पी एम किसान योजनेत कोणते बदल झाले आहेत? जाणून घ्या!!

बातम्या

पी एम किसान म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत दरवर्षी देशभर शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 4 महिन्यांच्या अंतराने 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जातात. मात्र, आता या संदर्भातले काही अपडेट समोर आले आहेत ते नेमके काय आहे? त्याची सविस्तर माहिती आम्ही आज देणार आहोत.

पी एम किसान योजनेचे आतापर्यंत 16 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आणि 17 वा हप्ता जूनच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात जमा करण्याचा केंद्र शासनाचे नियोजन आहे. पण हात मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांच्या पातळीवर दोन गोष्टी शेतकऱ्यांनी करणे बंधनकारक आहे.

त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा बँक खात आधारशी संलग्न करणे गरजेचे आहे. कारण राज्यातील 2 लाख 29 हजार लाभार्थी असे आहेत ज्याचे पी एम किसानचे योजनेचे बँक खात आधारशी संलग्न करण्यात आलेला नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ई-केवाईशी करणं आवश्यक आहे.

कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या पातळीवरही काही कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात कृषी आयुक्तालयाने निर्देश दिले आहेत. कृषी विभागाने 5 लाख 10 हजार जणांनी पी एम किसान योजना अंतर्गतला भेटण्यासाठी स्वयं नोंदणी केली आहे. त्यांना मान्यता द्यायची की नाही याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश कृषी विभागाला आयुक्तांना दिले आहेत

आणि महसूल विभागाच्या पातळीवर 90 हजार असे लाभार्थी यांच्या भुमिअभिलेख याच्या नोंदी अद्याप अपडेट झालेल्या नाही आहेत.
PM किसान योजने अंतर्गत फेब्रुवारी 2019 पर्यंत त्यांच्या नावावर जमीन होते त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. म्हणजे फेब्रुवारी 2019 अंतर यांच्या नावावर जमीन झाली त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नव्हता.

कालांतराने फेब्रुवारी 2019 जमीन वाटप झालं आणि काहीनी जमिनी खरेदी केल्या त्यामुळे 5 वर्षांची अट शिथिल करण्यात यावी अशी काही जणांची मागणी होती. आता या लॉकिंग काळाला पाच वर्षे उलटून गेले आहेत आणि केंद्र सरकार यामध्ये शिथिलता आणत का? हे पाहणं आवश्यक आहे. तथापि सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकार यावर नेमका काय निर्णय घेत? ते आपल्याला लवकरच कळेल.

दरम्यान पी एम किसान योजना संदर्भात काही प्रश्न असल्यास ते विचारण्यासाठी सरकारने हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे. तो नंबर असा आहे 155261 किंवा 01124300607 असे हेल्पलाइन नंबर आहेत. मात्र अनेक वेळा हे नंबर सातत्याने बिझी येत असल्याच अनेकांचे मत आहे. तुमचा काय अनुभव आहे? सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये कळवा..