पोलीस एखाद्या आरोपीला हातकडी कधी घालू शकतात? ।। हातकडी घालण्यासाठीचे नियम काय आहेत ? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

एखाद्या व्यक्तीला हातकडी घालून पोलिस त्याला पोलिस स्टेशनला किंवा न्यायालयात नेताना आपण बघतो. परंतु आपल्याला हे माहीत आहे का, की हातकडी घालावी यासाठी कुठलाही कायदा भारतीय न्यायव्यवस्थेत उपलब्ध नाही. तर पोलीस जे एखाद्या व्यक्तीस हातकडी टाकून अटक करतात ते बेकायदेशीर करतात का? अर्थात नाही. तर मग आरोपी व्यक्तीस हातकडी कधी टाकता येते.

हे आज आपण पाहणार आहोत. तर सर्वोप्रथन आपण समजून घेवूया, आरोपी आणि गुन्हेगार या दोन शब्दात असणारा फरक. “आरोपी” म्हणजे ज्याच्यावर केवळ आरोप झालेले आहेत.आणि ते आरोप आद्याप न्यायालयांमध्ये तथ्याच्या कसोटीवर सिद्ध झालेले नाहीत. अशा व्यक्तीला आरोपी म्हणतात. तर “गुन्हेगार” म्हणजे असा व्यक्ती की ज्याचा गुन्हा न्यायालयांमध्ये तथ्यांच्या कसोटीवर सिद्ध झालेला आहे.

त्याच कसोटीवर न्यायालयाने त्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध केलेल आहे. आणि त्याला संभंधित गुन्ह्या संदर्भात दोषी मानलेले आहे. अशा व्यक्तीला गुन्हेगार म्हणतात. तर क्रिमिनल प्रोसिजर कोड अर्थात फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याने पोलिसांना अटक वी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. या कायद्याच्या कलम- ४६ असे सांगतो की ज्या व्यक्तीस करायची आहे.

ती व्यक्ती शब्दांनी अथवा कृतीने जर अटक होवून घेण्यास कबूल असेल तर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष स्पर्श करून पोलिसांनी अटकेत घ्यावे. त्याचप्रमाणे कलम -४६(२) अस सांगतो की ज्या व्यक्तीला अटक करायची आहे. ती व्यक्ती जर त्यास प्रतिबंध करत असेल, विरोध करत असेल, दांडगाई करत असेल, तर त्याला अटक करण्यासाठी जे उपाय करायला पाहिजे ते सर्व उपाय करण्याचे सर्वधिकार संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिलेली आहे.

त्याचप्रमाणे कलम-49 असे सांगतो की ज्या व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. व ती निसटून जाण्यात जितके प्रतिबंध करण्यात आलेले आहेत. त्याहून अधिक निर्बंध त्या व्यक्तीवर लादता कमा नये. उदाहरणार्थ, समजा एखद्या व्यक्तीला साध्या हातकडीने सुरक्षित न्यायालयात किंवा संबंधित ठिकाणी नेता येतात. परंतु गरज नसताना त्याला संपूर्ण त्याच्या शरीराला साखळदंड बांधणे. तर हे कायद्याच्या दृष्टीने कलम-49 च्या दृष्टीने चुकीचे आहे.

त्याच प्रमाणे कलम-46 मध्ये स्त्रियांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेली आहे. कुटल्याही आरोपी स्त्रीला अटक करण्यासाठी महिला पोलीस अधिकारीच असावी. त्यानंतर एखाद्या स्त्रीने अटक मान्य केली आणि अशा वेळेस महिला पोलिस अधिकारी नसेल. तर संबंधित स्त्री असं सांगू शकते की, पुरुष पोलीस अधिकाऱ्याने तिला स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे कलम-46(8) नुसार कुठल्याही स्त्रीला सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी अटक करता येनार नाही. अर्थात कुठलाही गंभीर गुन्हा जरी असेल तरी स्त्रीला रात्रीच्यावेळी अटक करता येणार नाही.

📍 आरोपीला हातकडी कधी घालता येते? : 

▪️जर एखाद्या व्यक्तीने पोलिसांना अटक करण्यास विरोध केला, दांडगाई केली तर अशा व्यक्तीला हातकडी घालता येते. ▪️एखाद्या सराईत गुन्हेगार असेल त्याला इंग्रजी भाषेत (habitual criminal) ह्याबीच्युअल क्रिमिनल असे म्हणतात. तर त्याला हातकडी घालता येईल. ▪️असा एखादा व्यक्ती की ज्याच्या अटकेमुळे सामाजिक शांतता भंग होईल, हिंसाचार उफाळून येण्याची दाट शक्यता असतील. अशा व्यक्तीला हातकडी घालता येईल.

▪️त्याच नुसार ज्याचा गुन्हा सिद्ध झालेले आहे आणि असा व्यक्ती जो ह्याबीच्युअल क्रिमिनल आहे. म्हणजे तो वारंवार गुन्हे करतो किंवा यापूर्वीच्या केसेस मध्ये त्याच्यावर गुन्हे सिद्ध झालेले आहेत. तो पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा व्यक्तीला हातकडी घालता येते. ▪️ त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जर आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असेल तर त्याला हातकडी घालता येते.

▪️पोलिसांकडे मुबलक प्रमाणात पोलिस फोर्स नसेल. त्याला एस्कॉर्ट करण्याच्या वेळेस तर त्या वेळेसही हातकडी घालण्याचा विचार केला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका न्यायनिवाडे मध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे की, कुठल्याही व्यक्तीला न्याय किंवा समर्थनीय कारण नसेल तर हातकडी घालता येणार नाही. तसं केल्यास संविधानाने जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत.

आर्टिकल-21- “राईट टू लाईट अँड पर्सनल लिबर्टी” आर्टिकल-22- “प्रोटेक्शन अगेन्स्ट अर्रेस्ट अँड डीटेंस्शन इन्सर्टेन ॲक्ट” या 2 मूलभूत अधिकारांचे हनन होईल असे मानण्यात येईल. याच्या विरोधात संबंधित व्यक्ती, आरोपी न्यायालयाकडे दाद देखील मागू शकतो. आणि ते जर सिद्ध झालं तर संबंधित व्यक्तीला न्यायालय भरपाई मिळवून देऊ शकतं. आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करू शकतो.

परंतु बहुतांश आरोपींना पोलिस न्यायालयांमध्ये हातकडी घालूनच उपस्थित करतात. याची आपण दुसरी बाजू देखील समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक तर जितक्या पोलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तितके पोलीस कर्मचारी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नाही. या शिवाय अनेकदा आरोपींची संख्या खूप जास्त असते तुलनेने त्यांना एस्कॉर्ट करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते.

त्यामुळे हातकडी घालणं हा सर्वोत्तम सुरक्षित उपाय पोलिसांसमोर असतो. शिवाय अनेक आरोपी हे सभ्यतेचे ढोंग देखील करणारे असतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये ही द्विधा मनस्थिती देखील पोलिसांसमोर असते. त्यामुळे पोलिसांना नाईलाजस्तव हातकडी घालावी लागते. पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा