प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? ।। प्रॉपर्टी कार्ड / मिळकत पत्रिका ऑनलाईन कसं काढायचं? याचे नेमके फायदे काय? ।। घरबसल्या ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड कसे काढावे? याविषयी जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

ज्या पद्धतीने सातबारा उतारा यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने किती बिगर शेत जमीन आहे? याची माहिती प्रॉपर्टी कार्ड वर दिलेली असते. म्हणजे काय? तर बिगर शेत जमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता, म्हणजेच घर, बंगला, व्यवसाय या ची इमारत आहे की नाही? याची सर्व माहिती प्रॉपर्टी कार्ड वर नमूद केलेली असते.

चला तर पाहुयात प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका. ऑनलाईन कसा काढायचा आणि याचे नेमके फायदे काय आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ ऑक्टोबर २०२० रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले. या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गावाचं ड्रोन सर्वेक्षण होणार आहे.

त्यातून प्रत्येक घराचा नकाशा, मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले स्वामीत्व योजना यामुळे गाव गावातील सामान्य नागरिक आत्मनिर्भर होणार आहेत. पुढच्या तीन ते चार वर्षात देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. तुमचं घर तुमचंच आहे.

तुमचा त्यावरील अधिकार कायदेशीर आहे. तिथे काय करायचं ते तुम्हीच ठरवणार. सरकार यात दखल घेऊ शकणार नाही. या योजनेमुळे गावांमध्ये ऐतिहासिक परिवर्तन होतील. असेही ते म्हणाले. मित्रांनो ही आता प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका ऑनलाईन कसं काढायचं? आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? हे जाणून घेऊयात.

चला तर प्रथम आपण पाहुयात प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं? मिळकत पत्रिका काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in असे सर्च करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला डिजिटली साईन सातबारा किंवा डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा.

हा पर्याय दिसेल. डाउनलोड फॅसिलिटी फोर डिजिटली साईन सातबारा, एट ए ऑण्ड प्रॉपर्टी कार्ड, असं या पेज च शिर्षक आहे. आता डिजिटल स्वाक्षरी येथील प्रॉपर्टी कार्ड याची माहिती पाहूयात? प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला या पेजवर login करायचा आहे.

सातबारा काढताना वापरलेले युजरनेम आणि पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. पण जर का ते तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही तुमच्या रजिस्टर फोन नंबर टाकून ही प्रॉपर्टी कार्ड काढू शकता. ते कसे करायचे त्यासाठी ओ टी पी बेस्ट लोगिन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर एंटर मोबाईल नंबर च्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इंटर करायचा आहे.

आणि मग सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचा आहे. एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं तर ओ टी पी सेंड ऑन योर मोबाईल असा मेसेज तिथं येईल. त्याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात. ते तसेच्या तसे तुम्हाला इंटर ओटीपी च्या खालच्या रकान्यात टाकायचा आहे.

त्यानंतर व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुठे तुमच्या समोर एक आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर डिजिटली साईन सातबारा, डिजिटली साईन एट ए, डिजिटली साईन प्रॉपर्टी कार्ड, रिचार्ज अमाऊंट, पेमेंट हिस्ट्री, पेमेंट स्टेटस असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

यातल्या डिजिटली साईन प्रोपर्टि कार्ड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड नावाचा एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. त्यानंतर जिल्हा आणि मग तुमचं गाव, किंवा प्रॉपर्टी ज्या तहसील अंतर्गत येते ते कार्यालय निवडायचा आहे. त्यानंतर गाव निवडायचे आहे. आणि मग सीटीएस नंबर टाकायचा आहे. सिटीएस म्हणजे सिटी सर्वे नंबर.

याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्ड मध्ये नोंदवलेला एक नंबर. प्रॉपर्टीशी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात. पण जर तुम्हाला सीटीएस नंबर माहिती नसेल तर प्लॉट नंबर तुम्ही तिथे टाकू शकता. त्यानंतर सीटीएस नंबर निवडा या पर्यायावर क्लिक करा. तर सिटीएस नंबर निवडा या पर्यायावर क्लिक केलं की तो नंबर तिथे आलेला तुम्हाला दिसेल. त्या नंबर वरती क्लिक करून तो निवडायचा आहे.

सगळ्यात शेवटी डाउनलोड या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यांनंतर प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड होईल. तर मित्रांनो आपण पाहू कार्ड कसं वाचायचं? मालमत्ता पत्रक असे या कार्डचे शीर्षक असतं. यात सुरुवातीला गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव दिलेला आहे.

त्यानंतर नगर भूमापन क्रमांक किंवा प्लॉट नंबर आणि त्याचे क्षेत्र किती आहे? ते चौरस मीटर मध्ये दिलेले असते. त्या नंतर हा प्लॉट कोणाच्या नावे आहे? त्याची माहिती दिलेली असते. त्यानंतर सगळ्यात खाली एक सूचना दिलेली असते. त्यात कोणत्या सरकारी अधिकार्‍याने कार्ड वर सही केली आहे? याची माहिती सांगितलेली असते.

डिजिटल स्वाक्षरीत असल्यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड शासकीय आणि कायदेशीर कामासाठी वापरता येईल. असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आता प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.

स्थावर मालमत्तेवर होणाऱ्या व्यवहाराची नोंद प्रॉपर्टी कार्ड वर ठेवली जाणार आहे. आतापर्यंत राज्यातला ११६५ गावांचा सर्वे, ड्रोन सर्वे झाला असून. राज्यातल्या सगळ्या गावांमध्ये ड्रोन सर्वे लवकरच पूर्ण करण्यात येईल. या माध्यमातून सामान्य माणूस बँकांकडे कर्जही घेऊ शकेल. त्यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड किती फायद्याचा आहे? हे तुम्हाला नक्कीच कळाले असेल.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? ।। प्रॉपर्टी कार्ड / मिळकत पत्रिका ऑनलाईन कसं काढायचं? याचे नेमके फायदे काय? ।। घरबसल्या ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड कसे काढावे? याविषयी जाणून घ्या या लेखातून !

  1. माहीती चांगली आहे,योजना सुध्दा चांगली आहे परंतू माझी या कार्यालया संदर्भात तक्रार आहे कारण कि मी जून 2021 मध्ये फेरफार साठी अर्ज केला आहे परंतू online च्या नावाखाली अदयाप पंर्यत P R card update झाले नाही तरी लवकर न्याय दयावा हिच अपैक्षा कारण माझे पुढील काेणतेच काम होत नाही बँक कर्ज देत नाही

Comments are closed.