेल अगोदर तिथे जास्तीत जास्त पाणी मारा आणि पाणी मारून झाल्या नंतर 5 ते 10 मिनिटांनी किंवा ठराविक वेळे नंतर त्यावर गिलाव्याच काम करा जेणे करून तुम्ही अगोदर पाणी मारलेलं असत, विटांनी ते ओढून घेतलं असत त्याला विटांच वॉटर ओब्जबशन असं म्हणतात.

पहिल्यांदा भिंतीवर पाणी मारून घ्यायच मग ते बांधकाम कॉक्रिटच असेल, वीट बांधकाम असेल जे काही असेल त्या वरती अगोदर पाणी मारून घेऊन मग गिलाव्याच्या कामाला सुरुवात करतात. गिलावा 12mm किंवा 20mm करतात. शक्यतो वीट बांधकामात 12mm चा वापर करतात. दगडी बांधकामाला 20mm चा करतात. काही ठिकाणी इंचा मध्ये पण करतात, या मध्ये थोडी कमी जास्त होत असते.

आपल्याला एखादी भिंत, वीट बांधकाम वरती 12mm चा गिलावा करायचा असेल तर सगळ्या भिंतीवरती त्या गिलाव्याची जाडी हि 12mm असायला हवी. आपण अश्या भिंती पाहतो ज्या खाली वर दिसतात म्हणजे गिलावा थोडा पुढे आलेला असतो, थोडा मागे आलेला असतो. मग हि लेवल नाही, त्यामुळे गिलावा काम करत असताना ते लेवल मध्ये झाल पाहिजे मग आपल्या कडे पट्ट्या असतात.

आपण त्या पट्ट्याच्या साहाय्याने लेवल करत असतो म्हणजे सेम साईझ सगळी कडे असायला पाहिजे. गिलावा करायच्या आधल्या दिवशी सिमेंटचे छोटे छोटे ठोकळे करायचे 12mm चे असो किंवा 20mm चे असो. त्या भिंती वरती ते ठोकळे चिटकवायचे मग त्या लेवल वरती तुम्हांला ते बांधकाम करता येते बऱ्यापैकी हि टेक्निक सगळीकडे वापरली जाते.

जर आपल्याला कॉलम आणि भिंती मध्ये जर गिलावा काम करायच आहे, म्हणजे आर.सी.सी काम असते जेथे कॉलम आणि भिंत जॉईंट असते. आपण बांधकाम पाहिलं तर  कॉर्नर मध्ये जास्त भेगा पडलेल्या दिसून येतात. कॉर्नर एका साईटने खाली आलेला दिसून येतो, कॉलम आणि भिंत जिथे जॉईंट आहे तिथे बरोबर अशी एक उभी रेष पडलेली असते. याचा अर्थ असा कि गिलावा काम जॉईंटच झालेल नसते, कॉलम सेपरेट राहिलेला असतो आणि भिंत सेपरेट राहिलेली असते.

मग हे असं का होते? आपण ज्या वेळी बांधकाम करत असताना कॉलमचा पृष्ठभाग असतो त्याला वीट बांधकाम चिटकवून करतो, त्यामुळे त्याला काही जॉईंट राहत नाही एकसंथ पणा राहत नाही मग हे होऊ नये त्यासाठी आपल्याला काय ऑपशन करायचा असतो तर कॉलम आणि भिंत जिथे जॉईंट असते, तिथे गिलावा काम जर करायच असेल, तर काय करायच.

आपल्याला एक जाळी मिळते त्याला चिकन मेश म्हणतात. हार्डवेयरच्या दुकानात मिळते. चिकन मेश गिलावा कामासाठी लागते मग ती फायबर मध्ये पण मिळते आणि लोखंडा मध्ये पण मिळते. ती चिकन मेश, भिंत आणि कॉलम जे आहेत. म्हणजे पहिल्यांदा कॉलम आहे आणि नंतर त्याच्या शेजारी भिंत आहे तर त्याचा जो मधला सेन्टर आहे, तो चिकटलेला असतो. 3 इंच कॉलम वरती आणि 3 इंच भिंती वरती अशी साईज घ्यायची आणि उभेपुर भिंत ते कॉलम अशी जाळी मारायची. चिकन मेश जास्त महाग नसते, कमी दारात आपल्याला मिळते.

कॉलम मध्ये खीळ मारायचे, ड्रिलचा वापर व्यवस्थित करावा खीळ आणि जाळी व्यवस्थित चिटकून घ्यावी त्या नंतर त्या वरती गिलाव्याच काम करायच आहे. तुम्हाला तिथे क्रॅक दिसणार नाहीत कारण आपण पुढे जाळी लावलेली असते तिथे आपल्याला खडबुडीत पृष्ठभाग मिळते. चांगली अटॅचमेंट मिळते आणि त्यामुळे ते गिलाव काम चांगले राहते. शक्यतो हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात होतो मग त्या ठिकाणी आपल्याला हे चिकन मेश वापरायच असते.

चिकन मेश म्हणजे जाळी आपली साधी चाळण्याची जाळी कशी असते त्याच टाईपची फायबरची किंवा लोखंडाची मिळते. हार्डवेयरच्या दुकानात हि जाळी आपल्याला मिळते. चिकन मेश हे दगडी बांधकाम, जिथे वीट बसत नसेल तर तिथे हि वापरू शकता. वीट बांधकाम असेल त्यावर आधीच गिलावा काम केलेल असेल आणि त्या वरती तुम्हाला पुन्हा गिलावा काम करायचे आहे किंवा फिनिशिंग करायचे आहे पण चिटकत नसेल तर तिथे हि तुम्ही चिकन मेश वापरू शकता.

चिकन मेशच महत्वाचं काम काय असते जे काही मॉर्टर असत त्याला चिटकवून ठेवणे. गुळगुळीत जो काही पृष्ठभाग असेल तर तिथे आपला मॉर्टर बसणार नाही मग त्या वरती आपल्याला गिलावाच काम जर करायचे असेल तर तिथे आपल्याला चिकन मेश वापरावी लागते. मॅटर तयार करण्यासाठी आपल्याला सिमेंट, वाळू हे दोन साहित्य लागणार आहे. मग हे साहित्य किती घ्यायच ह्याच एक प्रमाण असते. यालाच मॉर्टर रेशो म्हणतात.

सिमेंट मॅटर म्हणजे सिमेंट आणि वाळूच मिश्रण ह्याच जे काही प्रमाण असत ते प्रमाण आपल्याला परफेक्ट घ्यायच असत. हे जर प्रमाण तुमचे चुकले तर तुमचे गिलावा काम बाध होईल असं समजायच. त्यामुळे इथे प्रमाण आपल्याला व्यवस्थित घ्यायच आहे. कमी जास्त करून चालणार नाही, आपण जे काही वाळू आणि सिमेंट दोन साहित्य घेतो तर जे काही केमिकॅल रिऍक्शन होत असते ते सिमेंट वर होत असते, वाळू वर काही फरक पडत नाही कारण वाळू हि रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असते.

आकार मानात बदल होणे, तापमानात वाढ होणे किंवा ज्या काही बाकीच्या केमिकल रिऍक्शन असतात त्या सिमेंटच्या बाबतीत होत असतात त्यामुळे आपल्याला सिमेंटच प्रमाण योग्य घ्याव लागते. जर सिमेंटच प्रमाण कमी घेतल तर गिलावा काम खराब होऊ शकते आणि जर सिमेंटच प्रमाण जास्त घेतल तरी गिलावा काम खराब होऊ शकत. त्यामुळे सिमेंटच प्रमाण योग्य घ्यावे. शक्यतो गिलावा कामामध्ये 1:4, 1:5, 1:6 हे तीन प्रमाण आपल्याला ठरवून दिलेले आहेत.

या मधील 1:6 हे प्रमाण जास्त प्रमाणात वापरल जातं आणि त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला येतो. 1:6 म्हणजे काय तर जेवढं सिमेंट घेतलं आहे त्याच्या 6 पटीने आपल्याला वाळू घ्यायची आहे. समजा आपल्याकडे पाटी असते एक पाटी आपण सिमेंट घेतल तर 6 पाट्या तिथे आपल्याला वाळू घ्यावी लागणार आहे, या पद्धतीने प्रमाण घ्यायच आहे. त्यामुळे या प्रमाणात तुम्ही साहित्य घ्या जेणे करून काही खराबी येणार नाही.

आपण जे काही सिमेंट, वाळू घेणार हे चांगल्या क्वालिटीचे असावे. सिमेंट बारीक दळलेल असावे त्यात खडी नसावी बारीक दगड नसावेत. चांगल्या क्वालिटीचे असावे. आपण जी काही वाळू घेणार आहोत तीहि चांगल्या क्वालीटीची असावी त्या मध्ये मातीचा गाळ नसावा. जर वाळू मध्ये मातीचा गाळ असेल तर गिलावा खराब होऊ शकतो. त्यामुळे वाळू घेताना व्यवस्थित घ्यावी त्या मध्ये पाला पाचोळा, कचरा, मातीचा गाळ ह्या मधील काही नसावं.

पूर्ण पणे चांगल्या दर्जाची वाळू असावी. मॉर्टर तयार करुन झाल्या नंतर अर्ध्या तासाच्या आत मध्ये आपल्याला वापरायचा असते. जास्त वेळ घालवून चालत नाही कारण ज्यावेळी आपण सिमेंट आणि वाळुच मिश्रण तयार करतो त्यावेळी काय फरक पडत नाही, परंतु अर्ध्या तासानंतर सिमेंटचा पाण्याशी संपर्क आल्यामुळे मिश्रण घट्ट होते. जर लवकर आपण ते वापरल नाही तर सिमेंटची ताकद हळू हळू कमी होत राहते.

ज्यावेळी सिमेंट आणि वाळू ह्याच मिश्रण होत तेव्हा सिमेंट मध्ये केमिकल रिऍक्शन होत असते तेव्हा सिमेंट घट्ट होयला सुरुवात होते आणि हि सुरुवात 30 मिनिटा नंतर होते. त्यामुळे माल कालवल्या नंतर आपल्याला तो माल अर्ध्या तासाच्या आत मध्ये वापरायचा असतो. तुम्ही जेवढा जास्त वेळ घालवणार तेवढी सिमेंटची क्वालीटी हळू हळू कमी होत असते. त्यामुळे मॉर्टर तयार केल्या नंतर इनिशियल सेटिंग टाईम हा 30 मिनिटाचा असतो आणि फायनल सेटिंग टाईम हा 10 तासांचा असतो म्हणजेच 600 मिनिटांचा असतो.

त्या हिशोबाने आपल्याला ते काम करायचे असते. तुम्ही जेवढे लवकर काम कराल तेवढं चांगल, जेवढा माल आपल्याला लागणार आहे तेवढाच माल कालवा. जेवढं कामं होणार आहे त्या हिशोबानेच माल कालवा. बरेच मिस्तरी काय करतात सकाळी 10 वाजता माल कालवतात आणि चार वाजे पर्यंत तोच वापरतात तर तस करू नका. काही वेळा सिमेंट आणि वाळू हे अगोदर मिक्स करून ठेवली असते लागेल तसे पाणी घालवून ते मिक्स करतात वाळू मध्ये पाण्याच प्रमाण असते, वाळू हि ओलसर असते.

मग त्या पाण्याच्या प्रमाणावर त्या ओलसर प्रमाणामुळे त्या सिमेंटवर केमिकल रिऍक्शन होत असतात. त्यामुळे हे दोह्नी चाळुन वेगळे ठेवा. वाळू वेगळी ठेवा, सिमेंट वेगळे ठेवा जसं जसं आपल्याला लागेल त्यानुसार मिक्सिन्ग करून माल तयार करा. एकदम सगळा माल तयार करू नका. गिलावा काम झाल्या नंतर आपल्याला 7 ते 10 दिवस त्यावर pouring करायची असते. pouring म्हणजेच काय तर पाणी मारणे.

7 ते 10 दिवस कमीत कमी 2 वेळा त्यावरती पाणी मारायचे. उन्हामुळे किंवा वातावरणामुळे त्यामधील मॉर्टरच पाण्याच प्रमाण जे काही कमी झालेलं असते, आतल्या विटांनी जे काही पाणी शोषून घेतलेलं असते. मग हे होऊ नये त्या गिलावाला चांगल्या दर्ज्याचा कठीण पणा यावा मजबूत पणा यावा. यासाठी आपल्याला 7 ते 10 दिवस त्यावर कमीत कमी दिवसातून 2 वेळा पाणी मारायचे असते.

जेणे करून तो गिलावा एकदम कठीण होतो. पाणी मारल्या नंतर जो काही कठीण पणा आहे त्याला ताकद प्राप्त होत असते. त्यामुळे सात ते दहा दिवस त्या वरती पाणी मारायचे. आता हे मुद्दे आहेत यातले एक जरी कारण राहीले किंवा काम करताना चूक झाली तर त्याचाच परिणाम आपल्या गिलाव्या वरती भेगा पडतात किंवा क्रॅक पडतात.

आता आपण एक अजून मुद्दा पाहणार आहोत, तो या गिलावा कामा मध्ये येत नाही. तर आपण जे वीट बांधकाम करत असतो तर ते करताना विशिष्ट अश्या बॉण्ड मध्ये करायचे असते म्हणजे त्याची जी काही जोड असतात ती व्यवस्थित विशिष्ट पदधतीत करायची असती मग त्या मध्ये जे स्ट्रेचर बॉण्ड असेल, हेडर बॉण्ड असेल, जे काही बॉण्ड असतात. आपण जे काही 4 इंची, 6 इंची ,9 इंची बांधकाम असते हे आपल्याला योग्य पद्धतीने करायचे असतात.

मग त्याच्यात सांधेमोड, एका रेषेत जॉईंट न येऊन देणे किंवा बरेच जे काही तांत्रिक मुद्दे आहेत त्या पद्धतीने आपल्याल वीट बांधकाम करायचे असते. जर तुमचे वीट बांधकामच चुकले आणि तुम्ही त्यावरती चांगल्या पद्धतीने जरी गिलावा काम केलं असेल, तरी सुद्धा तो निसटणार, सुटणार. त्यामुळे आपल्याला वीट बांधकाम करत असताना व्यवस्थित जॉईंट मध्ये करायच असते. जेणे करून त्यामध्ये चांगल्या दर्ज्याची अँटचमेंट राहील.

या पद्धतीने आपल्याला हे वीट बांधकाम चांगल्या दर्ज्याच करायचे असते. त्यानंतर त्यावर गिलावा करावा. बऱ्याचदा काय होते, गिलावा काम चांगल पद्धतीने केलेला असते. परंतु अगोदर केलेले वीट बांधकाम आहे त्याला मोठ्या प्रमाणात क्राक पडलेले असते. जर भिंतीला क्राक पडले तर आपोआपच गिलाव्याला क्राक पडणार. त्यामुळे काय करायच आहे, वीट बांधकाम करताना आपल्याला गिलाव्याच्या कामाचा विचार करायचा आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “प्लास्टर केल्यानंतर त्यावर भेगा पडू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?।। भेगा, तडे, चिरा का पडतात? कारणे आणि उपाय याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

Comments are closed.