पुणे होलसेल मार्केट ।। पुण्यात वस्तू स्वस्त व होलसेल रेट मध्ये कुठे मिळतील ? ।। होलसेल मार्केट व दुकान कसे शोधायचे ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

होलसेल मटेरियल बद्दल पूर्ण मार्केटची एकाच शहराबद्दल आज आपण माहिती घेवूयात. त्यातले त्यात आपण पुण्यातल्या होलसेल मार्केट मध्ये काय मटेरियल आहेत आणि त्याच्या किमती आज आपण पाहुयात आणि त्याच्या एरियाची माहिती पाहुयात. तर आपण जेव्हा होलसेल मार्केट बद्दल बोलतो, किंवा सांगायचं प्रयत्न करतो किंवा कोठे माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो, युटुबला अनेक व्हिडिओज पाहतो आणि त्यानुसार माहिती घेण्याचा प्रयत्न करतो.

पण कधी कधी होत काय तर हे जे व्हिडिओ असतात त्या दुकान दारांकडून स्पौन्सरड व्हिडिओ असतात. त्यामुळे कधी कधी आपल्याला चुकीची माहिती मिळविण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जमत असेल तर स्वतः फिरा, मार्केटची माहिती घ्या. ज्यामुळे तुम्हाला स्वतःला काही गोष्टी कळतील. आणि याच साठी आपण काही एरिया आणि काही दुकानाची माहिती घेवुयात.

दुसरा मुद्दा असा आहे की, होलसेल मार्केटला जाण्यापूर्वी तुमचा सेल्फ स्टडी नक्की करून जा. आता तो करायचा कसा तर होलसेलरची क्वालिटी तुम्ही ज्या होलसेलर कडे जातात त्यांचं मार्केट मध्ये कधी पासून दुकान आहे ते पहा. त्यानंतर मार्केट मध्ये सध्या कोणता ट्रेड चालू आहे, कोणती डिमांड आहे, कोणता प्रॉडक्ट आहे, आणि ते तुम्हाला जे होलसेल मटेरियल देतात ते आऊट डेटेड तर नाहीयेना किंवा जुनी फॅशन तर नाही हे नक्की बघून घ्या.

त्यांनतर तुम्ही जिथे राहता तिथले लोकल रेट्स आणि तुम्हाला जिथून मटेरियल घ्यायच आहे तिथले लोकल रेट्स या बद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. की सध्या किती रेट चालू आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा की मला मी जिथे राहतो तिथल्या लोकल मार्केट मध्ये मला स्पर्धक किती आहेत. की जे होलसेलर कडून माल आणून किंमत डाऊन करून विकू शकतात.

जेणेकरून जर आज मी 10 रुपये ला विकणारी वस्तू उद्या मी 2 रुपये ला होलसेलर कडून आणली. परंतु हेच स्पर्धक जर 4 ते 5 रुपयाला ती वस्तू विकायला लागले आणि मी ती वस्तू 7 ते 8 रुपयाला विकत असेल तर तो किती बिझनेस मध्ये त्याचा परिणाम होवू शकतो. त्यांनतर पुणे किंवा मुंबई वरून आपण जिथे राहतो तिथे आणण्यासाठी किती वाहतूक खर्च आहे ती कॉस्ट मला किती लागणार आहे.

यासाठी मला किती मटेरियल मागवाव लागेल. थोडक्यात मागवायच आहे की पूर्ण ट्रक भर माल मागवायचा आहे ह्याची आधीपासून माहिती घेणे गरजेचे आहे. आणि ह्या सर्व गोष्टी नंतर माझ्या प्रॉडक्टची फायनल रेट किती असेल किंवा किती असायला हवी या सर्व लोकल स्टडी नंतर तुम्ही होलसेल मार्केटला ॲप्रोच करा.

मार्केट मध्ये सर्वांची डिमांड असते ती म्हणजे कटपीस, जर कटपिस मध्ये पहायचं असेल तर पुण्याला सदाशिव पेठ, किंवा खडकी एरिया मध्ये आणि बुधवार पेठ असेल किंवा सदर बाजार. इथे असे खूप मोठे मोठे टेक्सटाइलची दुकान आहेत. की ज्यामध्ये तुम्हाला मटेरियल मिळेल. असत काय तर ह्यांच्याच खूप मोठ्या मोठ्या मिल असल्यामुळे तिथे राहिलेल्या जे शिल्लक तुकडे आहे तेच कटपिस म्हणून विकतात.

त्यांनतर साड्या आणि कुर्ती जर पहायचं असेल तर त्यामध्ये सदाशिव पेठ मध्ये काही दुकाने आहेत. बुधवार पेठ आणि पिंपरी मध्ये काही टेक्सटाइल वाले आहेत. पण सगळ्यात जास्त तुम्हाला फुरसुंगी मध्ये खूप जास्त दुकान पाहायला मिळतात. त्यांनतर टी शर्ट तुम्हाला कुठे मिळतील तर पुण्यामध्ये पाहायला गेलं तर बुधवार पेठ आणि रविवार पेठ किंवा रास्ता पेठ मध्ये खूप मोठे मोठे दुकानदार की जे तुम्हाला होलसेल मध्ये देऊ शकतात.

पण या मध्ये त्यांची. अट असते की तुम्हाला ब्लक मध्ये कपडे उचलावे लागतात. कमीतकमी हजार टी शर्ट किंवा 1 टन माल, 2 टन माल, यानुसार ते तुम्हाला मटेरियल देतात. प्रत्येक दुकानदारांची वेगळी टॅक्ट असते. कोणी क्वांटीटी वर तर कोणी वजनावरती विकतात. जसं की सुरत आणि अहमदाबादच मार्केट आहे तिथे ते किलो वरती किंवा टन वरती विकतात.

त्यांनतर जीन्स मटेरियल आहे, पुण्यामध्ये रास्ता पेठ मध्ये किंवा फुरसुंगीला खूप मोठमोठे अशी लोक आहेत की जे डायरेक्टली तुम्हाला होलसेल मध्ये जीन्स अगदी 200 ते 300 रुपयांपर्यंत मिळून जातात. आणि ती तुम्ही 600ते 700 ला विकू शकतात. आणि जर डायरेक्ट म्यानुफॅक्चर मधून घ्यायच म्हणत असाल तर उल्हासनगरला तुम्ही जाऊ शकतात.

तिथे टी शर्ट, जीन्स, कुर्ती डायरेक्ट म्यानुफॅक्चर कडून तुम्ही डायरेक्ट माल उचलू शकता. किंवा तुम्ही फक्त एकदा जावून अलात की ती लोक तुमच्या पर्यंत रोज विजीट साठी सँपल पाठवत राहतील. पण जर स्वस्त आणि व्हरायटी मार्केट कपड्यांसाठी पहायचं असेल तर तुम्ही पिंपरी मार्केटला जावू शकता. आणि व्हरायटी आणि होलसेल मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही फुरसुंगीचे मार्केट एकदम चांगले आहे.

इमिटेशन ज्वेलरी साठी जर तुम्ही पाहिले असेल तर बाजीराव रोड हलवाई चौक असेल बुधवार पेठ, रविवार पेठ मध्ये खूप मोठी मोठी दुकानदार आहेत. इमिटेशन ज्वेलरी, ऑक्साईड ज्वेलरी किंवा बाकीचे ज्वेलरीचे जे आयटेम आहेत ते अगदी तुम्हाला होलसेल रेट मध्ये देतील. त्यांनतर टेलरिंग मटेरियल साठी जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये बुधवार पेठ, रविवार पेठ, कात्रज, आणि सदाशिव पेठ मध्ये अशी काही शॉप आहेत.

जसं ममता जेन आहे, समर्थ ट्रेडर्स आहे. आणि तपकिरी गल्लीमध्ये सुद्धा काही ट्रेडिंगचे मोठे मोठे दुकान आहे. की ज्यामध्ये तुम्हाला बटण, सुई धागा, चैनस, टेलरिंगच सर्व मटेरियल, अगदी सर्व काही मिळून जाईल. किराणा मटेरियल तसं पाहायला गेलं तर तुम्ही तुमच्या लोकल भागामध्ये डायरेक्टली रेट बघूनच जावा. कारण की पुण्याचे रेट जरी तुम्हाला कमी वाटते.

मुंबईचे रेट कमी वाटते, पण तुम्ही कराड, कोल्हापूर, किंवा इस्लामपूर अशा ठिकाणी नेण्यासाठी हे मटेरियल पुण्याहून घेत असाल तर ट्रांसपोर्टेशन कॉस्ट पकडून हे मटेरियल तितक्याच किंमतीला पडू शकते. तरी पण जर तुम्हाला पुण्यामधील माहिती हवी असेल तर, भवानी पेठ मध्ये काही असे मोठे मोठे ट्रेडिंग कंपनी आहेत.

मांजरी रोडला स्पेशल मोठे मोठे ट्रेडर्स बसतात. मार्केट यार्ड मध्ये तुम्हाला ज्या दैनिंदिन डाळी वगैरे आहे ते स्वस्त दरात मिळून जाईल. आणि जे तेल वैगरे आहे तर ते सदाशिव पेठ मध्ये काही ट्रेडर्स आहेत. त्याच्यानंतर हार्डवेअर मध्ये जे तुम्हाला टुलबॉक्स वगैरे लागते. ते तुम्हाला बुधवार पेठ मध्ये खूप मोठे मोठे स्टॉकिस्ट आहेत मोठे डिस्ट्रीब्युटर्स आहे त्याच्याकडून घेऊ शकता.

तसेच रविवार पेठ मध्ये पण आहेत. हे टूलबॉक्स आहे ते तुम्ही त्यांच्याकडे बघू शकता. तसेच सेफ्टी टूल्स मध्ये इंडस्ट्रियल एरिया मध्ये जास्त स्टॉक असणारे लोक आहेत, मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर्स असतात. त्याच प्रकाते बुधवार पेठ, पुणे सिटी मध्ये तुम्ही बघू शकता. किंवा पिंपरी चिंचवड, भोसरी मध्ये वगैरे तिकडे इंडस्ट्रीलायझेशन जास्त आहेत. तिकडून तुम्ही सेफ्टी टूल्स चे एक्विपमेंट घेऊ शकता.

बॅग, सॅक्स किंवा पर्स लेडीज पर्स, यासाठी याची तुम्ही बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, मध्ये खूप असे बॅगचे स्टोअर आहेत. तसेच लेडीज पर्स साठी रविवार पेठ, नाकोडा, स्वस्तिक बॅग्स, शारदा बॅग्स, ही जी दुकाने आहेत, यामध्ये तुम्ही लोकल रेटस, मार्केट रेटस ते तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्यात जास्त याची म्यानुफॅक्चरिंग युनिटी ही उल्हासनगरला होते. आणि जर तुम्ही उल्हासनगर मार्केट आणि पुणे मार्केट यात तितका जास्त फरक नाही जाणवणार.

कारण त्यांचे मोठे मोठे स्टॉक असल्यामुळे ते तेवढ्यात काढतात. पण जर तुम्हाला जमत असेल उल्हासनगर मार्केट वरून डायरेक्ट घ्यायला तर तुम्ही त्याला जास्त प्रेफर करू शकता. तिथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट बॅग मिळतील. तर परफ्युम्स आणि डिओज असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचे होलसेलर रविवार पेठ मध्ये जास्त मिळतील. बुधवार पेठ, सदाशिव पेठ मध्ये पण तितकेच आहेत.

पण जे मोमेंपुरा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे लो रेट मध्ये होलसेल रेट मध्ये परफ्युम्स मिळतील. हाउसकीपिंग मटेरियल आता कोविड नंतर सगळ्यात जास्त हाऊस कीपिंग वर लोक लक्ष देतात. त्याच मटेरियल घेत आहेत. त्यामध्ये स्प्रे असतील, दिओज असतील, लिक्विड असतील, टॉयलेट क्लिनर असतील, बाथरूम क्लिनर असेल, स्टाईल क्लिनर असेल, किंवा त्याच्या मध्ये पण रूम स्टीक्स वगैरे असतील तर याची खूप जास्त डिमांड वाढते.

आणि त्यामधे तुम्हाला अगदी 20%-30% इंवेस्टमेंट मध्ये तुम्ही 100% प्रॉफिट कमवू शकता. बुधवार पेठ मध्ये, रविवार पेठ मध्ये, तपकिर गल्लीला ह्याचे खूप मोठमोठे दुकाने आहे. पण हडपसरला तुम्हाला काही अशी ओन म्यानुफॅक्चरर आहेत तुम्ही त्याच्याकडे घेऊ शकता. कात्रजला पण खूप मोठे मोठे स्टॉकीज बसतात तुम्ही त्यांच्याकडून सुध्दा डायरेक्ट मटेरियल उचलू शकता.

बेकरी किंवा केक मटेरियल आजकाल सर्वच गृहिणींना या मटेरियलची सगळ्यात जास्त गरज असते. तर त्याच्यामध्ये गुलटेकडी, बुधवार पेठ, डांगे चौक, पिंपरी चिंचवडला असे मोठमोठे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. होलसेलर आहेत त्यांच्याकडे तुम्ही मटेरियल घेऊ शकता. पण यामध्ये तुम्ही ऑनलाईन रेट बघा. जर तुम्हाला विकायचा असेल तर खूप जास्त लेडीज ह्या ऑनलाईन प्रेफर करतात. तर त्यानुसार तुम्हाला त्याचे रेटस् बघावे लागतील. तुम्ही कितीला घेताय आणि कितीला विकताय, आणि ऑनलाईनला कितीला मिळणार आहे.

यांनतर स्टेशनरी मटेरियल सगळ्यात जास्त डिमांड असणारा बिझनेस हा स्टेशनरी मटेरियल आहे. ऑल टाइम सेलिंग मध्ये तुम्हाला जास्त कमिशन करून देतो. यामध्ये तुम्ही सुद्धा बुधवार पेठ असेल, अप्पा बळवंत चौक, नाना पेठ आणि रविवार पेठ. बुधवार पेठ, रविवार पेठ मध्ये ज्या एजन्सी आहे त्याच्याकडून तुम्हाला मटेरियल मिळेलच. पण जे अप्पा बळवंत चौकांमध्ये स्टेशनरी स्पेशल खूप मोठंमोठे दुकान आहेत, मोठमोठे होलसेलर आहेत.

यांच्याकडून तुम्ही प्रोपर्ली टायअप केला तर तुम्हाला अगदी 10-20% लो कॉस्ट मध्ये तुम्हाला चांगलं क्वालिटीचे मटेरियल मिळेल. त्यांनतर प्लास्टिक मेटरियल्स मध्ये जे घरामध्ये लागणारे प्लास्टिक टूल्स आहेत, प्लास्टिक मटेरियल आहे. त्यासाठी जर पाहायला गेले तर तुम्हाला मोठे मोठे असे जे स्टॉकेज आहेत.

वारजेला जे आउटसाईडला खूप मोठा प्लास्टिक स्टॉक करून विकणारी लोक आहेत. त्यांनतर धनकवडीला काही असे लोक आहेत. त्यांनतर शुक्रवार पेठ, रविवार पेठ मध्ये अशा मोठ्या एजन्सी आहेत की जे डायरेक्टली कंपन्यांकडून माल घेतात आणि आपल्याला सप्लाय करतात. यांनतर प्लास्टिक टोइस, किंवा खेळणी मध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर तुम्हाला विश्रांतवाडीला गिफ्टींग मिंड मोठी कंपनी आहे धानोरी रोडला जिथून तुम्ही घेवू शकता. हडपसरला पण काही रामटेकडी एरिया मध्ये म्यानुफॅक्चरिंग युनिट्स आहेत.

उदरी एरिया मध्ये सुद्धा मोठी मोठी दुकाने आहेत. जस लोहगावला आयजी ट्रेडिंग कंपनी आहेत. प्लास्टिक फर्निचर मध्ये काळेवाडी रोडला असेल, किंवा वारजे एरिया मध्ये मोठ्या ट्रेडिंग कंपनी आहेत. त्यांच्याकडून तुम्ही अगदी 30-40% तुम्ही मटेरियल घेऊ शकता. पण प्लास्टिक फर्निचर मध्ये तुम्हाला प्लास्टिक जसजसं जुण होत. चार ते पाच वर्षे तर फर्निचरची डूराबिलिटी किंवा क्रॅक होण्याची शक्यता असते. ब्रिटलनेस वाढतो. त्याच्यामुळे प्लास्टिक फर्निचर घेणे आधी तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असले पाहिजेत.

ते कधीचा मोल्ड आहे, किती वर्ष जुना आहे, ते नक्की बघा त्याच्या नंतरच ऑर्डर करा. इलेक्ट्रिकल मटेरियल मध्ये जे वायरिंग वैगरे तुम्हाला लागणार असतील. तर तुम्ही तपकीर गल्ली बुधवार पेठ, किंवा हलवाई चौकामध्ये पण खूप मोठी मोठी दुकान आहेत तिथून सुध्दा मटेरियल घेवू शकता. पण तपकीर गल्ली मध्ये खूप जास्त इलेक्ट्रिकल मटेरियल तुम्हाला अगदी रीझनेबल किंमती मध्ये मिळून जाईल. त्यानंतर एलईडी लाइट्स ही सध्या सगळ्यात जास्त डिमांडिंग असणाऱ्या लाइट्स आहेत. तर याच जे मटेरियल आहे ते तुम्हाला सेम तपकीर गल्ली मध्ये मिळून जाईल.

परंतु त्याच बरोबर तुम्हाला कात्रज एरिया मध्ये, बिबवेवाडी मध्ये खूप मोठे मोठे स्टॉकेज येतील. किंवा कोंढवा रोडला असे मोठे मोठे स्टॉकेज आहे त्यांच्याकडून सुध्दा होलसेल रेट मध्ये मटेरियल घेवू शकता. पण जर तुम्हाला कमी किंमती मध्ये आणि सतत जर मटेरियल विकत घेणार असेल तर तपकीर गल्ली मध्ये तुम्हाला खूप मोठी लाईन असेल जे होलसेल विक्रेते आहेत तिथून तुम्ही इलेक्ट्रिक लाईट घेवू शकता.

त्यांनतर इलेक्ट्रोनिक मटेरियलचे देखील सेम आहे तुम्ही याच एरिया मध्ये तपकीर गल्ली किंवा शुक्रवार पेठ मध्ये मोठे मोठे जे आयटेम आहे जस की प्रिंटरस असतील, साऊंड सिस्टिम असतील, किंवा युनायतेड टीव्ही मध्ये काही मॉडेल्स असतील. असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हे तुम्हाला अगदी 30-40% डिस्काउंट मध्ये तुम्ही घेवू शकता. यांनतर स्टीलची भांडी आहे, स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्हाला रविवार पेठमध्ये, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ मध्ये, आणि नारायण पेठ मध्ये मोठे दुकानदार आहेत. ज्यांच्याकडे तुम्ही जर प्रॉपर कॉन्टिटी मध्ये मटेरियल घ्यायची तयारी दाखवली, जे 220 रुपये किलोचा आहे ते तुम्हाला अगदी 100 रुपये, 120 रुपये किलोनं सुद्धा तुम्हाला घेता येईल.

तुम्हाला तेवढी ट्रांजेक्शन दाखवावी लागतील. तेवढी तुमची इन्व्हेंटरी दाखवू तुम्ही तुमची ऑर्डर दाखवावी लागेल. अल्युमिनियम भांड्यामधे पाहायला गेलं तर तुम्हाला सेम एरिया मध्ये तुम्हाला ते मटेरियल मिळवून देईल. आणि तांब्याच्या मटेरियल मध्ये बुधवार पेठ, भोरआळी असेल, शुक्रवार पेठ, किंवा तपकीर गल्ली मध्ये अशी काही दुकाने आहेत. जेके मार्केट आहे, वर्धमान स्टोअर आहे, माणिक मेटल आहे. किंवा अल्युमिनियम भांड्यासाठी मोठ म्हणाल तर नाकोडा स्टोअर आहे.

आणि स्टील भांड्यामध्ये नागेश्वर जे आहे गुरुवार पेठ मध्ये. तर ही काही रेफरन्स दुकान आहेत. तुम्ही यांच्याकडे माल पहा पण या दुकानांच्या आसपास तुम्हाला अजून दुकाने मिळतील. तुम्ही तिथं बघून तुलना करू शकता. रेट प्रत्येक दुकानदारचे वेगवेगळे असू शकतात. त्याच्यानंतर फर्निचर मध्ये, आधी आपण प्लास्टिक फर्निचर बघितलं. पण जेव्हा तुम्हाला लाकडी फर्निचर लागतात त्यामधे पुण्यामध्ये खूप मोठे मोठे स्टोअर आहेत. शिंदेवाडीला पण काही फार मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपनीचे आउटलेट सिटी मध्ये आहेत.

ज्यामध्ये कोथरूड, पिंपरी-चिंचवड, चाकण, हडपसरला असे मोठे मोठे आउटलेट आहे. तुम्ही डायरेक्ट मोठे सोफा जे 20 ते 22 हजार रुपयाला विकले जातात. ते सोफा 4 ते5 हजार पर्यंत आसपास तुम्ही त्यांच्याकडून घेवू शकता. त्यांनतर वॉटर प्युरिफायरचे जे स्पेअर पार्ट पुण्यामध्ये कुठे मिळू शकतील. किंवा डायरेक्टली युनिट घ्यायचे असतील तर त्यामध्ये दोन प्रेफरन्स आहेत. तुम्ही डिस्ट्रीब्युटर्स कडून वेगवेगळ्या मॉडेलचे स्पेअर पार्ट, कंपन्यांचे आयटम तुम्ही घेवू शकता.

किंवा तुम्ही एखाद्या कंपनीची डीलरशिप घेवू शकता. त्याच्यामध्ये नारायण पेठ असेल, लक्ष्मी स्टील असेल, गुप्ता संस, असे काही दुकाने आहेत. तसेच श्रावणी सेल असे बरेच मोठे मोठे दुकानदार आहेत. परंतु पुण्याच्या बाहेरच्या भागामध्ये धायरीला काही दुकाने आहेत मोठीमोठी जे तुम्हाला होलसेल मध्ये मटेरियल देवू शकतात. धनकवडीला सुध्दा अशी काही दुकाने आहेत. त्यांनतर गिफ्ट गॅलरी साठी परफेक्टली जर पाहायला गेलं तर तुम्हाला असं प्रत्येक एरिया मध्ये दुकान भेटतील.

पण रविवार पेठ मध्ये गणेश ट्रेडर्स असेल. त्यांनतर पिंपरी-चिंचवड मधल न्यू गिफ्ट वर्ल्ड असेल, कोथरूड मधील ठक्कर प्लास्टिक असेल, शुक्रवार पेठ मधील नेबुला असेल. यामध्ये तुम्ही तुमचे रेट बघा. कारण काय यामध्ये रेट खूप व्ह्यारी करतात. अगदी 5 ते 10 रुपयची वस्तू तुम्ही त्यांच्याकडून घेवून 100 ते 200 रुपयाला विकू शकतात. त्यामुळे पूर्ण स्टडी करून गिफ्ट गॅलरी मध्ये जावा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.