IT मधील लाखो रुपयांचा जॉब सोडून जगातील ‘सर्वात मोठे मराठी रेस्टॉरंट-पूर्णब्रम्ह’ ।। जयंती कठाळे यांचा जीवनप्रवास !!
जयंती कठाळे यांनी १७ वर्ष IT कंपनीत काम केलं, सॉफ्टवेअर इंजिनीअर, टेक्निकल लीड, मोडुल लीड पासून ते प्रोजेक्ट लीड, प्रोजेक्ट मॅनेजर आणि नंतर अकाउंट हेड पर्यंत त्यांनी प्रगती केली. या सर्वानंतर त्यांनी IT कंपनी मधला जॉब सोडला आणि पूर्णब्रम्हा चालू केल. कारण या १७ वर्षाच्या प्रवासात कुठेही गेलं तरी जेवणाचा प्रॉब्लेम व्हायचा, सगळीकडे फक्त इडली सांबर च मिळायचं. अगदी उगांडा च्या प्रोजेक्ट ला पाठवण्याची वेळ आली तेव्हा देखील लेटर मध्ये लिहून दिल होत की तिथे इडली सांबर मिळेल त्यामुळे काळजी करू नये.
जयंती कठाळे सांगतात जवळपास १४ वर्ष माझ्या डोक्यात हाच विचार चालू होता की इकडे मिसळ का नाही मिळत? IT सेक्टर मध्ये असल्याकारणाने एकदा त्यांना ऑस्ट्रेलिया ला त्यांच्या पतीसोबत जावं लागलं, तेव्हा त्यांना तीन महिन्यांची मुलगी होती, विमानाची बोर्डिंग पास घेताना तुम्ही शाकांहारी आहात की मासांहारी आहात ते सांगावं लागत असे, ते सांगायचं त्यांचं राहून गेलं आणि ऑस्ट्रेलिया पर्यंत चा २७ तासाच्या पूर्ण प्रवासात त्यांच्याजवळ फक्त मासांहारी जेवण आलं.
त्यामुळे तो पूर्ण प्रवास त्यांनी फक्त ब्रेड आणि बटर खाऊन केला. आणि त्यादिवशी जयंती यांच्या मनात आग पेटली आणि त्यांनी नवऱ्यासमोर विडा उचलला की या विमानात वडापाव विकून दाखवेल तेव्हाच गप्प बसेल. त्यांच्या पतीने त्यांना शांत केलं, पण तरीही त्यांच्या मनात एक जिद्द पेटली होती की काहीतरी करायचं, तीच नोकरी तेच सगळं नाही करायचं. इन्फोसिस मध्ये काम करणं हे त्यांचं स्वप्न होत पण त्यांनी तो जॉब सोडला आणि ४०० चौ.फूट जागेत, २६ लोक बसतील एवढे पूर्णब्रम्हां ला सुरुवात केली.
पण त्याच्या मनातलं पूर्णब्रम्ह अजून सुरू झालं नव्हतं. वेबसाईट तयार करणे, फेसबुक, इंस्टाग्राम, डिजिटल मार्केटिंग अशा सगळ्या गोष्टींचा वापर त्यांनी पूर्णब्रह्म ची जाहिरात करण्यासाठी केला. परंतु त्यांच्या जवळ जास्त पैसे नव्हते, त्यांनी त्यांच्या पतिकडे अक्षरशः हाथ जोडून पैसे मागितले, त्या सांगतात की माझ्या हॉटेल चा सगळ्यात पहिला गुंतवणूकदार माझा नवरा आहे. त्यांनी त्यांच्या पतीला आणि एक बालमित्राला जो की आता त्यांच्या बिसनेस पार्टनर आहे (मनस्विनी फूड्स अँड प्रायव्हेट लिमिटेड) त्यांना सांगितलं की मला हे हे करायचं आहे.
मला याची रेसिपी पाहिजे. त्यांनी पूर्णब्रह्म चे पदार्थ ठरवायला तीन वर्षे घेतली, पण आज त्या त्यांच्या सगळ्या शाखेत १८५ पदार्थ रोज विकतात आणि मिसळ तर १६० रुपये ला विकतात. एकदा त्यांचे पती पॅरिस ला गेले तेव्हा त्यांच्या अस लक्षात आलं की तिथे शाकाहारी जेवण मिळत नाही, तिथे मिळणारा चिकट भात आणि सॉस सोबत त्यांना दिवस काढावे लागत असे. त्यांच्या घरी त्या सोडल्या तर कोणीच मासांहारी नव्हतं, पण तरीही याच गोष्टींचा फायदा घेत त्यांनी जगातलं सगळ्यात मोठं मराठी हॉटेल चालू केल.
अनेकांना फ्रांचिसिस देणे चालू केल्या व त्या फक्त महिलांना दिल्या जात होत्या कारण स्वयंपाक घरात राहून स्वतः अन्नपूर्णा असलेली स्त्री ही समाजाला चांगल्या प्रकारे खाऊ घालू शकते हे त्यांनी ओळखलं होत. त्या त्यांचा दिनक्रम सांगताना म्हणतात की मी सकाळी ३.३० – ४.०० ला उठते, ५.०० पर्यंत सर्व डिजिटल साईट्स आणि US च्या क्लायंट ला अपडेट केलं जातं. त्यानंतर नवरा, मूल, सासू सासरे यांच जेवण, नास्ता वगैरे बनवून ९.०० वाजता त्या पूर्णब्रह्म ला पोचतात.
त्यांनतर दुपारी ३.३० पर्यंत तिथली काम आटोपुन परत घरी येतात आणि मुलांना नास्ता बनवून देऊन त्यांना क्लास ला पाठवतात व नंतर ६.३० ला घेऊन येतात व परत पूर्णब्रह्म ला जातात ते रात्री ११.३० लाच परत येतात. त्या सांगतात की बऱ्याचदा त्यांना रात्रीच्या वेळी पोलिसांनी अडवलं व दारू वगैरे पिऊन तर गाडी चालवत नाही ना हे चेक केलं, कारण एकतर त्या उशीरा येत आणि त्यात नववारी घालून असत त्यामुळे पोलिसांना देखील शंका येत असे.
परंतु नंतर पोलीसांना देखील माहीत झालं की त्या पूर्णब्रह्म वाल्या आहेत त्या सांगतात की स्कर्ट ते नववारी ह्या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं, संस्कृती सांभाळण हे सोप्प नसत त्यासाठी देखील ताकद लागते. कारण बाहेर च्या राज्यातील, देशातील लोकांना जर मराठी जगावयाच असेल तर ते मराठमोळ्या पध्दतीने च जगावाव लागेल. सुरुवातीला लोकांना मिसळ कशी खायची हे देखील शिकवावं लागलं, ते लोक पाव मध्ये मिसळ टाकून बर्गर सारखे खात असत.आज पर्यंत त्यांनी ३,७५,००० पुरणपोळ्या विकल्या आहेत. त्यांचं हॉटेल हे फक्त २४-२६ लोक बसतील इतकंच होत.
एकदा एका ग्राहकाने त्यांना कर्ज घेण्याबद्दल सुचवलं, IT इंजिनियर असल्याने त्यांनी तीन दिवसात प्रेझेन्टेशन बनवलं, चौथ्या दिवशी ते बँकेला दाखवलं आणि पाचव्या दिवशी त्यांच्या अकाऊंट ला ७५ लाख रुपये जमा झाले. CGTMSC योजने अंतर्गत आणि अनेक सरकारी फंड चा उपयोग करून त्यांनी ५७०० चौ, फूट मध्ये हॉटेल उभं केलं जिथे २५० लोकांची चौरंगपाटावर पंगत बसते. त्या सांगतात आपली स्वप्न आपणच पूर्ण करायला पाहिजे आपण ती आपल्या मुलांवर लादतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वाईट घटना घडलेल्या असतात, दुःखद क्षण असतात तसेच त्यांच्याही होते तेव्हा त्या रात्री १२.३० वाजता घरी येत असत, त्यांना त्यांच्या मुलांना वेळ देता येत नसे. असच एक दिवस त्या घरी आल्या आणि पाहिले तर दोन्ही मूल झोपलेली होती, जयंती त्यांच्या जवळ गेल्या त्यांचे पाय धरले आणि त्यांची माफी मागत म्हणाल्या की मुलांनो मला माफ करा मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही पण जेव्हा तुम्हाला माझी खरच गरज असेल तेव्हा मी तुमच्या सोबत असेल, तेव्हा त्यांची अडीच वर्षाची मुलगी उठली आणि त्यांना म्हणाली ‘मम्मी तू का रडत आहे, तू रडू नको आम्ही शांत झोपलो होतो.
तेव्हा त्यांचं बळ दुपटीने वाढलं आणि त्या परत जोपाने कामाला लागल्या. त्या म्हणतात कोणताही बिसनेस मॉडेल जर उभं करायचं असेल तर सगळ्यात आधी तर स्वप्न पहायला पाहिजे त्याची आखणी करायला पाहिजे, ते अंमलात आणण्यासाठी प्रयन्त करायला पाहिजे एवढेच नव्हे तर ते पुढे नेत राहील पाहिजे प्रगती करत राहील पाहिजे. जेव्हा त्यांना बाहेरील राज्यांमध्ये मराठी पदार्थ विकायची वेळ आली तेव्हा त्यांना मराठी स्वयंपाकी हवे होते, त्यांनी काही जणांना प्रशिक्षण द्यायला सुरू केलं.
लोक त्यांना म्हणायचे की ते कन्नड बोलतात तुम्ही मराठी बोलता त्यांना कस काय कळत तेव्हा त्यांनी एकच उत्तर दिलं की ‘प्रेमाची भाषा सगळ्यांना कळते. त्यांनी या लोकांना हात वाऱ्याच्या भाषेत शिकवल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना सांबर आणि फोडणीच वरण यातील फरक शिकवला. त्या सांगतात की माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांमध्ये ५०% महिला आहेत तसेच फ्रांचासिस फक्त महिलांना दिली जाते. कारण माझं उद्दिष्ट एवढेच आहे की ग्रामीण भागातील महिलांना काम मिळावं, रोजगार मिळावा. त्यांना जगात पूर्णब्रह्म चे ५००० सेन्टर उभारायची आहेत.
त्या म्हणतात हे सगळं करताना सुधा मूर्ती मॅडम माझ्याडोळ्यासमोर होत्या, त्यांची प्रत्येक पुस्तक मी वाचून काढली, प्रत्येक वागणूक स्वतः मध्ये आणली, त्या खूप शिस्तबद्ध आहेत. त्यांचा आदर्श त्यांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवला. पूर्णब्रह्म मध्ये ग्राहकांना जेवायला द्यायच्या आधी सर्व कर्मचाऱ्यांची जेवण झालेली असतात. पूर्णब्रह्म हे कदाचित एकमेव अस हॉटेल आहे जिथे जर वाढलेलं पूर्ण अन्न संपवलं तर ते बिलावर ५% कपात देतात आणि शिल्लक ठेवलं तर २% वाढवून लावतात आणि हे ते सगळ्यांना अगदी छातीठोक पणे सांगतात.
आणि लोक ऐकतात पण, ऐकत कोण नाही तर मराठी माणूस, आणि जेव्हा मराठी माणूस अमराठी माणसापुढे असे वागतात तेव्हा खंत वाटते. त्या सांगतात की माझ्या हॉटेल मध्ये दर रविवारी एक सदगृहस्थ येतात आणि ते चक्क १६ पुरणपोळ्या खातात आणि वरून मला २५० रुपये टीप देऊन जातात. पूर्ण जगभरात पूर्णब्रह्म चे नॅशनल आणि इंटरनॅशनल सेंटर चालू होतं आहेत आणि त्यासाठी सर्वांनी पूर्णब्रह्म ला जोडल जाण्याचं आवाहन त्या करतात. स्वप्न बघा ती बघायला पैसे पडत नाही, ती अंमलात आणा आणि पूर्णब्रम्हां चे संगतीने महिलांचे सशस्तीकरण करा असे जयंती कठाळे सांगतात.