RCC कामांसाठी क्लिअर कव्हर किती असावा?।। स्ट्रॅप बीम म्हणजे काय?।। शियर वॉल किंवा आर सी सी वॉल।। फ्लॅट स्लॅब म्हणजे काय?।। वॉटर रिटेनिंग वॉल म्हणजे काय?।। याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

आपण कन्स्ट्रक्शन मधील बांधकामां मधील एका महत्त्वाच्या टॉपिक बद्दल माहिती करून घेणार आहोत. यामध्ये आपण काँक्रीटचे काम करत असताना किंवा कोणतेही कॉंक्रीट काम करत असताना त्यामध्ये असलेले सेंट्रींग काम असेल, सुपरव्हिजन चे काम असेल फ्रेमवर्क असेल तर हे काम करत असताना आपल्या या गोष्टींची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये आपण क्लियर कव्हर किंवा कॉमन कव्हर. म्हणजे काँक्रीट काम करत असताना जो आपण कव्हर देतो हा कव्हर किती असावा किंवा कव्हर म्हणजे नेमकं काय आहे या संबंधित बेसिक माहिती डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. जर आपण एखादं कॉंक्रीटचे काम करायचं झाल्यास किंवा आपण आपल्या भाषेत आरसीसी काम म्हणतो.

आता आर सी सी म्हणजे काय?: आर सी सी म्हणजे काय ज्या मध्ये स्टील चा वापर केला जातो. म्हणजे आपण कॉंक्रीटचे काम करत असताना जे बार वापरतो, तर रेन्फोर्समेंट असे म्हणतात. टेक्निकल भाषेत त्याला रेन्फोर्समेंट असे म्हणतात. जर आपण कॉंक्रीट बनवले तर त्याला रेन्फोर्सड् सिमेंट कॉंक्रीट असे म्हणतात.

म्हणजे शॉर्टकट मध्ये (आर सी सी) रेन्फोर्सड् सिमेंट काँक्रीट. जेव्हा आपण आय सी सी करतो तेव्हा आपण काय करतो? स्टील चा एखाद्या भाग असेल, समजा एखादा कॉलम तयार केलेला आहे,तर आपण कोलंबीचा ज्यावेळी सापळा तयार करतो, स्टील भागातून आपण त्याचा एक सापळा तयार करतो. नंतर साईड ने फ्रेमवर्क करून, त्याला फळ्या वगैरे मारतो, त्यानंतर त्यामध्ये कॉंक्रिट टाकतो आणि त्यामध्ये कॉंक्रिटचा कॉलम तयार करतो.

जे स्टील बार असतात आणि कॉलमचा बाहेरचा काँगक्रिटचा भाग, म्हणजे कॉलम तयार झाल्यानंतर जर आपण कॉंक्रिटचा बाहेरचा पृष्ठभाग पाहिला, तर आपण काय करतो स्टील बार पासून थोडे अंतर बाहेर ठेवून हा कॉलमचा प्रुष्ठ भाग तयार करतो. हा कॉलम च्या बाहेरचा पृष्ठभाग आहे, म्हणजेच कॉंक्रिटचा पृष्ठभाग. टेक्निकल मध्ये आपण ज्याला कॉंक्रीट सर्फेस असे म्हणतो.

हा जो बाहेरचा पृष्ठभाग आहे, तो बाहेरचा पृष्ठभाग आणि आतील स्टील. म्हणजे कॉंक्रिटचा पृष्ठभाग बाहेरचा आणि आतील स्टील यांच्यामधला जो गॅप आहे, डिस्टन्स आहे, त्याला आपण क्लियर कव्हर असे म्हणतो. थोडक्यात काँक्रीटचा बाहेरचा पृष्ठभाग, म्हणजे कोणताही आरसीसी स्ट्रक्चर असेल, ज्यामध्ये फुटींग, कॉलम, बीम, स्लॅब, कुठल्याही आरसीसी स्ट्रक्चर असेल, तरी त्या आरसीसी स्ट्रक्चर मधील कॉंक्रिटचा बाहेरचा पृष्ठभाग आणि आतिल स्टील यांच्यामधला फरक किंवा डिस्टंस याला क्लियर कव्हर असे म्हणतात. प्रत्येक कामासाठी जो क्लियर कव्हर आहे तो प्रत्येक कामासाठी वेगवेगळा दिलेला आहे.

हा क्लियर कव्हर कीती असावा?: आपल्याला प्रत्येक कामासाठी स्लॅब, कॉलम, बीम,फुटींग, किंवा स्टेअरकेस या प्रत्येक कामासाठी क्लियर कव्हर हा वेगवेगळा दिलेला आहे. म्हणजे एकच कव्हर सगळ्या कामांसाठी नाही, तर प्रत्येक कामाला हा कव्हर वेगळा असतो. तो वेगळाच किती आहे? जर बिल्डींग च सुरुवातीपासून पासून कामकाज पाहिल, तर आपण काम हे फुटींग पासून सुरुवात करतो.

फुटींग पासून ते स्लॅब पर्यंत येणारे जे स्ट्रक्चर आहेत, त्या प्रत्येक स्ट्रक्चर चा कव्हर किती पाहिजे? आपण आधी फुटींग पाहुयात. फुटींग साठी सर्वात आधी आपण जमिनीत खड्डे गाडतो. या खड्ड्यात सर्वात आधी आपण पी सी सी करतो.पी सी सी म्हणजे प्लेन सिमेंट कॉंक्रीट. त्यावर आपण फुटींग ची जाळी पसरतो. त्या नंतर आपण फुटींग ची काम सुरू करतो.

फुटींग चे काम हे डायरेक्ट माती मध्ये करायचे नसते. सुरुवातीला एक पी सी सी चा थर किंवा लेयर ठेवायचा. म्हणजे प्लेन सिमेंट कॉंक्रिट त्यात स्टील वापराचे नाही.त्यानंतर फुटींगची जाळी ठेवायची. ही जाळी ठेवतांना डायरेक्ट पी सी सी वर ठेवायची नाही. या पी सी सी आणि जाळी या दोघांमध्ये गॅप असला पाहिजे.

आणि हा येणारा गॅप हा क्लियर कव्हर असला पाहिजे. यासाठी कव्हर ब्लॉक मार्केट मध्ये ‌मिळतात.वेग वेगळ्या मापाचे कव्हर ब्लॉक आपल्याला मिळतात. हे आपल्याला सिमेंट मध्ये किंवा प्लॅस्टिक मध्ये उपलब्ध असतात. आणि एकच कव्हर ब्लॉक हा वेग वेगळ्या मापाचा असतो. जेवढं क्लियर कव्हर आहे त्या मापाचे कव्हर ब्लॉक मार्केट मध्ये मिळतात.

म्हणजे समजा आपण फुटींग च काम करत आहेत तर आपण पहिले हा कव्हर ब्लॉक पी सी सी वर ठेवणार, आणि त्याच्यावर जाळी ठेवणार. म्हणजे पी सी सी आणि जाळी यांच्या मध्ये अंतर कीती असणार? तर जितक्या मापाचा कव्हर ब्लॉक आपण ठेवणार आहोत, तितकंच अंतर असणार आहे.

तर इथे कव्हर ब्लॉक कितीचा ठेवायचा? तर जो कव्हर गॅप फुटींगचा असतो, त्या मापाचा कव्हर ब्लॉक आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बीम, कॉलम, स्लॅब असेल आपल्याला त्या त्या कव्हर गॅप नुसार कव्हर ब्लॉक ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला कव्हर देनं सोपं जातं. जर फुटींग चार विचार केला तर आपल्याला पन्नास एम एम (५०) चा कव्हर द्यायचा असतो. टेप घ्या साह्याने मोजमाप करत असताना एम एम मध्येच घ्या. कारण इथे ऑक्युरसी खुप महत्त्वाची आहे. सेंटीमीटर मध्ये जर घेतलं तर पाच (५) सेंटीमीटर कव्हर आपल्याला घ्यायचा आहे.

बुकींग केल्यानंतर आपण त्यावर एक जाळी टाकून घेतो आणि या पद्धतीने राफ्ट फाऊंडेशन तयार करतो. जर जमीन काळ्या मातीची असेल, किंवा मऊ असेल, मचरुमाची असेल, जमिनीची बिअरींग कपॅसिटी म्हणजे जी वजन पेलण्याची क्षमता असते ती जर कमी असेल, तर या ठिकाणी आपल्याला राफ्ट फाऊंडेशन चा वापर करावा लागतो. जर या पद्धतीने आपण राफ्ट फाऊंडेशन केलं तर या राफ्ट फाऊंडेशन साठी जो स्लॅब टाकणार आहोत खालचा, तर याची जी बॉटम साईझ असते, खालची जमीनी खालची बाजू असते तर त्या ठिकाणी आपल्याला (७५) पंच्याहत्तर एम एम चा कव्हर द्यायचा असतो. आणि राफ्ट फाऊंडेशन च्या टॉप साईड ला (५०) पन्नास एम एम चा द्यायचे आहे.

यानंतर पुढील काम असतं स्ट्रॅप बीम. स्ट्रॅप बीम म्हणजे काय?: जे फाऊंडेशन असतं,फुटींगचे कॉलम असतात, हे कॉलम एकमेकांना जोडण्यासाठी जमीनी वरती किंवा जमीन लेवल घ्या खाली म्हणजे ग्राऊंड लेवल च्या खाली आपण बीम टाकतो. या बीमला स्ट्रॅप बीम असं म्हटलं जातं. काही वेळेला आपण हे बीम जमीन लेवल च्या वरती टाकतो. आपण जे फाऊंडेशन लेवल घेतलं जातं त्या फाऊंडेशन लेवल ला सुद्धा हे बीम टाकले जातात.

जे तळातले कॉलम आहेत, फुटींग चे कॉलम आहेत, हे कॉलम एकमेकांना जोडले जातात. ज्यामुळे आपले फाऊंडेशन मजबूत होते. या स्ट्रॅप बीम साठी कव्हर (५०) पन्नास एम एम द्यायचा असतो. यानंतर पुढे असतं ग्रीड स्लॉब. ग्रीड स्लॉब म्हणजे काय? आपण एखाद्या जमीन किंवा आपल्याला एखाद्या जमिनीवर कोबा टाकतो, किंवा एखाद्या जमीनीवर कॉंक्रीट जमीन तयार करायचे असेल, तर आपण काय करतो त्या ठिकाणी, मातीच्या जमिनीवर कॉंक्रीटचे थर देतो. त्याला म्हणतात ग्रीड स्लॉब.

म्हणजे जमीनीवर टाकलेला स्लॉब त्यालाच ग्रीड स्लॉब असे म्हणतात. शक्यतो मातीच्या जमीनीवर याचा वापर करतो. आणि यामध्ये आपण ज्यावेळेस स्टील वापरतो, तेव्हा त्याला क्लीयर कव्हर द्यायचा असतो. आणि हा कव्हर किती पाहिजे? हा कव्हर वीस एम एम चा असला पाहिजे. म्हणजे जर ग्रीड सीमेंट स्लॉब आपण टाकणार असाल तर त्याला वीस एम एम चा क्लियर कव्हर द्या.

कॉलम काम करत असताना आपल्याला क्लिअर कव्हर किती पाहिजे?: यानंतरचं पुढील काम आहे कॉलम. कॉलम करत असताना आपल्याला क्लियर कव्हर ची काळजी जास्त घ्यायचे आहे. कारण कॉलम करताना जर आपला क्लिअर कव्हर चुकला तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण बिल्डिंग वर होतो. आपल्याला हा क्लियर कव्हर किती पाहिजे? कॉलम काम करत असताना आपल्याला क्लिअर कव्हर हा चाळीस एम एम चा द्यायचा आहे.

आणि हा क्लियर कव्हर चुकला तर तो प्रॉब्लेम आपल्या संपूर्ण बिल्डिंग वर होतो. त्यामुळे कॉलम च्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागते. आणि बऱ्यापैकी हा प्रश्न , क्लियर कव्हर फोर कॉलम हा प्रश्न बार्यापैकी गव्हर्मेंट एक्झाम मध्ये जास्त प्रमाणात विचारला जातो. जास्त करून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल किंवा जे.ई.ई. च्या एक्झाम असतील, त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. जूने एक्झाम पेपर जर तुम्ही पाहिले.

तर त्या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न पहायला मिळतात. त्यामुळे कॉलम साठी क्लिअर कव्हर हा (४०) चाळीस एम एम. हा पॉईंट लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली काम करत असता, त्या ठिकाणी सगळ्याच कामाच्या बाबतीत क्लियर कव्हर किती पाहिजे? हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. करण याची जबाबदारी शेवटी सुपरवायझरची असते. त्यामुळे सुपरवायझरला, साईट सुपरवायझर ला किंवा जे इंजिनिअर असतात त्यांना याच्याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे.

या नंतर पुढील काम आहे शियर वॉल किंवा आपण त्याला आर सी सी वॉल सुद्धा म्हणतो: आरसीसी मध्ये आपण काय करतो? भिंत तयार करतो. आणि ही भिंत करायचे असेल तर आपल्याला क्लियर कव्हर हा (२५) पंचवीस एम एम चा द्यायचा आहे. यानंतरचे पुढलं काम आहे बीम, त्यासाठी आपण कॉलमच्या वरती काय करतो? कॉलम च्या वरती बीम तयार करतो. यासाठी क्लिअर कव्हर हा (२५) पंचवीस एम एम चा द्यायचा असतो.

म्हणजे बीमच्या कॉंक्रिटचा पृष्ठभाग आहे, तो आणि भिंतीच्या आत मध्ये असेल स्टील च स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये गॅप किती पाहीजे? (२५) पंचवीस एम एम. यानंतर पुढील काम आहे स्लॅब. स्लॉब आपण ज्यावेळी टाकत असतो. तर त्यासाठी क्लिअर कव्हर हा कमी आहे. तर तो आहे (१५) पंधरा एम एम आहे.

म्हणजे स्लॉब च्या वरच्या बाजूला कॉंक्रिटचा पृष्ठभाग आणि स्टील यांच्यामध्ये गॅप किती पाहिजे? (१५) पंधरा एम एम. त्याच पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा क्लियर कव्हर कीती पाहिजे? (१५) पंधरा एम एम. म्हणजे चारीही बाजूला आपल्याला कव्हर द्यायचं असतो. मग त्यामध्ये स्लॉब असेल, कॉलम, फुटींग असुदे, कुठल्याही कामासाठी, आर सी सी मधले कोणतेही स्ट्रक्चर असूदे, या स्ट्रक्चर च्या चारही बाजूला आपल्याला द्यायचा असतो. तर स्लॉब मध्ये (१५) पंधरा एम एम चा असतो.

यानंतरचं पुढील काम आहे फ्लॅट स्लॅब. आता फ्लॅट स्लॉब म्हणजे काय?: आपल्याकडे अजून ही कन्सेप्ट जास्त प्रमाणात वापरली जात नाही. फ्लॅट स्लॉब म्हणजे काय असतं? तर आपण सुरुवातीला फाउंडेशन करतो. नंतर आपण कॉलम बाहेर काढतो. तयावर आपण बीम टाकतो. या बीम ला स्लॉब अटॉच करतो. पण फ्लॉट स्लॉब मध्ये बीम तयार केले जात नाही. डायरेक्ट कॉलम वर स्लॉब टाकला जातो.

म्हणजे स्लॉब चा लोड किंवा स्लॉब वर पडणारा लोड, तो लोड डायरेक्टली कॉलम वरती ट्रान्सफर केला जातो. आणि कॉलम मार्फत तो फुटींग कडे ,फाउंडेशन कडून फुटींग कडे ट्रान्सफर केला जातो. तिथून तो जमिनीमध्ये जातो. पण या फ्लॉट स्लॉब मध्ये आपण जर पाहिलं तर विधाउट बीम हा स्लॉब तयार केला जातो. आणि यामध्ये आपल्याला कव्हर किती पाहिजे? तर वीस एम एम चा पाहिजे.

नॉरमल स्लॉब मध्ये पंधरा एम एम चा‌ पाहिजे. आणि फ्लॉट स्लॉब असेल म्हणजे विदाऊट बीमचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वीस एम एम चा क्लियर कव्हर द्यायचा आहे. त्यानंतर पुढील काम आहे स्टेरकेस. स्टेरकेस म्हणजे काय? जीना. आपण जी पार्या पार्यांची रचना करतो त्याला आपण स्टेरकेस असे म्हणतात. हा जीना करण्यासाठी आपल्याला कव्हर हा पंधरा एम एम चा द्यायचा आहे.

त्यानंतर पुढील काम आहे रिटेनिंग वॉल. रिटेनिंग वॉल म्हणजे काय?: तर एखाद्या ठिकाणी दरड कोसळत असेल, आपण जर घाटातून प्रवास केला तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो बघा, डोंगरातून दरड कोसळते त्या ठिकाणी कॉंक्रीटचे भिंती, या डोंगरा मध्ये बांधलेले असतात. जेणेकरून वरण दरड कोसळू नये, माती खाली खेचू नये, त्यासाठी आपण या भिंती बांधतो. यानांच आपण रिटेनिंग वॉल असे म्हणतो.

आपण पिचींग च्या कामासाठी याचा वापर करतो. किंवा शेतामध्ये आपण मोठमोठे बांध तयार करतो. म्हणजे जर आपल्या शेताची हाईट जास्त असेल, आणि शेजारची जमीन खाली असेल, तर आपण मोठमोठे बांध तयार करतो. म्हणजे आपल्या जमिनीतील माती, दुसऱ्या च्या जमिनीत पडणार नाही. किंवा आपली जमीन खचणार नाही.

त्यासाठी आपण ती सपोर्टसाठी भिंत तयार करतो. त्यालाच काय म्हणायचं रिटेनिंग वॉल. या रिटेनिंग वॉल साठी क्लियर कव्हर किती पाहिजे? तर वीस ते पंचवीस एम एम. रिटेनिंग वॉल साठी क्लियर कव्हर हा वीस ते पंचवीस एम एम इतका पाहिजे.

यानंतर पुढील काम आहे वॉटर रिटेनिंग वॉल: म्हणजे पाणी अडविण्यासाठी किंवा पाणी साठविण्यासाठी बांधकाम करतो. एक प्रकारची भिंत बांधतो, हौद वगैरे जे बांधकाम करतो, आपण जर आर सी सी काम केला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते काम करण्यासाठी, वॉटर रिटेनिंग वॉल म्हणजे पाणी साठवण्यासाठी जी आपण भिंत बांधतो.

मग त्यामध्ये धर्ण असतील, पाण्याच्या टाक्या असतील यासाठी जे आपण कॉंक्रीट, आरसीसी करणार आहोत त्यामध्ये आपल्याला (२५) पंचवीस एम एम ते (३०)तीस एम एम चा कव्हर द्यायचा आहे. वॉटर रिटेनिंग वॉल क्लिअर कव्हर हा पंचवीस एम एम ते तीस एम एम इतका असतो. यापद्धतीने आपल्याला आरसीसी काम करत असताना क्लिअर कव्हर द्यायचा असतो. ज्यावेळी तुम्हीं सुपर्विजन काम कराल किंवा तुम्ही सेंट्रींग चे काम करत असाल तर त्याठिकाणी आपल्याला प्रत्येक कामासाठी वेगवेगळा कव्हर दिलेला आहे. या पद्धतीने कव्हर देनं गरजेचे आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.