कुलमुखत्यार पत्र (Power of attorney) म्हणजे काय।। कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे ।। कुलमुखत्यार पत्र रद्द कसे करावे ? ।। रद्द होणारे व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र मधील फरक !

अर्थकारण शेती शैक्षणिक

आज आपण कुलमुखत्यार पत्र ( Power of attorney) दस्ताबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कुलमुखत्यार पत्र कसे करायचे त्याचे प्रकार किती ते करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्याचे फायदे व नुकसान. ते रद्द कसे करायचे, कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे, मुद्रांक शुकमध्ये बचत कशी करावी, कुलमुखत्यार पत्र करताना स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन चार्जेस कसे व किती लागतात. अशा सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत.

कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय: कुलमुखत्यार पत्र म्हणजे एक प्रकारचा सरकारी कामांसाठी केलेला दस्त अशा दस्तान मार्फत एखाद्या व्यक्ती त्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो अशा दोस्ताला कुलमुखत्यारपत्र असे म्हणतात कुलमुखत्यार पत्र याला इंग्लिश मध्ये पावर ऑफ अटॉर्नी असे म्हणतात.

अनेक दैनंदिन व्यवहारांमध्ये विशेषता प्रॉपर्टी खरेदी विक्री भाडेकरार व इतर अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये पावर ऑफ अटॉर्नी म्हणजेच कुलमुखत्यारपत्र उपयोग केला जातो पण मुक्तार कायदा सन 1982 झाली अस्तित्वात आला या कायद्यामध्ये एकूण पाच कलमांचा समावेश केला गेलेला आहे.

कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे: पूर्वी कुलमुखत्यार पत्र किंवा इतर वेगळ्या करारांची नोंदणी करण्यास लोक टाळाटाळ करायचे परंतु इथून पुढे सगळे महत्वाचे करार नोंदणीकृत करणे अनिवार्य झाले आहे जर कुलमुखत्यारपत्र नोंदणीकृत केलेले नसेल तर अशा कुलमुखत्यारपत्र कायदेशीर मान्यता नसते त्यामुळे कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे आवश्यक आहे.

कुलमुखत्यार पत्र करताना मुद्रांक शुल्क मध्ये बचत कशी करावी: जर रक्ताच्या नात्यातील व्यक्तीस कुलमुखत्यारपत्र आपण दिले असेल तर कुलमुखत्यार पत्र करण्यासाठी मुद्रांकशुल्क कमी लागते पण इतर व्यक्तीला कुलमुखत्यार पत्र आपण दिले तर त्यासाठी जास्त शुल्क लागते

एखाद्या मालमत्तेच्या खरेदी किंवा विक्री किंवा डेव्हलपमेंट एग्रीमेंट बरोबरच कुलमुखत्यारपत्र तयार केले असेल तर त्या सुद्धा फार कमी शुल्क आकारले जाते त्यामुळे कोणत्याही मालमत्तेचा करार करताना उदाहरण म्हणजे साठे करार विकास करार खरेदी खत लीज करार एखाद इत्यादी करार करताना त्याच्यासोबत जर असे कुलमुखत्यारपत्र केले तर आपल्याला मुद्रांकशुल्क खर्च कमी लागतो व खर्चात बचत होते.

कुलमुखत्यार पत्राचे स्वरूप: कुलमुखत्यार पत्र देताना ते मर्यादित अधिकार किंवा अमर्यादित अधिकार स्वरूपाचे असते म्हणजेच कुलमुखत्यार व्यक्तीस मर्यादित अधिकार द्यायचे असल्यास मर्यादित कुलमुखत्यार पत्र किंवा कुलमुखत्यार व्यक्ती सर्व अधिकार द्यायचे असल्यास मर्यादित स्वरूपाचे कुलमुखत्यार पत्र करता येते.

कोणत्याही कराराचे कायदेशीर दृष्ट्या दोन मुख्य भाग असतात: १.करार वरती प्रत्यक्ष सही करणे म्हणजे एक्झिक्युशन. २.कराराची नोंदणी करणे म्हणजे ऍडमिशन ऑफ एक्झिक्युशन. कुलमुखत्यार पत्र देताना ते केवळ नोंदणी करण्यासाठी किंवा सही आणि नोंदणी दोन्ही करण्याकरता देता येते.

कुलमुखत्यार पत्र देताना घ्यायची काळजी: कुलमुखत्यार पत्र जी व्यक्ती देते त्या व्यक्तीच्या सुरक्षेचा जर विचार केला तर करारावर सही करण्याचे अधिकार न देणे हे सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरते कोणत्याही करारावर आपण स्वतः करुन स्वतः केलेल्या कराराचा नोंदणीचे मर्यादित अधिकार कुलमुखत्यार व्यक्तीस दिल्यास आपल्याला सुरक्षा मिळते व कुलमुखत्यार पत्र देणार्‍या व्यक्तीला नोंदणी जाण्याची आवश्यकता नसते.

रद्द होणारे व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र मधील फरक व कुलमुखत्यार पत्राचे प्रकार: साधारण दोन ते तीन प्रकारचे कुलमुखत्यारपत्र असतात. १.जनरल पॉवर ऑफ एटॉर्नी General power of attorney यामध्ये सगळ्या जनरल टाइम्स असतात एखाद्या व्यक्तीच्या वतीने अनेक कामे करायची परवानगी दिलेली असते सरकारी कामांमध्ये अर्ज करणे कागदपत्र जमा करणे कागदपत्र परत घेणे

काही पैशांचे व्यवहार करणे पैशांच्या रिसीट घेणे पावत्या देणे ही दैनंदिन जीवनातील अनेक जनरल कामांसाठी जनरल पॉवर ऑफ अॅटरणे दिली जाते अशा पॉवर ऑफ ऍटर्नी मध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही पॉवर ऑफ ऍटर्नी दिली आहे अशा व्यक्तीला कोणाकडूनही पैसे घ्यायचे अधिकार नसतात हे विनामोबदला कुलमुखत्यारपत्र असते असे पत्र बनवताना पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी आकारली जाते.

२.स्पेसिफिक पावर ऑफ अटॉर्नी specific power of attorney यामध्ये एखाद्या प्रॉपर्टी बद्दल किंवा एखाद्या ठराविक कामाकरिता कुलमुखत्यार पत्र दिले जाते समजा एखादा माणूस परदेशात आहे आणि त्याला एखाद्या फ्लॅटचे पझेशन घ्यायचे आहे अथवा द्यायचे आहे अशा वेळेसही करण्याचा अधिकार देणे किंवा बिल्डर बरोबर खरेदी खत करायचे आहे

त्यावर त्या व्यक्तीच्या वतीने सह्या करायच्या आहेत त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या नावे भारतात मालमत्ता आहे ती मालमत्ता भाड्याने द्यायची आहे त्यासाठी त्या व्यक्तीच्या वतीने रेंट एग्रीमेंट करण्याचे अधिकाऱ यांमध्ये दिले जातात. अशा पद्धतीचे कुलमुखत्यारपत्र बनवताना पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी आकारली जाते.

३.इर्वोकॅबल पॉवर ऑफ एटॉर्णी Irrevocable power of attorney म्हणजे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र हे कुलमुखत्यारपत्र प्रॉपर्टीशी संबंधित असते कधीही रद्द न होणारे हे तेव्हाच शक्य असते जेव्हा प्रॉपर्टीचे अधिकार आपण राईट टायटल इंटरेस्ट ओनरशिप खरेदी खत किंवा एखाद्या डेव्हलपमेंट एग्रीमेंट अंडर एखाद्या बिल्डरला दिलेले असते

किंवा एखाद्या व्यक्तिला विकले असते याच केसमध्ये कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करता येते जर तुम्हाला संपूर्ण रक्कम अथवा मोबदला मिळाला आहे पण तुम्हाला अनेक जागी सह्या करण्यासाठी जाता येत नसेल उदाहरण म्हणजे बांधकामाच्या परवानग्या येण्याच्या परवानग्या त्या ठिकाणी तुम्ही कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र देऊ शकता

पण अनेकदा बिल्डर लोकांनी पूर्ण पैसे मालकाला दिलेले नसतात तरीही कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतले जाते अशाप्रकारे कुलमुखत्यारपत्र करता येत नाही असे जर पत्र करून घेतले असेल तर ते कुलमुखत्यार पत्र रद्द करता येऊ शकते कोणतेही कुलमुखत्यार पत्र देणाऱ्याच्या मृत्युनंतर संपुष्टात येते पण हे कुलमुखत्यारपत्र जे तुम्ही पूर्ण मोबदला देऊ घेऊन दिलेली आहे

ती मृत्युपश्चात इफेक्टिव राहते. यासाठी लागणारे स्टॅम्प ड्युटी वर रजिस्ट्रेशन चार्जेस जमिनीच्या किमतीच्या 6% स्टॅम्प ड्युटी व एक टक्का रजिस्ट्रेशन चार्जेस आकारले जातात हा करार विक्री कराराप्रमाणे मानला जातो त्यामुळे याला पूर्णपणे रजिस्ट्रेशन चार्जेस आकारले जाते.

कुलमुखत्यार पत्र रद्द कसे करावे: कुलमुखत्यार पत्र जसे आपण देऊ शकतो तसे कुलमुखत्यार पत्र रद्द सुद्धा करता येते कुलमुखत्यार पत्र देणाऱ्यास रद्द करावयाची असल्यास त्याबाबत कुलमुखत्यार व्यक्तीला लेखी अर्जाद्वारे कळवणे व कुलमुखत्यार पत्राची मूळ प्रत परत मिळवणे अत्यंत आवश्यक असते

त्यासोबतच अधिक सुरक्षेकरिता कुलमुखत्यार पत्र रद्द केल्याची जाहीर नोटीस वर्तमानपत्रात देणे हे कधीही चांगले तसेच जर कुलमुखत्यार पत्र रजिस्टर नोंदणीकृत असेल तर इतर रद्द पत्रा द्वारे नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्राची नोंदणी रद्द करणे हे आवश्यक असते.

कुलमुखत्यार पत्र लिहून देणाऱ्या च्या मृत्यूनंतर ही वैध राहते की रद्द होते?: कुलमुखत्यार पत्र लिहून देणारा मूळ मालकाचा जर मृत्यू झाला तर त्याने करून दिलेल्या कुलमुखत्यार पत्राला काहीच अर्थ उरत नाही व ते पत्र रद्द होते पण काही परिस्थितीमध्ये जिथे मालमत्तेचा मोबदला घेतलेला आहे

खरेदीखत लिहून दिलेले आहे डेव्हलपमेंट एग्रीमेंट केलेले आहे किंवा सरकारी कारवाईसाठी जर तुम्ही लिहून घेणार यांनी असे कुलमुखत्यारपत्र मयत झालेले व्यक्ती कडुन जवुन घेतले असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते कुलमुखत्यारपत्र त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा वैद्य राहते.

परदेशात स्थायिक असणाऱ्या नागरिकांना कुलमुखत्यारपत्र या दोस्ता चा फायदा कसा होतो सध्याच्या काळात लोकशिक्षणासाठी नोकरीनिमित्त किंवा काही कारणाने कायमचे परदेशात स्थायिक होतात अशा व्यक्तींच्या खाजगी किंवा कौटुंबिक मालमत्ता भारतात असते अशा मालमत्ता संदर्भात विविध कामे करण्याकरता त्या त्या व्यक्तींना नेहमी भारतात येणे शक्य नसते

अशा वेळी भारतात वास्तव्यास असलेल्या जवळच्या व खात्रीलायक व्यक्तीला कुलमुखत्यार पत्र देता येते. जर समजा एखादी व्यक्ती परदेशात असेल व त्याची खाजगी किंवा कौटुंबिक मालमत्ता भारतात असेल पण त्याला भारतात येणे काय लागते शक्य नसेल तर अशावेळी कुलमुखत्यार पत्र कसे तयार करावे अशावेळी परदेशीय भारतीय दूतावासात द्वारे कुलमुखत्यारपत्र बनवून पाठवता येते

सन 2005 सली भारत हा 105 सदस्य असलेल्या एक परिषद 1961 चा सदस्य झालेला आहे या हॅक परिषदा नुसार या 105 देशातील सर्व सार्वजनिक बाग कागदपत्र सर्व सदस्य देशात ग्राह्य धरण्यात येतात त्यानुसार आता परदेशात असलेल्या व्यक्तीस भारतामधील व्यक्तीस कुलमुखत्यार नेमायचे असल्यास तसे कुलमुखत्यार पत्र त्या देशातील दूत वासा द्वारे सक्षम अधिकाऱ्यांसमोर सही करून आणि त्यावर त्या दूतावासाचे अथेंतिकेशन करून असे कुलमुखत्यार पत्र किंवा त्याची प्रत कुलमुखत्यार नेमलेल्या व्यक्तीकडे पाठवता येते अशाप्रकारे दूतावासाने प्रमाणित केलेले कुलमुखत्यार पत्र किंवा पावर ऑफ अटॉर्नी सर्व कायदेशीर बाबी करता ग्राह्य धरण्यात येते.

कुलमुखत्यार पत्राद्वारे झालेला फसवणुकीचा प्रकार: उदाहरणार्थ- गावातील एका शेतकऱ्याने जमिनीवर कर्ज काढण्याचे ठरविल. कर्ज प्रकरण मंजूर करताना अनेक वेळा शेतकऱ्याना तालुक्यातील बँकेत हेलपाटे मारायला लागला. तालुक्याच्या जवळ जाणारा त्याचा नातेवाईक त्याला म्हणाला.

तुम्ही मला तुमचे कुलमुखत्यार पत्र लिहून द्या म्हणजे तुम्हाला सारखे तालुक्याला यायचा त्रास होणार नाही. त्याप्रमाणे शेतकऱ्याने विश्वास ठेवून नातेवाईकास कुलमुखत्यार पत्र लिहून दिले. त्याला लिहिता वाचता येत नसल्याने नातेवाईकाने जमीन खरेदी विक्रीचे अधिकार सुद्धा स्वखुशीने कुलमुखत्यारपत्र मध्ये लिहून टाकले.

शेतकऱ्यांचे कर्ज तर केव्हाच मंजूर झाले आणि नीलही झाले होते. कालांतराने एक दिवस शेतकऱ्याला गावातील एका माणसाने विचारले दोन एकर बागायत जमीन तू कशासाठी विकली? त्यावर आश्चर्यचकित होऊन शेतकरी म्हणाला मला काय गरज शेती विकायची? चौकशी केल्यावर शेतकर्‍याला समजले त्याच्या नातेवाईकांनी पत्राच्या आधारे परस्पर पैसे घेऊन जमीन दुसऱ्याला विकून सुद्धा टाकली होती.

शेतकऱ्याला आता मात्र खूप पश्चाताप झाला कारण त्याच्या नातेवाईकांनी इथे त्याची फसवणूक केली होती. त्यामुळे कोणत्याही प्रस्तावावर सही करण्यापूर्वी त्याचा अर्थ काय होतो हे तपासले पाहिजे. कुलमुखत्यारपत्र सारखा महत्त्वाचा दस्तऐवज व्यक्तीच्या नावे करताना अतिशय दक्षता घ्यायला हवी. थोडक्यात हा अत्यंत महत्वाचा दस्त आहे. मात्र या कराराच्या दत्ताचा उपयोग करताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

5 thoughts on “कुलमुखत्यार पत्र (Power of attorney) म्हणजे काय।। कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे ।। कुलमुखत्यार पत्र रद्द कसे करावे ? ।। रद्द होणारे व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र मधील फरक !

  1. सौ. सविता रविंद्र पाचघरे तळेगांव शा. पंत. ता आष्टि जि वर्धा says:

    माझ्या आईच्या नावावरशेती आहे. ति मला माझ्या नावावर कराची आहे. वाटनी प्रत्र किंवा बक्षिस प्रत्र 500 रू रक्त च नात आहे तरी स्टंम पेपर जास्त लागतात का किती रुपये लागतात.

  2. लिहून देणारा आणि लिहून घेणारा असे दोघेही नोंदणी करता लागतात का किंवा लिहूनदेणारा एकटाच देऊ शकतो का माझी बहिण मला मी हजर नसलो तरी एक तरफी देऊ शकते का?

Comments are closed.