रिटायरमेंट नंतर पैसे कसे आणि कुठे गुंतवायचे जेणेकरून तुमची सेकंड इनिंग आनंदात जाईल ।। आर्थिक साक्षरतेबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

तुमची किंवा तुमच्या आईवडिलांची रिटायरमेंट जवळ आली आहे का? रिटायरमेंट मधून तुम्हाला एखादी मोठी रक्कम हाती आली आहे का? आणि आता ही रक्कम कुठे गुंतवावी? जेणेकरून ती सुरक्षित ही राहील आणि त्यातून रेगुलर उत्पन्नही मिळेल. असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल. आणि आज आपण पाहणार आहोत कि रिटायरमेंट नंतरची मिळालेली रक्कम कुठे गुंतवायची.

रिटायरमेंट म्हणजे सेकंड इनिंगची सुरवात असते. आयुष्यभर केलेले कष्ट आणि धावपळ यांना पूर्णविराम मिळतो. वेळेअभावी आणि पैसेअभावी आपले काही स्वप्न हे अपूर्ण राहिलेले असतात. जे पूर्ण करण्याचा हा काळ असतो. आणि याच वेळी आपल्या हाती एक मोठी रक्कम मिळते. ती म्हणजे रिटायरमेंट कॉर्पस.

आता हा रिटायरमेंट कॉर्पस कुठे गुंतवायचा? की जेणेकरून तो सुरक्षित राहील आणि आपल्याला रेग्युलर उत्पन्न चालू राहील असा प्रश्न बऱ्याच व्यक्तींना पडतो. आज आपण काही “गव्हर्मेंट स्किम” पाहणार आहे. आणि त्याचबरोबर इतरही काही पर्याय पाहणार आहे जिथे आपण रिटायरमेंट कॉर्पस गुंतवू शकतो. आपली सगळ्यात पहिली स्कीम आहे,

१. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम : – ही स्कीम आहे की या स्कीम मध्ये प्रत्येक रिटायर्ड व्यक्तीने गुंतवणूक केलीच पाहिजे. या स्कीमचा (एज) वय क्रायटेरीया जो आहे तो 60 वर्षा वरील आहे. कारण ही सीनियर सिटीजन साठी ची स्कीम आहे. तर तुम्ही यामध्ये 15 लाखांपर्यंत रक्कम गुंतवू शकता. ही रक्कम तुम्हाला पाच वर्षांसाठी गुंतवता येऊ शकते.

आणि जर तुम्हाला वाटलं तर हा कालावधी तीन वर्षे करता येऊ शकतो. यावर सध्या मिळणार्‍या इंटरेस्ट रेट (व्याजदर) आहे 7.4%. जर तुमचा रिटायरमेंट कॉर्पस जास्त असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने देखील 15 लाखांपर्यंत अशी गुंतवणूक करू शकतात. आणि यातून तुम्हाला 15 लाखांवर साधारण दहा हजार रुपये एवढा महिना म्हणजे मासिक उत्पन्न तुम्हाला मिळू शकते. आणि जर पत्नीच्या नावाने केलं तर आणखी 10 हजार म्हणजेच दोघांच्या नावाने तुम्हाला 20 हजार एवढा मासिक उत्पन्न मिळेल. आणि तुमची रक्कम सुरक्षित देखील राहील.

आपली दुसरी योजना आहे, प्रधानमंत्री वय वंदना योजना : – या योजनेमध्ये तुम्ही दहा वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही 15 लाखांपर्यंत रक्कम गुंतवणूक करू शकता. ज्यावर 7.4% तेवढे इंटरेस्ट रेट (व्याजदर) आहे. म्हणजे यातही तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले तर यातूनही मला दहा हजार रुपयांचा मासिक उत्पन्न मिळत आहे.

आपली तिसरी योजना आहे, पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम : यास्कीम मध्ये तुम्ही सिंगल अकाउंट मध्ये साडेचार लाख ते डब्बल अकाउंट म्हणजे जॉइंट अकाउंट मध्ये नऊ लाखापर्यंतची गुंतवणूक करू शकता. यावर इंटरेस्ट रेट (व्याजदर) 6.6% मिळतो आहे. याचा लॉकिंग पिरियड (कालावधी) 5 वर्षांचा आहे.

आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाच-पाच वर्षांच्या सेटमध्ये ही स्कीम एक्स्टेंड सुद्धा करू शकता. म्हणजे जर तुम्ही यात नऊ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मासिक उत्पन्न हे पाच हजार रुपये मिळेल. या सगळ्या स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यावर ही जर तुमच्याकडे रक्कम उरत असेल, तर तुम्ही पीएफ (PF) मध्ये गुंतवणूक करू शकता. पण जर तुमच्या तुमचे कडे काही शॉर्ट टर्मचे गोल (ध्येय) तर तुम्ही पाच-पाच लाखांच्या एफडी वेगवेगळ्या बँक मध्ये करू शकता.

कारण पाच लाखांची रक्कम ही आरबीआयच्या नियमा नुसार सुरक्षित राहू शकते. शेअर मार्केट हे ऑप्शन या वयातील गुंतवणूक साठी थोड रिस्की ठरू शकते. मग तुम्ही त्याऐवजी देब्ट फंड मध्ये गुंतवणूक करा. आणि जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची खूप इच्छा असेल. तर तुम्ही निफ्टी फिफ्टी इंडेक्स वर किंवा सेन्सेक्स इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.

काही महत्त्वाच्या टिप्स किंवा महत्त्वाची काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही आफ्टर रिटायरमेंट करणं. खरं तर त्याआधी पण करायला काही हरकत नाही. पण आपण जाणून घेऊया या काही महत्त्वाच्या टिप्स: 1) तुम्ही तुमच्या सगळ्या कागदपत्रांवर नॉमिनीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की नाही? याची खात्री करून घ्या.

2) तुम्ही कुठे आणि किती गुंतवणूक केली आहे याची माहिती तुमच्या मुलांना किंवा तुमच्या जोडीदाराला असणे आवश्यक आहे. 3) तुमच्या नंतर तुमच्या संपत्तीची विभागणी आणि वारसा हक्क कुणाला मिळावा यासाठी तुम्ही विल करण हे खूप आवश्यक आहे. 4) आयुष्यभर तुम्ही एवढे कष्ट करून पैसा कमावला असतो. त्यामुळे ही जी सेकंड इनिंग आहे. यामध्ये तो पैसा अगदी मनसोक्त वापर करा. तुमची सेकंड इनिंग सुद्धा खूप मजेदार बनवा. आणि खूप एन्जॉय करा आणि हॅप्पी रहा, हेल्दी रहा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.