पोलीस दलामध्ये सर्वात जास्त पगार असलेले पद कोणते?

बातम्या

तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या भारत देशामध्ये पोलीस हे उच्च दर्जाची सेवा आहे. भारतामध्ये पोलीस अधिकारी म्हणून पोस्ट मिळवणे एक आव्हानात्मक काम आहे. कारण पोलीस दलात भरती होण्यासाठी उमेदवाराकडे प्रामुख्याने मानसिक आणि शारीरिक शक्ती असणे खूप आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला देशाची लोकांची सेवा किंवा गुन्हेगारी कमी करण्यासाठी उत्सुकता असते, त्यांच्यासाठी पोलीस आयुक्त सर्वोत्तम पेशा आहे.

पोलीस या पदावर काम करत असताना कित्येक वेळा मोठमोठ्या संकटाचा सामना करावा लागत असतो. मात्र तुम्हाला कधी न कधी असा प्रश्न पडला असेल की, पोलीस दलातील अधिकारीला किती पगार असेल? अशातच आज आपण पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणारे 5 पदाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

◆एएसपी : पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणारे पदांमध्ये एएसपी हे पण पाचव्या क्रमांकावर आहे। एएसपी म्हणजेच असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून ओळखले जाते. ज्यांच्या खांद्यावर दोन स्टार आणि त्यांच्या खाली आयपीएस असे लिहिलेले असते. यूपीएससी परीक्षा मार्फत पास झालेला एएसपी हे पद दिले जाते. ज्या ठिकाणी अनेक सुविधांबरोबर चांगला पगार दिला जातो. यामध्ये बंगला गाडी, नोकर, चाकर अशा अन्य सुविधाही दिल्या जातात. यांना प्रत्येक महिन्याला 58 हजार ते 65 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

◆ एस पी : पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणारे पदांमध्ये एसपी हे पद चौथ्या क्रमांकावर आहे. एसपी म्हणजेच सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ज्याला आपण पोलिस अधीक्षक म्हणून ओळखतो. त्यांच्या खांद्यावर एक अशोक स्तंभ व 1 स्टार आणि त्याच्या खाली आयपीएस असे लिहिलेले असते. एस पीच्या अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस येत असतात, म्हणजेच जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन वरील आदेश लागू होतो. जिल्ह्यामध्ये होणारे मोठमोठ्या गुन्ह्यांना एसपला तोंड द्यावे लागते. यांनाही अनेक सुविधांबरोबर चांगला पगार दिला जातो. यामध्येही बंगला, गाडी, नोकर-चाकर अशा अनेक सुविधा दिल्या जातात. यांना प्रत्येक महिन्याला 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. यूपीएससी परीक्षा पास करून एएसपी हे पद मिळाल्यानंतर प्रमोशन घेऊन एसपी बनता येते.

◆ एस एस पी : पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणारे पदांमध्ये एसएसपी हे पद तिसऱ्या क्रमांकावर आहे. एसएसपी म्हणजेच सीनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ज्याला आपण वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून ज्यांच्या खांद्यावर एक अशोक स्तंभ, दोन स्टार आणि त्याच्या खाली आयपीएस असे लिहिलेले असते. एस एस पीचे पद हे इस्की पेक्षा वरिष्ठ असते. एसएसपी हे मोठे आणि शहरी जिल्ह्यांना हाताळत असतात. पोलीस कॉन्स्टेबल पासून ते एसपीपर्यंत सर्वजण त्यांच्या खाली काम करतात. यांनाही अनेक सुविधांबरोबर चांगला पगार दिला जातो. एसएसपी यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर यांना प्रत्येक महिन्याला 85 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

◆ डिआईजी : पोलीस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणारे पदांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते. म्हणजेच पोलीस उपमहानिरीक्षक होय. ज्यांच्या खांद्यावर एक अशोक स्तंभ, 3 स्टार आणि त्याच्या खाली आयपीएस असे लिहिलेले असते. यांच्या अंतर्गत 7 ते 12 डिव्हिजन येत असतात. त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की ते किती मोठ्या क्षेत्रावर प्रमाणावर काम करत असतील. एसपी आणि एसएसपी हे अंतर्गत काम पाहत असतात. यांना प्रत्येक महिन्याला 95 हजार ते 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. पोलीस विभागात हे पद फक्त प्रमोशन द्वारेच मिळवली जाऊ शकते.

◆ डीजीपी : पोलीस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणारे पदांमध्ये हे पद पहिल्या क्रमांकावर येते. डीजीपी म्हणजे पोलिस महासंचालक म्हणून ओळखतो. डीजीपी हे राज्यातील सर्वात मोठे पोलीस अधिकारी पद असते. ज्यांच्या खांद्यावर एक अशोक स्तंभ, त्यानंतर क्रॉस असलेली तलवार आणि सगळ्यात शेवटी आयपीएसचा बॅच असतो. राज्यातील सर्वात मोठे पोलीस पद म्हणून ओळखले जाणारे डीजीपी या पदावर अनेक सुविधांबरोबर चांगला पगार दिला जातो. डीजीपी यांच्या पगार प्रत्येक महिन्याला एक लाख 45 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

आज आपण पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणारे 5 पदं बद्दल माहिती जाणून घेतली आहे.