बटाट्यांनी करोडपती बनला शेतकरी, उत्पन्न 25 कोटी ।। चिप्ससाठी लागणाऱ्या बटाटयाची शेती !!

अर्थकारण शेती

फास्टफूड हे आजच्या जगातलं सर्वात आवडत आणि स्वस्त फूड, चहाच्या टपरीवर असो किंवा मल्टिप्लेक्स मध्ये प्रत्येक ठिकाणी मिळणार फास्टफूड म्हणजे चिप्स,लहान असो किंवा  मोठे, श्रीमंत असो की गरीब प्रत्येकालाच चिप्स आवडतात. आणि महत्वाचे म्हणजे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चिप्स बनवण्यासाठी लागणारे बटाटे हे भारतातून निर्यात होतात.

गुजरात मधील डोलपूर कंपा गावातील जितेश पटेल हे एक प्रगतिशील शेतकरी, MSC ऍग्री कल्चर करून स्वतः च्या 10 एकर शेतीतून त्यानी बटाट्याच उत्पादन घ्यायला सुरू केलं त्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला. बालाजी आणि ITC सारख्या कंपन्या सोबत करार केले आणि योग्य दर्जाच्या आणि निर्यातीच्या गुणवत्तेचं उत्पादन मिळवण्यासाठी त्यानी कंपनी कडून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशिक्षण घेतल. नफा वाढत गेला आणि त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांना एकत्रित केलं.

सध्या ह्या गावात जवळपास 1000 एकर जमिनीवर ‘लेडी रोझेटा’ या जातीच्या बटाट्याची लागवड केली जाते. त्यासाठी लागणार हार्वेस्टिंग मशीन त्यांनी जर्मनी वरून बोलावलं आहे. तसेच ग्रेडिंग युनिट देखील उभं केलं जिथे काढलेल्या बटाट्याची माती काढून ते साफ केले जातात. त्याचबरोबर त्यानी स्वयंचलित इरिगेशन पण करून घेतलं. पटेल हे काम जवळपास 25 वर्षांपासून करत आहेत. वर्षभरात एक हजार एकर क्षेत्रातून 20 हजार मेट्रिक टन बटाट्याच उत्पादन मिळत.

१७ रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री केली जाते. सगळा खर्च वजा करता साधारण 25 कोटी रुपयांचा निव्वळ नफा या शेतकऱ्यांना मिळतो. मार्केट कमी जास्त झालं तरी कंपनी ला योग्य गुणव्वतेचा माल देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, आणि मेहनत या गोष्टी असल्या तर शेतकरी नक्कीच चांगली प्रगती करू शकतात. करार शेतीतील प्रगती साठी जितेश यांना वेगवेगळे पुरस्कार देखील मिळालेत. आपल्या यशाचं गमक इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी 5 मिनिटांचा माहितीपट ही तयार केलाय. तीच माती, तीच शेती आणि कमी कष्ट, मात्र योग्य आणि आधुनिक रित्या शेती केली तर शेतकरी ही कोट्यधीश होऊ शकतो याच हे जिवंत उदाहरण आहे.