नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
साडी हा शब्द जरी छोटा असला तरी त्याचा आवाका बराच मोठा आहे. भारतीय वस्त्रप्रावरणात साडीला महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय स्त्रिच्या जीवनातील बराच मोठा भाग साडीने व्यापला आहे. भारतीय स्त्रीची ओळख तिच्या पेहरावातून होते. संपुर्ण भारतभर साडीने महावस्त्राचा मान मिळवला आहे. भारतीय स्त्रीच्या मनाच्या सगळ्यात जवळ कोणता पेहराव असेल तर साडी. लहानपणी आईची- आजीची साडी जेव्हा कोणतीही मुलगी पहिल्यांदा नेसते.
तिचं साडीसोबतच एक खास भावविश्व बनत जातं. त्यानंतर अनेक साड्या तिच्या जीवनाचा भाग बनून जातात. स्वत:जवळ कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक महिला वर्गाला कार्यक्रमाला जाताना कुठली साडी नेसू किंवा माझ्याकडे चांगली साडीच नाही नेसायला अशी तक्रार करताना दिसते. पण वडोदरामधील महिलांनी यावर एक खास शक्कल शोधून काढली आहे. या महिलांनी एकत्र येत साडी लायब्ररी सुरु केली आहे.
पुस्तकांच्या वाचनालयाप्रमाणेच इथूनही तुम्ही साड्या आणू शकता. हेमा चौहान यांनी ही लायब्ररी सुरु केली आहे. अष्ट सहेली लायब्ररी असं या लायब्ररीचं नाव आहे.
यात कोणत्याही वयाची स्त्री पाच दिवसांसाठी अगदी कमी रुपयांमध्ये तीन साड्या भाड्याने घेऊ शकते. हेमा यांना घरी काम करत असलेल्या स्त्रीमुळे ही संकल्पना सुचली.
या घरकाम करणा-या स्त्रिला हेमा यांनी त्याचे काही कपडे कार्यक्रमासाठी दिले होते.
यामुळे तिला कपड्यांबाबत सगळ्यांनी विचारणा केली. यावेळी चेह-यावर आनंद तिला लपवता आला नाही. तिच्याकडे पाहून त्यांना मनात विचार आला की, अशा किती स्त्रिया असतील ज्यांना कार्यक्रमासाठी चांगल्या साड्या नेसायची इच्छा असते. पण परिस्थिती अभावी ती पुर्ण होऊ शकत नाही. हेमा यांनी ही लेहंगा चोली त्या घरकाम करणा-या स्त्रिला देऊन टाकली. आणि आपली संकल्पना सत्यात आणण्यासाठी काम सुरु केलं.
हेमा यांनी त्यांच्या मैत्रिणींपैकी काही जणांनी पाच-पाच कपडे दान केले. त्यापासून या लायब्ररीची सुरुवात झाल्याचं त्या सांगतात. केवळ साडीपासून सुरुवात झालेला हा उपक्रम आता साडी, लेहंगा, पलाजो, ब्लाऊज या प्रावरणांनाही या लायब्ररीमध्ये स्थान मिळालं आहे. सध्या हेमा यांच्याकडे 400 पेक्षा जास्त साड्यांचं कलेक्शन आहे. यावेळी महिलांना साडी देताना त्यांच्याकडून 500 रुपये टोकन म्हणून घेतले जातात. या टोकनमधून साड्यांच्या ड्रायक्लिनिंगचा खर्च काढला जातो. काही जरीच्या साड्यांना पॉलिश करावं लागतं. त्यामुळे हा खर्च टोकनमधून वजा केला जातो. या लायब्ररीच्या निमित्ताने अनेक महिलांना मनपसंत साडी नेसण्यासाठी मिळून जाते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.