मित्रानो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे हे शहर संपूर्ण जगभर आपल्या विविधतेमुळे ओळखले जाते. या ठिकाणी बरीच सुंदर आणि आकर्षक अशी पर्यटनस्थळे आहेत. त्याचबरोबर शहराच्या जवळपास बरेच सुंदर ट्रेक आहेत. त्या ठिकाणी बरेच ट्रेकर्स प्रेमी मोठ्या प्रमाणात जात असतात, अशातच आज आपण पुणे जिल्ह्यातील सर्वात अवघड 5 ट्रेक कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
◆ शिवनेरी किल्ला ट्रेक : शिवनेरी हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक आहे. जो ट्रेकिंग करताना एक उत्कृष्ट स्पॉट म्हणून लोकप्रिय आहे. या किल्ल्याचे प्रवेशद्वार त्रिकोणी टेकडीवर आहे. त्याच्या माथ्यावर जाण्यासाठी ट्रेक करावा लागतो. जर का तुम्ही साखळी दरवाज्यातून प्रवेश केला तर तुम्हाला किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी साखळ्या धराव्या लागतात. पुणे शहरापासून शिवनेरी किल्ला ट्रेक हा 96 किलो अंतरावर आहे.
◆ राजमाची किल्ला ट्रेक : राजमाची हा ट्रेक महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन लोणावळा आणि कर्जत दरम्यान आहे. हा ट्रेक तब्बल 16 किलोमीटर आहे. राजमाचीवर ट्रेकिंग करिता लोणावळा मार्ग उत्तम समजला जातो. जो खूपच रोमांचक आहे. कारण हा मार्ग संपूर्णता जंगल आणि हिरवाईने वेढलेला आहे. ज्यावर जाण्याकरिता चार ते पाच तासांचा कालावधी लागतो आणि जर का तुम्हाला थरारक अनुभव घ्यायचा असेल तर कोंडाने निवडू शकता. या मार्गाने जाताना राजमाची ट्रेकची पातळी जरा अवघड आहे. येथे खडी चढण आहे जिथून किल्ल्यावर पोहचण्यास अडीच ते तीन तासाचा कालावधी लागतो. पुणे शहरापासून राजमाची हा किल्ला 83 किलोमीटर अंतरावर आहे.
◆ हरिश्चंद्रगड किल्ला : ट्रेकिंग करिता पुण्यातील सर्वात अवघड ट्रॅक पैकी एक म्हणून हरिश्चंद्रगड किल्ल्याकडे पाहिले जाते. हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. हरिश्चंद्रगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून 1424 मीटर इतक्या उंचीवर आहे. ज्यावर जाण्यासाठी सध्या तीन वाटा आहेत, या ठिकाणची सर्वात आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. ज्याला कोकण कडा म्हणून ओळखले जाते. या कड्याच्या माथ्यावर झोपूनच आपल्याला याची विराट रूप पाहता येते. चढाई करण्याकरिता अतिशय किचकट स्वरूपाचा असलेला हा बरच ट्रेकर्सना आव्हान करत असतो. पुणे शहरापासून हरिश्चंद्रगड हा किल्ला 150 किलोमीटर अंतरावर आहे.
◆ अलंग मदन कुलंग : सह्याद्रीच्या कळसूबाई रांगेतले किल्ले समुद्रसपाटीपासून साधारण 4800 फूट उंचावर आहेत. सध्या तरी हे किल्ले सर करणे फार कठीण आहे, कारण या किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा ब्रिटिश काळात सुरुंग लावून नष्ट करण्यात आल्या होत्या. हरलेले किल्ले मराठा साम्राज्याला पुन्हा मिळवता येतात, हे ब्रिटिशांना माहिती होते. त्यामुळे गडावर जाणाऱ्या वाटा प्रकट करणे, गडावरील पाण्याचे झरे बंद करणे असे अनेक प्रकार ब्रिटिश सत्तेत होत असे.
तर मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील सर्वात अवघड 4 ट्रॅकबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या ट्रॅक्स भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..