नवरा बायको एकमेकांवर संशय का घेतात ? ।। भांडणास कारणीभूत असलेली हि ७ कारणे जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

नवरा-बायकोच्या संसारातील जीव घेणे विष, म्हणजेच “संशय”. ज्या नवरा-बायकोमध्ये संशय नावाचे पिशाच्च प्रवेश करते तेव्हा सुखी संसाराला ग्रहण लागून जाते. घरातील सुख – समाधान नाहीसे होऊन कधी कधी आयुष्य विध्वंसक थराला जाऊ शकते. आज आपण इथे नवरा-बायको एकमेकांवर नेमक्या कोणत्या कारणाने संशय घेतात? ती सात कारणे पाहणार आहोत. तसं संसार जोडताना जशी सप्तपदी ने सुरुवात होते तशीच संसार जपताना ज्या सप्तपदी ज्या नवरा बायकोने लक्षात घेतली त्यांचे संसार वेल आयुष्यभर बहरत राहणार. चला तर मग नवरा-बायको कोणत्या सात कारणांनी एकमेकांवर संशय घेतात ते पाहूया.

१. पहिले कारण आहे, आजूबाजूचे वातावरण.

आपण ज्या सामाजिक वातावरणात राहतो त्या वातावरणाचा प्रभाव आपल्या वर्तनावर सुद्धा होतच असतो. अनेक वेळा आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ असेल तरीही अचानक एखादी संशय कल्लोळ निर्माण करणारी घटना आजूबाजूला घडली की, त्या घटनेला आपण आपल्या आयुष्याची तुलना करून कल्पना करायला लागतो. जसं की एखादा चित्रपट पाहताना त्यातील नायक किंवा नायकी यांच्या ठिकाणी आपण स्वतःला इमेजिंग करतो. अगदी त्याचप्रमाणे जोडीदारावर संशय घेण्याबद्दल ही एखाद्या वेळी घडू शकते.

२. दुसरी गोष्ट आहे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन

अनेक वेळा लग्नाआधीच किंवा लग्नानंतरही नवरा किंवा बायको बद्दल मनात एक नकारात्मक प्रेम बनून जाते, त्यामुळे जोडीदार किती प्रामाणिक असला तरी त्याचा विषय आपण शंका घ्यायला लागतो आणि एक वेळ अशी येते की आपल्या बुद्धीमध्ये नकारात्मक वातावरण निर्मिती होऊन पूर्व ग्रहामुळे शंका घ्यायला लागतो आणि संशय घेणे एकदा सुरू झाले तर हे वादळ कधीकधी संसार उपशाला मुळासगट संपवून संपवून शकते. जोडीदाराच्या बाबतीत पूर्वग्रह कधीच ठेवू नये. जोडीदार आपल्याला समर्पित आहे आणि आपण जोडीदाराला समर्पित आहोत हे कधीही लक्षात ठेवा. तुम्ही त्याला विश्वासाच्या प्रेमाच्या भावनेने स्वतःला बांधून ठेवू शकता.

३. तिसरी गोष्ट आहे विश्वासाचा अभाव

नवरा-बायकोच्या नात्यात सगळ्यात महत्त्वाचा विश्वासच असतो. जे दांपत्य एकमेकांना विश्वासात न घेता राहतात त्यांचे नात्याला म्हणावे तसे परिपक्वता आलेली नसते. मग लग्नाला किती वर्षे का होईना विश्वास नसेल तर हे नाते व्यर्थ आहे. विश्वास कुठे विकत मिळत नाही किंवा ती विकत घेण्याची गोष्ट ही नाही. एकमेकांच्या प्रति एकमेकांशी असलेले समज विश्वासाला जन्म देते आणि त्याला दृढ सुद्धा करते. त्यामुळे जोडीदाराला तुमच्याबद्दल प्रचंड विश्वास असायला हवा. यांच्यामध्ये विश्वास नसतो त्यांच्यामध्ये सुद्धा संशयाचे भूत वाढायला उशीर लागत नाही.

विश्वास एका दिवसात कमावण्याची गोष्ट नसते. नेहमीचे आणि रोजचे तुमचे वर्तन आणि तुमच्याबद्दल जोडीदाराला येणारे अनुभव या आधारे विश्वासाचे दृढीकरण होत असते. एकमेकांप्रती एकदा विश्वास बसला तर मग मात्र तो सहजा सहजी सुटत नसतो आणि तुम्ही ऐकले असेलच की, फांदीवर बसणाऱ्या पक्षाला आणि तुटण्याची भीती नसते. कारण त्याला त्याच्या पंखांवर विश्वास असतो. अगदी त्याच प्रमाणे आपला आपल्या जोडीदारावर विश्वास असेल तर सुख आणि आनंद आपल्या पायाशी लोळण घेत असते. त्यामुळे एकमेकांचा विश्‍वास असावा.

४. चौथी गोष्ट आहे एकमेकांसोबत वर्तन

ज्यांना आयुष्यभर सोबत काढायचे , त्यांनी एकमेकांचा आदर करणे आवश्यकच असते. नेहमीच अविश्वास दाखवून , सतत टोमणे मारत राहणे, एकमेकांचा अपमान करत राहणे यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. दोघांनाही असुरक्षित वाटायला लागते. त्यातूनच मग संशय बळावतो. दोघात प्रेमाचा झरा वाहत जातो, एकमेकांचे मन दुखावले जातात आणि नावापुरते नवरा-बायको राहतात. अशा वेळी एकमेकांच्या फिजिकल गरजा पूर्ण होत नाहीत आणि मग संशय कल्लोळ निर्माण होतो. वास्तविक या एकाच कारणामुळे कोणी काही बाहेर केले होत नसते त्याला अनेक कारणे असू शकतात. परंतु संशय बनवण्यासाठी एकमेकांप्रती असलेले वर्तन सुद्धा कारणीभूत ठरते. त्यामुळे वर्तने एकमेकांचा आत्म सन्मान राखला जाईल असेच असावे. याचसोबत स्वतःच्या संसारात बाहेरच्या व्यक्तीला डोकावून देऊ नका. नवरा-बायकोच्या विश्वासाला तडा जाण्याचा कधी कधी अशी व्यक्ती सुद्धा कारणीभूत ठरत असते.

५. पाचवे महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे “मोबाईल”

विज्ञानाचे फायदे भरपूर आहेत, तसेच तोटे सुद्धा आहेत. कधीकधी आपला नात्यात संशय निर्माण करतो तो म्हणजे आपला मोबाईल. मोबाईल मुळे नवरा-बायकोच्या नात्यात बऱ्याच प्रमाणात दुभंगलेपण आलेला दिसतो. मोबाईल ला पासवर्ड का? आणि तो पासवर्ड मला सुद्धा माहित असावा. काय आहे ? मला माहित असावा तोच असावा, हे सुरुवातीचे कारण आणि त्यापासून पुढे संशयाचे भवरे फिरतच राहतात. मग समोरून कुणाचा फोन मेसेज येतो? त्यावर पाळत ठेवणे . जोडीदार कोणाला बोलतो आहे? याचा मागोवा घेणे हे सगळं सुरू होते. खरं तर मोबाईल आता जीवनावश्यक गोष्ट बलून गेलेली आहे. परंतु विश्वासाच्या भावनेने तुमच्या मोबाईलचा दुरुपयोग हा आहे की तो कधीकधी जीवन विध्वंसक बनून जाते. पण प्रत्येकवेळी असं नसतं आजच्या युगातील मोबाईल अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू झालेली आहे ही गोष्ट आहे.

६. लग्नाआधीचा मित्रपरिवार

मित्रांनो पती किंवा पत्नी ला लग्ना आधी भिन्नलिंगी मित्र परिवार असतोस. लग्ना नंतर हाच मित्र परिवार जेव्हा संपर्कात येतो तेव्हा काहींचे दृष्टिकोन बदललेले असतात. त्यातच आपण आधी पाहिले त्याच प्रमाणे जर नवरा बायकोने संशय घेतले तर यामध्ये प्रमाण वाढते. त्यामुळे लग्नाआधीचा एकमेकांचे मित्र परिवार एकमेकांना माहीत असावा. मित्र म्हणजे जीवनाचा टॉनिक असतं. मित्र असं असं सकारात्मक आहे. चांगले मित्र मैत्रिणींची संघ म्हणजे आयुष्यातील मोठी देणगीच असते. आपले मित्र मोजकेच का असेना पण ते जीवन जगताना फार आवश्यकता असतात. पती-पत्नीने आपले मित्र एकमेकांपासून लपवून ठेवले नाही पाहिजे. कारण खरी नाती निखळ मैत्री मध्ये लपवण्यासारखं काहीच नसतं आणि एवढं करूनही एकमेकांच्या मित्र-मैत्रिणीची अडचण होऊन भांडणे होत असतील तर मात्र काही काळ मित्रपरिवार बाजूला ठेवावा. जेव्हा गैरसमज दूर होतील तेव्हा सर्व काही ठीक होऊन जाईल तोपर्यंत.

७. शेवटचं कारण आहे, “कार्यालयातील कामे आणि संपर्क”

कार्यालयात स्त्री-पुरुष त्यांचा सततचा संपर्क येणे सहाजिक आहे. अनेक वेळा कार्यालयीन कामाचे फोन घरी सुद्धा येतात अशावेळी नवरा किंवा बायको यांना हरकत नसावी. कधी कार्यालयातून येताना उशीर सुद्धा होऊ शकतो याला संशय कारण ठरतो. कधी कधी आऊट ऑफ स्टेशन जायचे झाल्यास एकमेकांना विश्वासात घेऊनच ही कामे व्हायला हवे. अनेक वेळा काहींच्या बाबतीत त्यांचा गैरफायदा घेतला जातो कारण समाजात अनेक उदाहरणे पुढे आल्याने कार्यालयीन कामे आणि कार्यालयीन कामाव्यतिरिक्त वेळेत संपर्क आल्याने अनेकांनी एकमेकांचा गैरफायदा घेतल्याची उदाहरणे सुद्धा आसपास दिसतात, त्यामुळे एकमेकांचा विश्‍वास जपून आणि विश्वास विश्वासात घेऊन ही कामे व्हायला हवी.

दोघेही नोकरीत असल्यास एकमेकांना जास्त समजून घेणे फार गरजेचे आहे. मित्रांनो जीवन हे एकदाच मिळतं त्यामुळे ते व्यवस्थित आणि एकमेकांना समजून घेऊन हाताळल्यास वैवाहिक जीवन खूप आनंदी आणि सौख्यभरे राहिले. आयुष्य मजेत आहे, त्यातच संशय घेणे , भांडणे, गैरसमज करून घेणे यामध्ये आयुष्याचा अनमोल क्षण वाया घालवू नका. एकमेकांना समजून घेऊन आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा