पोस्ट ऑफिसच्या या योजनते रोज गुंतवा अवघे 95 रुपये आणि मिळवा 14 लाख ! जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

सर्वसामान्य कुटुंबातील पालक तसे आपल्या जीवनात समाधानी असतात. दिवसभर काम करून संध्याकाळी कष्टाच्या दोन भाकरी खाऊन जीवन आनंदाने जगत असतात, पण वाढत्या महागाई मुळे त्यांना मुलांचे लग्न आणि त्यांचे शिक्षण या दोन गोष्टींचा ताण नक्कीच त्यांच्या डोक्यावर असतो असे म्हणायला काहीही हरकत नाही.

या पालकांच्या डोक्यावरील मुलांचं शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा भार कमी व्हावा म्हणून भारतीय डाक विभागाने ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजना याची सुरुवात केली आहे. मुलांच्या शिक्षणाची आणि मुलांच्या लग्नाचा खर्च पालकांसाठी चिंतेचा विषय असतो. याचीच चिंता भारतीय पोस्ट ऑफिसची ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजना ही भविष्यातील खर्चाच्या तजविजाची उत्तम पर्याय आहे.

एक छोटीशी गुंतवणूक करून वीस वर्षांत तुम्ही चौदा लाख रुपयांचा धनलाभ मिळवू शकता. आर्थिक संकट हे सर्वसामान्य माणसाच्या पाचवीला पुजलेले आहे असे म्हणले तरी काही वावगं ठरणार नाही हे संकट आपल्यासमोर जन्मभर उभे असते. घराची परिस्थिती, मुलांचे शिक्षण आणि मुलांचे लग्न यासाठी लागणाऱ्या पैशांची चिंता कायमच अनेकांसमोर उभी असते.

आणि त्यातच दिवसेंदिवस मुलांच्या शालेय, महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मर्यादित उत्पन्नामुळे हे सर्व खर्च डोंगराएवढे वाटायला लागतात. यातून मार्ग कसा काढायचा याच विवंचनेत एखाद्याच पूर्ण आयुष्य निघून जातं तर दुसरीकडे एखादा हा चक्रव्यूहातून बाहेर मार्ग सापडवण्याचा प्रयत्न करतो.

या सर्व गोष्टींचा विचार करूनच भारतीय डाक विभागाने “ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजना” या योजनेची सुरुवात केली आहे. जेव्हा पालकांची मुले लहान असतील अशा वेळी या योजने मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यास गरजेच्या वेळी याचा भरपूर आणि व्यवस्थितरित्या फायदा आणि कमालीचा लाभ होऊ शकतो.

पालकांची मुलं लहान असतानाच जर एखाद्याने “ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजना” मध्ये गुंतवणूक केली तर मुले वीस वर्षाची होईपर्यंत म्हणजेच उच्च शिक्षणासाठी जाईपर्यंत तुम्हाला चांगला मोबदला त्यावेळी मिळू शकतो. आणि तुम्ही या भारातून चिंतामुक्त व्हाल एवढे नक्की. काही कालावधीने आपल्याला मनीबॅन्क चा हि लाभ मिळत राहतो.

सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेत करावी लागणारी आर्थिक गुंतवणूक हि खूपच कमी असते त्यामुळे तुम्हाला त्या गुंतवणुकीचा भार हि जाणवत नाही. ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजने’ त आपल्याला दररोज फक्त ९५ रुपयांची गुंतवणूक करावी लागते म्हणजे प्रत्येक महिन्याला २८३० रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

मग नंतर २० वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला जवळपास १४ लाख रुपये मिळवू शकतो. हा एक एन्डॉवमेंट प्लॅन पोस्ट ऑफिस ने आपल्यासमोर मांडला आहे. हि योजना १५ ते वर्षाच्या कालावधी आहे. या योजनेचा कालावधी संपल्यानंतर देखील पॉलिसीधारक व्यक्ती जिवंत असेल तर तिला सुद्धा या योजनेमधून एकरकमी लाभ मिळतो. आणि त्यातच दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर विम्याच्या रकमेसोबतच बोनस ची रक्कम सुद्धा दिली जाते.

गरज असल्यानंतर मणी बॅक ची सुविधा : ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजने’ अंतर्गत आपल्याला अधून मधून म्हणजे मॅच्युरिटी अगोदर तीन वेळा पॉलिसीधारकाला मनी बॅक चा लाभ मिळतो. पॉलिसी ला ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कॅशबॅक च्या स्वरूपात पॉलिसीधारकाला काहीशा प्रमाणात पण गरज पूर्ण होण्याजोगी रक्कम देण्यात येते.

कुटुंबाचे काही खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च या मनी बॅक चा वापर करून भागवता येऊ शकतात. यासारखाच आणखी दोन वेळा म्हणजेच एकूण तीन वेळा पॉलिसीधारकाला या मनी बॅक चा वापर करता येतो. या ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा योजने’ ची सुरुवात भारत सरकार ने १९९५ ने सुरुवात केली होती.

आपल्याला १४ लाख रुपये कसे मिळतात : जर एखाद्या व्यक्तीने २५ वर्षाच्या वयात पॉलिसी घेतली तर त्याला त्याला ७ लाख रुपये सम अशुअर्ड पॉलिसीचा पिरिअड म्हणजेच वीस वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांना २८५३ रुपयांचा प्रीमियम येईल. म्हणजेच पॉलिसीधारकला दररोज ९५ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

पॉलिसीच्या या कालावधीत पॉलिसीधारकाला आठव्या, बाराव्या आणि सोळाव्या वर्षी २० टक्के रक्कम म्हणजेच एक लाख चाळीस हजार रुपये कॅशबॅक स्वरूपात मिळतील. या पद्धतीने एकूण टप्प्यांमध्ये तुम्हाला चार लाख वीस हजार रुपये कॅशबॅक स्वरूपात मिळतील. तर उर्वरित रक्कमेसोबत तुम्हाला सगळे मिळून १४ लाख रुपये मिळतील. त्यामध्ये सहा लाख बहात्तर हजार रुपये तुम्हाला बोनस म्हणून मिळतील.

या योजनेतील काही अटी : ही पॉलिसी कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो २) या योजने’ साठी वयाची अट ही किमान वय १९ वर्षे आणि कमाल वय हे ४५ वर्षे असायला हवे. ३) ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा पॉलिसी’ हि १५ ते २० वर्षाच्या कालावधीसाठी घेता येते, यामध्ये तुम्हाला जर २० वर्षाची पॉलिसी घ्यायची असेल तर तुमचे वय ४० वर्ष पेक्षा जास्त असता कामा नये. ४) ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट आयुर्विमा पॉलिसी’ मध्ये कमाल सम अशुअर्ड २० लाख रुपये इतकी आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधावा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.