आपले रेशनकार्ड आधारकार्ड सोबत लिंक झाले आहे कि नाही हे कसे शोधायचे? आपल्या रेशन कार्ड ला कोणते आधार कार्ड लिंक आहे ते ऑनलाईन कसे पहायचे? आपले किंवा आपल्या घरातील इतर कोणत्याही नवीन सदस्याचे आधार कार्ड हे आपल्या रेशन कार्डशी कसे लिंक करायचे किंवा आधार सिडींग कसे करायचे? याबद्दल थोडक्यात माहिती आज आपण घेणार आहोत.
आपण जे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणार आहोत ते आधीपासूनच कोणत्या रेशन कार्ड शी लिंक आहे हे देखील बघणार आहोत. ते बघण्यासाठी गूगल प्ले वरुण आपल्याला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. त्याचे नाव आहे ‘मेरा रेशन’, हे अन्न पुरवठा विभागाचे हे ॲप्लिकेशन.
तुम्हाला इन्स्टॉलेशन करावे लागेल. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर होम स्क्रीन वर तुम्हाला आधार सिडींग या पर्यायावर वर क्लिक करायचे आहे. या नंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक रेशन कार्ड अणि दुसरा आधार कार्ड टाकून आधार सिडींग बघता येईल.
इथे आपण आधार कार्ड पर्याय सिलेक्ट करून व्यवस्थित आधार क्रमांक टाकून खाली सबमिट बटन दिसेल त्याला क्लिक करून लगेच तुम्हाला कोणते आधार कार्ड तुमचा रेशन कार्ड ला लिंक ती माहिती तुम्हाला दिसेल अणि जर लिंक नसेल तर तसा एसएमएस तुम्हाला दिसेल.
या ठिकाणी तुम्हाला ज्यांच आधार कार्ड इथे लिंक आहे त्याची संपूर्ण माहिती मिळेल म्हणजे एसआरसी नंबर, कुठल्या स्कीमच कार्ड आहे अणि हे कार्ड कोणत्या रेशन दुकानदाराचा अंतर्गत येत त्याचा एफपीएस आयडी म्हणजे दुकान क्रमांक देखील तुम्हाला ऑनलाईन दिसेल,
या नंतर सगळ्या सदस्यांची ज्यांची रेशन कार्डावर नाव आहेत ते या ठिकाणी दिसेल अणि ज्यांची ज्यांची आधार सिडींग आहे त्यांच्या नावापुढे ‘येस’ असे दिसेल अणि ज्यांचे आधार सिडींग झाले नाही त्यांच्या नावापुढे ‘नो’ असे दिसेल. ज्यांची आधार कार्ड चे सिडींग झाले नाहिये तर अश्या व्यक्तींना रेशन कार्ड ची सिडींग करणे महत्त्वाचे आहे
कारण बरेच रेशन धन्य दुकानदार ज्यांची आधार सिडींग नसते त्यांना रेशन कमी देतात त्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे त्याचे रेशन कार्ड चे सिडींग असणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्म मिळतो पीडीएफ स्वरूपामध्ये आहे तो तुम्हाला डाऊनलोड करुन भरायचा आहे.
म्हणजे तुमचं नाव, नंबर, पत्ता, आधार नंबर ही माहिती भरून त्याला आधार कार्ड ची झेरॉक्स अणि रेशन कार्ड ची झेरॉक्स जोडून तुम्हाला कुटुंब प्रमुख स्त्री चा फोटो अणि सही घ्यायची आहे यानंतर संबंधित रेशन दुकानदाराचा शिक्का घ्यायचा आहे.
हा फॉर्म तुम्हाला तहसीलदार चा अन्न पुरवठा विभागाचे आधार सिडींग करणारे आहेत किंवा ऑपरेटर आहे त्यांचा कडे जमा करायचा आहे किंवा तुमचा विभागाचे रेशन ऑफिस आहे तिथे जमा करायचे आहे. त्यानंतर पुढे 21 दिवसांमध्ये आधार सिडींग ची प्रक्रिया पूर्ण होईल.
तुम्ही ‘मेरा रेशन’ या ॲप्लिकेशन मध्ये तुमचे स्टेटस पाहु शकता. तुमचे आधार कार्ड तुमचा रेशन कार्ड ला नक्की सिडींग करा. अधिक माहितीसाठी तुमच्या रेशन दुकानदाराशी संपर्क साधा. धन्यवाद.
सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,
अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.