7/12 वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी ।। 7/12 नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती ।। सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती !

शेती शैक्षणिक

सातबारा शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा भक्कम पुरावा आहे आणि याच सातबारा मध्ये अनेक प्रकारच्या चुका असतात जसे की शेतकऱ्यांच्या नावांमध्ये चुका किंवा इतर हक्कांमध्ये एखादी चुकीने नोंद झालेली असणे किंवा चुकीचे नाव सातबारा वर समाविष्ट असणे अशा प्रकारच्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत.

आणि या चुका कशा दुरुस्त कराव्या याविषयीची माहिती सुद्धा अनेक शेतकऱ्यांना नसते त्यामुळे या चुका कशा प्रकारे आपण दुरुस्त करू शकतो या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहे. अधिकार अभिलेखात म्हणजेच सातबारा किंवा एखाद्या महसूल नोंदवहीमध्ये जर काही चूक झाली असेल किंवा एखादा लेखन प्रमाणात म्हणजेच लिहिताना चूक झाली असेल.

तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ ने अशी चूक किंवा लेखन प्रमाणात दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता येतो. म्हणजेच अशा प्रकारची सातबारा चूक दुरुस्त करण्यासाठी आपणास तलाठी यांच्याकडे अर्ज करून काही उपयोग नाही आपल्याला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो

आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार तलाठ्याला देत असतात. अशा चुका दुरुस्त करण्यापूर्वी काही हितसंबंधी यांना नोटीस बजावणे आवश्यक आहे अशा चुका किंवा लेखन प्रमाणात झाल्याचे संबंधित पक्षकारांनी कबूल केले पाहिजे.

आपण आपल्या सातबारावरील एखादे नाव कमी करणे विषयी अर्ज केलेला आहे ज्या व्यक्तीचे नाव चुकीने आपल्या इतर हक्कांमध्ये समाविष्ट झालेली आहे किंवा सातबारा सदरी त्यांचे नाव आहे. अशा व्यक्तीला तहसीलदार आपण अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तींना नोटीस बजावतात

आणि अशा व्यक्तीने जर नाव कमी करणे विषयी कुठलाही आक्षेप किंवा त्याची कुठलीही तक्रार नसेल तर आपली विनंती मान्य होऊन ते नाव दुरुस्त होते आणि सातबारा वरून कमी केल्या जातात. अशा प्रकारच्या सातबारावरच्या कोणकोणत्या प्रकारच्या चुका दुरुस्त करता येतात याविषयीची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

१. सातबारा पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या खातेदाराचे नाव लिहिण्याची राहून जाणे अशा प्रकारची चूक या कायद्या अंतर्गत दुरुस्त करता येते म्हणजे पाठीमागे जे दहा वर्षानंतर सातबाराचे पुनर्लेखन होत होते त्यामध्ये जर एखाद्या खातेदाराचे नाव किंवा एखादा शेरा चुकीने राहिलेला असेल तर पूर्वीच्या अभिलेखात तो असेल आणि नवीन अभिलेखात नसेल तर अशा प्रकारची चूक कलम १५५ अंतर्गत दुरुस्त करता येते.

२. एखाद्या सातबारा सदरी असलेली काही नावे कमी करण्याचा आदेश झाला होता परंतु त्या आदेशानुसार अशी नावे कमी करण्यात आले नाहीत म्हणजेच आपण एखाद्या अभिलेखातील नाव कमी करणे विषयी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता आणि तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांनी अशा प्रकारचे आदेश सुद्धा निर्गमित केले होते परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसेल तर अशा प्रकारच्या अंमलबजावणी आपणास अशा १५५ कलमानुसार करता येते.

३. एखाद्या जमिनीची कूळकायदा कलम ३२ ग नुसार ठरलेली रक्कम मूळ मालकाला दिल्यानंतरही मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात राहिले असेल म्हणजेच कुळकायद्याविषयीचे हे कलम आहे या अंतर्गत कलम ३२ ग नुसार आपण मूळ मालकाला रक्कम दिली आणि नंतर ही मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात असेल तर असे नाव आपणास कमी करता येते.

४. नोंदणीकृत दस्त यातील मजकुरात असणारा एखादा उल्लेख फेरफार सद्री नोंदवण्यात आला नसेल म्हणजेच मित्रांनो ज्या वेळेस आपण जमिनीचे खरेदी व्यवहार करतो त्यावेळेस नोंदणीकृतदस्त असतो रजिस्ट्री कॉपी असते त्यातील महत्त्वाचा मजकूर जसे वारसाचे नाव किंवा जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये काही चूक झालेली असेल किंवा असा उल्लेख सातबारावर झाले नसेल तर आपल्याला कलम १५५ अंतर्गत अशाप्रकारचे सुद्धा दुरुस्ती करता येते.

५. फेरफार सदरी नोंदविलेले एखाद्या वारसाचे नाव सातबारा सदरी नोंदविण्यात आलेले नाही म्हणजेच एखादया वरसाचे नाव जर सातबाऱ्यावर आलेले नसेल तर ते सुद्धा या कायद्यानुसार आपल्याला आणता येते. यावरून असे लक्षात येते की कुठेतरी मूळ दस्तावेज आदेशात केलेला उल्लेख किंवा आदेश नोंदविण्यात चूक झाली असेल तरच सर्व हितसंबंधाचे म्हणणे विचारात घेऊन अशी चूक किंवा लेखन प्रमाण दुरुस्त करता येतो.

म्हणजेच यामध्ये मूळ अभिलेखा मध्ये पूर्वीचे जे रेकॉर्ड त्यामध्ये जर तुमचे नाव व्यवस्थित असेल आणि तुम्ही जी चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज केलेला आहे ती चूक झालेली असेल मूळच्या अभिलेखत ती असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज करून त्या ठिकाणी सातबारावर चूक दुरुस्त करता येते आणि अशाप्रकारे ज्यांचे नाव कमी होणार आहे अशी ज्यांच्या ज्यांच्याशी संबंधित ती चूक आहे त्या सर्व हितसंबंधीताना अगोदर नोटीस दिल्या जाते आणि त्यांची जर कुठलीही तक्रार नसेल तरच अशा प्रकरणावर कार्यवाही होऊ शकते.

कधी कधी एखादं खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर खरेदी घेणारा स्वतःचे नाव सातबारा सदरी दाखल झाल्याची खात्री करीत नाही म्हणजेच खरेदी केल्यानंतर आपण सातबारावर आपले नाव आले का याची खात्री करीत नाही त्यामुळे खरेदी देणारा मूळ मालकाचे नाव सातबारा सदरी तशीच राहते याचा फायदा घेऊन खरेदी देणारा म्हणजे च मूळ मालक त्याच जमिनीची विक्री अनेक लोकांना करतात

आणि या कायद्यानुसार जरी प्रथम खरेदी घेणाऱ्या चे नाव सातबारा सदरी दाखल होणे आवश्यक असले तरी अशा अनेक खरेदी-विक्री व्यवहारामुळे पुढे अनेक प्रकारची कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते त्यामुळे प्रत्येकाने आपण केलेल्या व्यवहाराची नोंद गाव दप्तरी योग्य प्रकारे नोंदवली गेली आहे किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.

म्हणजेच ज्या वेळेस आपण एखादा खरेदी व्यवहार करतो आणि दस्त नोंद झाल्यानंतर आपले नाव सातबारा सदरी लावली आहे किंवा नाही याची खात्री करत नाही आणि याच मुळे मूळ मालकाचेच नाव सातबारा वर राहते आणि तोच मालक परत त्याच जमिनी ची विक्री अनेक व्यक्तींना करू शकतो.

अशा प्रकारचे गैरव्यवहार हे पूर्वीच्या काळी होत होते आता सर्वजण या बाबतीत जागृत झाल्यामुळे असे प्रकार सहजासहजी घडत नाही तरी पण अशा बाबतीत आपण दक्ष असणे आवश्यक आहे. दर दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन करण्यात येते. असे पुनर्लेखन झाल्यानंतर प्रत्येक खातेदाराने सातबारा ची नक्कल घेऊन आपल्याशी संबंधित सर्व नोंदी योग्य प्रकारे नोंदविल्या गेल्या आहेत किंवा नाही याची खात्री करावी

आणि दरवर्षी वेळोवेळी सातबारा ची नक्कल घेऊन सर्व नोंदीची खातरजमा करावी आणि याबाबत काही संभ्रम असल्यास तात्काळ तलाठी यांच्याशी संपर्क साधावा म्हणजेच आपण आपले सातबारा दर दहा वर्षांनी किंवा दरवर्षी आपण सातबारा नवीन सातबारा घेतली पाहिजे.

आणि त्या सात बाराचे सविस्तर वाचन केले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि अनेक शेतकरी आता सुद्धा असे आहेत की त्यांनी संपूर्ण सातबारा आत्तापर्यंत वाचलेला नाहीये काळजीपूर्वक वाचून घेतलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे आपल्या शेतीचा सातबारा किंवा इतर आपले जमिनीशी संबंधित जे ही कागदपत्रे आहेत.

फेरफार अशा प्रकारच्या कागद पत्राची आपण व्यवस्थित वाचन केले पाहिजे, व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. तर अशा प्रकारे जर तुमच्या सातबारा मध्ये काही जर चुका झाल्या असतील तर तुम्हाला कलम १५५ तहसिलदार यांचेकडे अर्ज करुन अशा प्रकारच्या चुका दुरुस्त करता येतात.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

4 thoughts on “7/12 वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी ।। 7/12 नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती ।। सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण माहिती !

  1. 1939 च्या सातबारात चुक झालेली आहे आणेवारी मध्ये ती होईल का

Comments are closed.