समान नागरी कायदा लागु झाल्यास काय परिणाम होईल?

कायदा

समान नागरी कायदा म्हणजे काय?‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ म्हणजे विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेची वाटणी यासारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान कायदे असणे होय. ज्या राज्यात समान नागरी कायदा लागू होईल, तेथे लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तकविधान, मुलांची कस्टडी, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबीक संपत्तीची वाटणी, देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी समान असतील. चला तर जाणून घेऊ सविस्तर माहिती..

भारतीय संविधानातील भाग चार आणि कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे समान नागरी कायदा लागू करणे हे आमचे ध्येय असेल असे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनेक वेळा समान नागरी कायदा लागू करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 42 व्या घटनादुरुस्तीमध्ये प्रास्ताविकात धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला होता. यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय संविधानाचा उद्देश हा आहे की, भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या आधारे भेदभाव नाहीसा करणे होय. कायद्याचे राज्य ही संकल्पना मूलभूत अधिकारांमध्ये येते.

त्यानुसार नागरिकांना समान नागरी कायदा असावा, पण स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर ही समान नागरी कायद्याची अंमलबजावणी न करणे एक प्रकारच्या कायद्याचे राज्य आणि संविधानाचे प्रस्ताविकेचे उल्लंघन आहे.
समान नागरी कायद्याचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही असा होतो.

◆याचबरोबर, भारतीय राज्यघटनेत कायद्याची वर्गीकरण दोन भागात केले आहे

1) नागरी कायदे : नागरी कायद्यामध्ये लग्न, संपत्ती, वारसदार, कुटुंब, किंवा व्यक्तीसंबंधी कायदे ही नागरी कायद्यामध्ये येतात

2) गुन्हेगारी कायदे : गुन्हेगारी कायद्यामध्ये भारतीय दंड संहितेता, फौजदारी प्रक्रिया संहिता ईत्यादी फौजदारी कायदे गुन्हेगारी कायद्यात येतात

आपल्या सर्वांना माहीत आहे की, आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे ज्याच्या त्याच्या धर्माची वेगळी कायदे आहेत. तसेच हिंदू समुदायासाठी हिंदू विवाह कायदा, हिंदू कुटुंब कायदा, हिंदू उत्तराधिकारी कायदा, पोटगी संबंधी कायदे इत्यादी कायदे हिंदू समुदायासाठी कायदे आहेत.

याचबरोबर, मुस्लिम धर्माचे कायदे हे त्यांच्या ग्रंथावर आधारित आहे मुस्लिम विवाह कायदा, मुस्लिम घटस्फोट कायदा, मुस्लिम शरीया कायदा, इत्यादी मुस्लिम धर्माचे वैयक्तिक कायदे आहेत. तसेच ख्रिश्चन आणि पारसी धार्माचेही वैयक्तिक कायदे आहेत.
मात्र, भारतामध्ये एखाद्या व्यक्तीने खून केला असेल, तर त्या व्यक्तीला भारतीय दंड संहितेतील कलम 302 नुसार शिक्षा होते.

त्यांना कोणत्याही धर्माच्या आधारावर शिक्षा होत नाही. म्हणजे खून करणारा हिंदू असेल तर त्याला वेगळी शिक्षा किंवा मुस्लिम असेल तर वेगळी शिक्षा तर तसे होत नाही. खून करणारा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांना समान शिक्षा होईल हेच समान नागरी कायद्याला अपेक्षित आहे.

मुस्लिम धर्मात एका व्यक्तीला चार लग्न करण्याचा अधिकार आहे. असे त्याचा वैयक्तिक कायदा सांगतो. तसेच हिंदू धर्मामध्ये एकच विवाह करण्याचा अधिकार आहे, असे हिंदु धर्माचा वैयक्तिक कायदा सांगतो. अशा प्रकारे अशा नागरिक कायद्यामुळे भेदभाव दिसून येतो. त्यामुळे समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे.

◆समान नागरी कायदा लागु झाल्यास काय परिणाम होईल?
मित्रांनो जर समान नागरी कायदा लागू झाला तर काय परिणाम होईल. प्रथम तर सर्व धर्माचे वैयक्तिक कायदे रद्द होतील जसे हिंदू विवाह कायदा, हिंदू कुटुंब कायदा, इत्यादी वैयक्तिक कायदेही रद्द होतील. तसेच मुस्लिम धर्माचे सर्वच वैयक्तिक कायदेही रद्द होतील. तसेच पारशी आणि ख्रिश्चन यांचेही वैयक्तिक कायदे रद्द होतील.

या सर्व धर्मांसाठी एकच कायदा लागू असेल. म्हणजेच मुस्लिम धर्मातील लोकांना सुद्धा एकच विवाह करण्याचा अधिकार असेल, हिंदूंना पण तसेच अधिकार असतील. याचबरोबर, तसेच संपत्तीतही समान वाटप होईल, म्हणजे मुस्लिम समाजात मुस्लिम महिलांना संपत्तीत फारसा हिसा मिळत नाही.

त्याकरिता यांनाही समान हिस्सा मिळेल. तसेच हिंदू आणि मुस्लिम यांना एकच पद्धतीने विवाह करावा लागेल. एकंदरीत फौजदारी कायद्यात जशी समानता आहे. तशीच नागरिक कायद्यातही सामान नागरी कायद्यामुळे येईल.