अनिल परब (परिवहन मंत्री ) यांनी आपल्या फेसबुक पेज वर आजी घोषणा केली कि महाराष्ट्रामध्ये अडकलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, पर्यटनासाठी गेलेले लोक, आजारी लोक, आपापल्या गावी जाण्यासाठी या सर्वांकरिता महाराष्ट्र राज्याच्या वतीने मोफत सेवा देण्याचे ठरवले आहे आणि ही सेवा देण्यासाठी आज पासून सुरुवात केली आहे या संदर्भामध्ये एसटी सेवा देताना कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आम्ही काही अटी शर्ती ठेवलेल्या आहेत. ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे त्यांनी 22चा एक ग्रुप तयार करून आपल्या ग्रुप लीडरचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आपल्या फॉर्म भरून द्यावा तसेच इतर 22 लोकांचे सर्वांचे नाव त्यांचा राहण्याचा पत्ता, जाण्याचे ठिकाण, मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आपल्या फॉर्म भरून द्यावा
जेणेकरून त्यांची प्रत त्यांना त्यांच्या संबंधित पोलिस मुख्यालयातील पोलिस स्टेशनला आणि ग्रामीण भागात कलेक्टर जिथे आहे तिथे तहसीलदार यांना जाईल त्यांनी अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित ग्रुप लीडर ला माहिती पोचविण्यात येईल. जर आपण एकटे असाल आणि आपल्याला देखील असा प्रवास करायचा असेल तर अशांकरता सरकारने व्यवस्था सोमवारपासून केली आहे. त्याकरता आपल्या एका माणसाच्या माध्यमातून घेऊन जावेत त्यांच्याकडे आल्यानंतर त्या जिल्ह्याच्या ला जायचे ते जिल्हाधिकारी त्याचा त्याला परवानगी आल्यानंतर त्यांची सुटणार आहे घेतलेले आहेत तिथे व्यवस्था केलेली आहे. नाव त्यांचा राहण्याचा पत्ता, जाण्याचे ठिकाण, मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आपल्या फॉर्म भरून द्यावा जेणेकरून त्यांची प्रत त्यांना त्यांच्या संबंधित पोलिस मुख्यालयातील पोलिस स्टेशनला आणि ग्रामीण भागात कलेक्टर जिथे आहे तिथे तहसीलदार यांना जाईल
त्यांनी अर्ज मंजूर केल्यानंतर २२ जणांचा ग्रुप तयार करून त्या प्रत्येकाला मेसेज जाईल. अशा प्रकारे संबंधित व्यक्तींना आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतील. यानंतर संबंधित व्यक्तीला घरी स्थानबद्ध करायचे कि घरी सोडायचे ह्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.या सर्व प्रक्रियेमध्ये ST निर्जंतुकीकरण प्रवासाच्या अगोदर आणि प्रवासानंतर दोन्ही वेळेला केली जाणार आहे. कॉरोनचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी म्हणून एक सीट वर एक माणूस अशी व्यवस्था असेल. प्रत्येकाने मास्क लावावा. योग्य अंतर ठेऊन प्रवास करावा. सदर प्रवासात ST जेवणाकरिता किंवा इतर कारणाकरिता कुठेही थांबणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी. आपल्या खाण्यापिण्याची सोय आपण स्वतः करावी. अधिक माहितीकरता राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वेबसाईट व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.